COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव : जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केळी फेको आंदोलन केलं. जूनच्या सुरवातीला आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे रावेर तालुक्यात हजारो हेक्टर केळी भुईसपाट झाली होती. जमनीदोस्त झालेल्या या केळी बागांची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन रावेरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी किसान सभेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील यांना  धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता.


दरम्यान, पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल असं आश्वासन महाजन यांनी दिल होतं. त्याची पूर्तता न झाल्यानं महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जळगाव दौऱ्यावर येऊनही केळी उत्पादकांकडे पाठ फिरविल्यानं हे आंदोलन केलं.