जुन्नर : मराठा आरक्षणासाठी आज जुन्नर तालुक्यात बंद पाळण्यात येतो आहे. त्यामुळे परिसरातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. चाकणमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महामार्गावरची एसटी सेवाही बंद ठेवली आहे. त्यामुळे बसस्थानकं ओस पडली आहेत. खासगी वाहतूक तुरळक स्वरुपात सुरु आहे. शाळा कॉलेजला आधीच सुट्टी घोषित करण्यात आली आहे. बंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोग लवकरच अहवाल देणार असल्य़ाचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. त्यासंदर्भात सरकारनं आयोगाला विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. मात्र आरक्षण टिकण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.