Kundamala Indrayani River Bridge Collapse News : पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या मावळजवळील कुंडमाळा हे ठिकाण पावसाळ्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यात रविवार असल्याने इथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अशातच इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू तर 25 - 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे.
जो पूल कोसळला आहे, तो मंदिरासमोर असून त्यावरून दुचाकी किंवा एकटा माणूस ओलांडू सकतो. हा खूप जुना पूल असून तो अतिशय भीतीदायक होता असं अनेक वेळा स्थानिकांकडून सांगण्यात येत होतं.
हे ठिकाण नदीच्या कुशीत सुंदरपणे वसलेले आहे. इंद्रायणी नदीवरील हे एक छोटेसं पिकनिक स्पॉट गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. इंद्रायणी नदीवर एक छोटसं धरण बांधण्यात (Kundamala waterfall)आलं आहे.
पावसाळ्यात जेव्हा इंद्रायणी नदीत भरपूर पाणी येते तेव्हा धरणावर पाणी ओव्हरफ्लो होतं आणि पावसाळ्यात ते खूप सुंदर दिसतं. तर दुसऱ्या बाजूला ते पाणी धरून ठेवते, या छोट्या धरणातून पाणी पडल्यानंतर आणि खडकांमधून वाहून गेल्यानंतर इथे अनेक खड्डे तयार होतात. जे निघोजेच्या खड्ड्यासारखे दिसतात.
दुर्घटनेपूर्वी आणि दुर्घटनेनंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुमारे 300 ते 400 मीटर उंचीचे हे एक निसर्गरम्य दृश्य आहे. पाण्याने खडक कापले आहेत. धरणाच्या एका बाजूला इंद्रायणी नदी 20 फूट खोल आहे. तर नदीला 5 फूट खोल फरसबंदी भाग आहे.
तसंच धरणासमोर नदीच्या मध्यभागी एक प्रसिद्ध मंदिर आहे. जे कुंद्राई माता मंदिर म्हणून ओळखलं जातं. खरं तर स्थानिक आणि जवळच्या गावकऱ्यांसाठी हे कुलदेवी आहे. तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूला एक शिवलिंग आहे, जे खूप प्राचीन आहे. शिवलिंगाला जल अर्पण करणे हे पुण्य मानलं जातं.
IND
(13 ov) 64/1 (151 ov) 587
|
VS |
ENG
407(89.3 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(6 ov) 12/2 (66.5 ov) 286
|
VS |
WI
253(73.2 ov)
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.