)
mahayuti : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे सुरू होताच वर्ध्यात महायुतीत धुसफूस सुरु झालीय.भाजपने स्वबळाचा नारा दिला दिल्याने मित्रपक्ष आक्रमक झालेत...आमच्याकडे जास्त आमदार असल्याने स्वतंत्र लढून बाजी मारू असं रामदास तडस यांनी म्हटलंय. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीने तडसांना लोकसभेतील पराभवाची आठवण करून देत डिवचलंय. नेमकं वर्ध्यात महायुतीत काय सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीत धुसफूस सुरू झालीय. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्यातील सर्व झेडपी, नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केलीय. तसेच भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने आपणच निवडणुकीत बाजी मारू असाही दावा केलाय. रामदास तडस यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीही आक्रमक झालीय. स्वबळाची भाषा करणा-या रामदास तडस यांना राष्ट्रवादीने लोकसभेतील पराभवाची आठवण करून देत डिवचलंय.
भाजप-राष्ट्रवादी नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेनंतर शिवसेनेनं मात्र काहीशी सावध भूमिका घेतलीय. तसेच महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचीही आठवण मित्रपक्षांना करून दिलीय. रामदास तडस यांच्या स्वबळाच्या भाषेनंतर वर्ध्यात महायुतीत धुसफूस सुरू झालीय. राष्ट्रवादीसह शिवसेनेनं तडस यांना थेट इशाराही दिलाय. त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेते नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.