कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द झाल्याची पावती आली समोर, LIVE कार्यक्रमात यातीलही बनवाबनवी झाली उघड!

Koregaon Park land deal: पावती लाईव्ह कार्यक्रमात दाखवत असताना एक गंभीर चूक झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या निदर्शनाल आलीय.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 7, 2025, 07:47 PM IST
कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द झाल्याची पावती आली समोर, LIVE कार्यक्रमात यातीलही बनवाबनवी झाली उघड!
जमीन व्यवहार रद्द झाल्याची पावती

Koregaon Park land deal: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या जागेवर पार्थ पवार आणि त्यांच्या अमेडिया कंपनीने सरकारला फसवून डल्लाच मारल्याचा मोठा घोटाळा 'झी २४ तास' ने उडकीस आणला. ऐवढेच नाही त; या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर २४ तास लक्ष वेधून साऱ्या सरकारी यंत्रणांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाग पाडले. त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतो आहे, तो केवळ 'झी २४ तास'च्या व्यापक, आक्रमक स्टाइलमुळे जेमतेच ४८ तासांच्या आताच कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द झालाय. व्यवहार रद्द झाल्याची पावती  झी 24 तासच्या हाती लागली. 

Add Zee News as a Preferred Source

व्यवहार रद्द पावती लाईव्ह कार्यक्रमात दाखवत असताना एक गंभीर चूक झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या निदर्शनाल आलीय. 500 रुपयांच्या स्टॅम्पवर जो व्यवहार झाला त्यात शितल तेजवानी यांचं नाव होतं. पण पावती रद्द करण्याच्या पावतीत शितल तेजवानी यांचं नाव नाहीय.  याचं उत्तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. झी 24 तासने आधीची आणि नंतरची अशा दोन्ही पावत्या समोर आणल्या आहेत. याच शितल तेजवानी विरोधात एफआयर आहे. त्याच मुख्य आरोपी असताना त्यांचं नाव यातून वगळलं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

काय म्हणाले अजित पवार?

कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 'कोणी कोणाची फसवणूक केली. याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं. कोणाचे फोन गेले होते. कुणी दबाव आणला होता का. आणला होता तर कोणी आणला होता. अधिकाऱ्यांनी असं कसं गेलं. याची चौकशी होईल,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.'मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता. मला माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं. मी नेहमी सांगतो जे काही असेल ते नियमानुसार करा. नियमाच्या बाहेर जाऊन कोणीही काही केलेले मला चालणार नाही. मी माझ्या कार्यालयातही प्रत्येक अधिकाऱ्यालाही विचारलं की तम्ही डीसीएम ऑफिसला फोन करुन दबाव आणला का. कोणीही कोणावर दबाव आणला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.'ही जमीन सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ती पूर्वीची महार वतनाची जमीन आहे. याबाबत चौकशी होईल. असं असताना इतर नोंदणी झाली कशी. कोणी केलं कोण त्याला जबाबदार आहे याची चौकशी होईल. तीन लोकांची एफआयरमध्ये नाव टाकली गेली आहे. त्यांची पण चौकशी केली जाईल, या कंपनीत पार्थ पवार असताना त्यांचं का नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले ज्यांनी कार्यालयात येऊन सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

पार्थ पवारांना अभय ?

झी 24 तासनं कोरेगाव परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केला, दरम्यान यानंतर आता गुन्हे दाखल व्हायला सुरूवात झालीय. मात्र, या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना अभय देण्यात आलंय का?; असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.. कारण या प्रकरणात मुद्रांक शुक्ल विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. अमेडिया कंपनीतील भागिदार दिग्विजय पाटील, जमीनिची विक्री करणा-या शीतल तेजवानीसह दुय्यम निबंधक रवींद्र पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पार्थ पवारांविरोधात गुन्हा न दाखल झाल्यामुळे अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. कंपनीत ९९ टक्के शेअर्स असताना देखील पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय..तर दुसरीकडे गुन्हा दाखल न केल्यास पोलिसांविरोधात अॅक्शन घेणार असल्याचा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिलाय.. मात्र, या प्रकरणात समिती नेमली असून ती समिती 7 दिवसात आपला अहवाल देणार आहेत. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More