)
कोल्हापुरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. महाविद्यालयीन कॉलेजमधील एका तरुणीवर बॉयफ्रेंडसह चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीने त्या मुलावर विश्वास ठेवला त्या तिच्या बॉयफ्रेंडने अश्लील व्हिडीओ बनवून धमकी देत तिच्यावर गेल्या 10 महिन्यांपासून अत्याचार केले आहेत. राधानगरी इथल्या 4 तरुणांना मुरगूड पोलिसांनी अटक केली असून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत. सर्वात आधी आदित्य शेटके याने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ शूट करत मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. चार संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यात फोटो व्हायरलची धमकी देत विविध ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य शेटके याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी आदित्य शेटकेशी फोटोग्राफीतून ओळख झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतलं आणि तलाव परिसरात नेऊन झाडीत तिचे फोटो काढले. आरोपीने फोटो काढून ते एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. बदनामीची भीती दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केला.
खामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 13 वर्षीय बालिकेवर चक्कीत दळण घेऊन आली असता एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला . इतकंच नाही तर त्याच्या मित्रांनी बलात्कार करत असतानाचा व्हिडिओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला . या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरून पोक्सो, ऍट्रॉसिटी सह माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलगा देखील आहे.
14 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.पालघरच्या कासा पोलीस ठाणे हद्दीतील हळदपाडा येथील घटना.मामाकडे राहत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीवर 14 वर्षीय अल्पवयीन मामाकडून लैंगिक अत्याचार.राहत्या घराच्या बाजूला असलेल्या जुन्या घरात लैंगिक अत्याचार केल्याची माहिती.कासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 64 आणि 65 अंतर्गत गुन्हा दाखल.लैंगिक अत्याचार करणारा 14 वर्षीय अल्पवयीन आरोपी पीडीतेचा मामा असल्याची माहिती .