)
Jitendra Awhad On Sanatan : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आव्हाड यांच्या या विधानाने राज्याचं वातावरण चांगलेच तापल आहे. सनातन धर्माने देशाचं वाटोळं केले. सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केल्याचं म्हटल आहे. आव्हाडांच्या या विधानावर सत्ताधा-यांकडून चौफेर टीका होत आहे.
वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था कोणी निर्माण केली, शिवरायांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं, ते सनातनी दहशतवादीच होते असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. कुणाला खूष करण्यासाठी विधान केले जात आहेत. गलिच्छ राजकारणासाठी सनातनची बदनामी केली जात आहे. हात जोडून माफी मागा असं राम कदम म्हणाले.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या 'सनातनी दहशतवाद' विधानावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच जितेंद्र आव्हाडांनी त्यात नव्याने भर घातली आहे. सनातन धर्माने देशाचं वाटोळं केलं. सनातनी लोकांमुळे वर्णव्यवस्था, धर्मद्वेष वाढला अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सोबतच सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केल्याचंही आव्हडांनी म्हटल आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावरून भाजपने चौफेर टीकेचे झोड उठवली आहे.
दरम्यान सनातन धर्माची अशी बदनामी करणं चुकीचं असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटल आहे. तर, पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणा-यांचा एकदा मुस्लीम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा असं ओपन चॅलेंज भाजपच्या केशव उपाध्ये यांनी दिले. पृथ्वीराज चव्हाणांपाठोपाठ आव्हाडांच्या सनतानी दहशतवादवरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी आव्हाडांवर टीकास्त्र डागत माफी मागण्याचं आव्हान केलंय. त्यामुळे आव्हाड या मुद्द्यावरू पुन्हा एकदा स्पष्टीकरण देणार की ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.