एकदम येक नंबर! लग्नाची वरात थेट JCB तून आली दारात; कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही...

Kolhapur News : नवदाम्पत्याची जेसीबीच्या बकेटमध्ये बसून वरात; कोल्हापूरकराच्या हौसेला मोल नाही...; व्हिडीओ पाहून 'नादखुळा' का म्हणतात याचा येईल प्रत्यय...   

सायली पाटील | Updated: Nov 8, 2025, 12:21 PM IST
एकदम येक नंबर! लग्नाची वरात थेट JCB तून आली दारात; कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही...
Kolhapur news newly marrid couple jcb varat procession viral video

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : (Kolhapur News) हौसेला मोल नसते... असं म्हणतात आणि कोल्हापूरकर प्रत्येक वेळी ते सिद्धही करतात. का....? त्याचं घडलंय असं की, कोल्हापुरातील एका लग्नसोहळ्यात एक अजब प्रकार पाहायला मिळाला. जिथं हौशी मंडळींनी एका नवदाम्पत्याची वरात थेट जेसीबीच्या बकेटमध्ये बसून काढली. डिजे, डॉल्बी सारा थाट... वरातीसाठी प्रमुख उपस्थिती मात्र JBC ची बरं! 

Add Zee News as a Preferred Source

शुक्रवारी (7 ऑक्टोबर 2025) रात्री काढण्यात आलेल्या या वरातीची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकर आपला आनंद कशाप्रकारे साजरा करतील हे सांगता येत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

कुठे काढण्यात आली ही आगळीवेगळी वरात?

कोल्हापूरातील गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकीपर्यंत नवदांपत्य संकेत आणि पूजा माने यांच्या वरातीने शुक्रवारी रात्री सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनोखे वैशिष्ट्य म्हणजे या वरातीसाठी वधू-वर दोघांना चक्क ‘जेसीबीच्या बकेटमध्ये’ बसवण्यात आले होते. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत डीजेच्या ठेक्यावर मोठ्या आनंदाने ही वरात घरापर्यंत गेली. ज्यामुळं खऱ्या अर्थानं 'लग्नाची वरात थेट JCB तून आली दारात' असं म्हणायला हरकत नाही.

महत्त्वाचं म्हणजे नव दांपत्य संकेत आणि पूजा हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. संकेत माने हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून, पूजा माने यांनी बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. संकेत यांचे वडील राजेश दत्तात्रय माने हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या तब्बल चार जेसीबी आहेत. केवळ हौसेपोटी या जेसीबींपैकी एक जेसीबी मशीन खास वरातीसाठी वापरण्यात आली होती. कमाल आहे ना? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

हेसुद्धा वाचा : Reel Vs Real : काही गोष्टी व्हायरल न झालेल्याच बऱ्या; लव्हाळवाडी गावाची अवस्था पाहून असंच म्हणाल... 

नवरदेव आणि नववधू बकेटमध्ये बसून वरातीसह मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी या कमाल वरातीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले इतकंच काय, तर ही वेगळी वरात पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात काय, तर पुन्हा एकदा 'नादखुळा' हा शब्द इथं कोल्हापूरकरांसाठी सिद्ध झाला. दिवभराच्या कामातून वेळ काढून घरी परतणाऱ्या अनेकांच्या नजरा या वरातीनं वेधल्या आणि नकळत एक कुतूहलपूर्ण हास्य या मंडळींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. तुमच्या सोशल मीडिया फीडमध्येही या वरातीला एखादा रील येत्या काही दिवसांत येतोय बघा!!!

FAQ

कोल्हापूरमध्ये कोणती अनोखी लग्न वरात घडली?
कोल्हापूरमध्ये एका लग्नसोहळ्यात नवदांपत्याची वरात थेट JCB च्या बकेटमध्ये बसून काढण्यात आली. यामुळे जिल्हाभर चर्चा सुरू आहे आणि कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसते हे पुन्हा सिद्ध झाले.

ही वरात कधी आणि कुठे काढण्यात आली?
ही वरात शुक्रवारी (7 ऑक्टोबर 2025) रात्री कोल्हापूरातील गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकीपर्यंत काढण्यात आली. 

नवदांपत्य कोण आहेत?
नवदेव संकेत माने हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, तर नववधू पूजा माने यांनी बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More