नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यातील (Jalna Accident) मंठा तालुक्यात कारचा भीषण अपघात झाला आहे. शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर अपघात होताच भीषण आग (Fire) लागली. या आगीमध्ये पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे. दुसऱ्या गाडीने धडक दिल्यानंतर पती बाहेर येऊन फोनवर बोलत असतानाच कारने पेट घेतला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. आगीने क्षणात विक्राळ रुप धारण केल्याने पत्नीला बाहेर पडता आले नाही आणि तिचा कारमध्येच जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी (Jalna Police) घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परतुर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके आणि त्यांची पत्नी सविता सोळंके (32) हे गुरुवारी संध्याकाळी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कार्ला गावाकडे येत असताना मंठा ते लोणार रस्त्यावर असलेल्या महावीर जिनिंगजवळ त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारला अपघातानंतर अचानक आग लागली. अपघातामध्ये सविता सोळंके या पूर्णता जळाल्या आहेत. पीक अपने कारला पाठी मागील बाजूने धडक दिल्याने कारने पेट घेतला होता. ही आग विझवणे शक्य न झाल्याने सविता सोळंके यांचा कार अपघातात होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत कार आणि कार मधील सविता सोळंके या पूर्णपणे जळालेल्या होत्या.


परतुर तालुक्यातील कारळा येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके आणि त्यांची पत्नी सविता अमोल सोळंके हे गुरुवारी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. तिथून परतत असतानाच हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये सविता सोळंके या पूर्णता होरपळल्या. या अपघाताची सर्वात आधी माहिती अमोल यांनी त्यांचे भाऊ सोपान यांनी दिली होती. सोपान यांनी यांनी त्यांचे मामा कल्याण वायाळ आणि प्रताप वायाळ यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी मंठा पोलिसांना याची माहिती दिली होती.


सोपान सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल आणि सविता यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मूलबाळ होत नसल्यामुळे ते  शेगावला जायचे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता चुलत भावाची कार घेऊन अमोल आणि सविता शेगावला गेले होते. मात्र शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अमोल यांचा मला फोन आला आणि एका पिकअपने पाठीमागून धडक दिल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. त्यामुळे अमोल बाहेर येऊन पिकअपच्या चालकासोबत सोबत बोलत होते. त्याचवेळी अचानक कारने अचानक पेट घेतला. क्षणातच आगीने विक्राळ रुप धारण केल्याने सविता यांना गाडी बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा गाडीतच जळून मृत्यू झाला.