)
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : काही दिवस पूर्वी मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंप वर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच एक अतिशय खळबळजनक घटना घडली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील मुक्ताई बंगला निवासस्थानी चोरी झाल्याचं वृत्त मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी समोर आलं. एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचं कुलूप तोडत, तळ मजला तसंच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली. (Jalgaon news eknath khadse home theft at muktai bunglow)
नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेला ही माहिती प्राथमिक स्वरुपात समोर आली नव्हती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. मंगळवारी आज सकाळी साफसफाई करणारे कामगार आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
एकनाथ खडसे यांच्या चोरीच्या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी तपासानंतर अधिकृत माहिती देत घटनेचा सर्व तपशील दिला. 868 ग्रॅम एवढं सोन आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आल्यास पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी श्वानपथक तसंच ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे.
NCP SP Party Eknath Khadse Home Theft | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील मुक्ताई बंगला निवासस्थानी चोरी #NCP #eknathkhadse #theft #zee24taas #marathinews #jalgaon pic.twitter.com/VnFJidgdF9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 28, 2025
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासणी केली जात असून अद्याप संदर्भातील कोणतेही धागेदोरे पोलिसांना मिळाले नसल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर त्यासंदर्भातील सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा समोर आला, जिथं ही घटने नेमकी कशी घडली हे उघडकीस आलं.
Eknath Khadse Home Theft CCTV | एकनाथ खडसे यांच्या जळगावतील मुक्ताई बंगला निवासस्थानी चोरीचा CCTV व्हिडिओ समोर #NCP #eknathkhadse #theft #zee24taas #marathinews #jalgaon pic.twitter.com/oKlk4Ao77k
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 28, 2025
आतापर्यंत हाती आलेले पुरावे पाहता यासंदर्भात जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना काय आहे?
चोरट्यांनी मध्यरात्री मुक्ताई बंगला (शिवराम नगर, जळगाव) च्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि तळ मजल्यावरील एकनाथ खडसे यांच्या खोलीत तसेच पहिल्या मजल्यावरील नातेवाईकांच्या खोल्यांमधील कपाटे उघडून चोरी केली.
चोरी कधी आणि कशी उघडकीस आली?
चोरी मंगळवार (28 ऑक्टोबर 2025) रोजी मध्यरात्री घडली असावी. सकाळी साफसफाईसाठी आलेल्या कामगारांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि घरातील वस्तू कोलमडलेल्या अवस्थेत आढळल्या, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. एकनाथ खडसे यांना कळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
चोरट्यांनी नेमके काय चोरले?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी सुमारे 6 ते 7 तोळे सोने (सुमारे 70 ते 82 ग्रॅम; यात एकनाथ खडसे यांच्या खोलीतील 5 ग्रॅमचे 4 दागिने आणि नातेवाईकांच्या खोलीतील 5 तोळे सोने समाविष्ट) तसेच 35000 रुपये रोकड चोरली. याबाबतची नेमकी माहिती पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.