महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

जालना येथे एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 22, 2025, 11:01 PM IST
महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

Jalna Crime News : महाराष्ट्र पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. 20 वर्षीय गतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उाडली. पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. 
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात ही घटना घडली आहे. शेतात जळतणाचे लाकडं आणण्यासाठी गेलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. 3 मार्चला ही घटना घडली आहे.

 20 वर्षीय विवाहित महिला शेतात लाकडं आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी कठोरा बाजार येथील आरोपी सद्दामखा अजमेरखा पठाण, सादिकखा शफीकखा पठाण आणि फारुखा जीलाणी खा पठाण या तीन नराधमांनी महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला धमकी दिल्यानं महिलेनं घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. 

मात्र, 20 मार्च रोजी रात्री उशीरा महिलेनं भोकरदन पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळत न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

हे देखील वाचा... पुण्यातील IT इंजिनीयरने आपल्याच 3 वर्षाच्या मुलाची हत्या केली; हत्येचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या चोरा शेतशिवारात 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्यावर खळबळ उडाली आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत अल्पवयीन मुलगी चोरा या गावातीलच रहिवासी आहे. काल संध्याकाळ पासून मुलगी घरून बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी मुलीचा शोध सुरू केला होता. विहिरीतील शवाबाबत माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. मात्र मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.