फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन

50 रुपयांची लाच पोलिसांना  महागात पडली आहे. जळगावमध्ये ट्रकचालकाकडून पैसे घेणा-या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 31, 2025, 10:41 PM IST
फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन

Jalgaon News : फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. या पोलिसांचा संशयास्पद व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिस खात्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.  

ट्रकचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केले आहे. प्राथमिक तपासात पवन पाटील याने ट्रकचालकाकडून 50 रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे

छत्तीसगडीतून चाळीसगाव कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये चालकाच्या केबिनखाली तब्बल आठ ते फुटांचा अजगर आढळून आला आहे. चालक पाचोरा येथे चहा पिण्यासाठी थांबला असता परिसरातील नागरिकांना चालकाच्या केबिन खाली मोठा अजगर दिसून आला. नागरिकांनी सर्पमित्र शैलेश पाटील यांना संपर्क साधून बोलावून घेतले. केबिन खाली वेगवेगळ्या साहित्यामध्ये अडकलेल्या अजगराला सर्पमित्र शैलेश पाटील यांनी सुखरूप बाहेर काढले त्यानंतर त्याला जंगल परिसरात सोडून देण्यात आले. यावेळी अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती...

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More