'झी 24 तास'च्या बातमीचा महाइम्पॅक्ट, कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द होणार!

Koregaon Park land deal:पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 7, 2025, 07:08 PM IST
'झी 24 तास'च्या बातमीचा महाइम्पॅक्ट, कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द होणार!
कोरेगाव जमिन व्यवहार रद्द

Koregaon Park land deal: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या जागेवर पार्थ पवार आणि त्यांच्या अमेडिया कंपनीने सरकारला फसवून डल्लाच मारल्याचा मोठा घोटाळा 'झी २४ तास' ने उडकीस आणला. ऐवढेच नाही त; या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर २४ तास लक्ष वेधून साऱ्या सरकारी यंत्रणांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाग पाडले. त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतो आहे, तो केवळ 'झी २४ तास'च्या व्यापक, आक्रमक स्टाइलमुळे जेमतेच ४८ तासांच्या आताच कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द झालाय.

Add Zee News as a Preferred Source

या प्रकरणात पार्थ पवार, त्यांची कंपनी आणि शीतल तेजवानी कशा दोषी आहेत, याचे हवे तेवढे पुरावा दाखवल्यानेच हा व्यवहार अमेडिया कंपनीकडून रद्द करण्यात आलाय. सरकारकडून हा व्यवहार रद्द करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नसल्याने शेवटी अमेडिया कंपनीच कॅन्स्लेशन डिड' देऊन व्यवहारातून माघार घेणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. व्यवहार थांबवून चक्क माघार घेण्यासाठी अमेडिया कंपनीकडून कडून केली कायदेशी प्रक्रिया केलीय. हा जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पार्थ पवारांना अभय ?

झी 24 तासनं कोरेगाव परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केला, दरम्यान यानंतर आता गुन्हे दाखल व्हायला सुरूवात झालीय. मात्र, या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना अभय देण्यात आलंय का?; असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.. कारण या प्रकरणात मुद्रांक शुक्ल विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. अमेडिया कंपनीतील भागिदार दिग्विजय पाटील, जमीनिची विक्री करणा-या शीतल तेजवानीसह दुय्यम निबंधक रवींद्र पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पार्थ पवारांविरोधात गुन्हा न दाखल झाल्यामुळे अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. कंपनीत ९९ टक्के शेअर्स असताना देखील पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय..तर दुसरीकडे गुन्हा दाखल न केल्यास पोलिसांविरोधात अॅक्शन घेणार असल्याचा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिलाय.. मात्र, या प्रकरणात समिती नेमली असून ती समिती 7 दिवसात आपला अहवाल देणार आहेत. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय.

अजित पवार काय म्हणाले? 

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न झाल्याप्रकरणी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. पार्थ पवारवर गुन्हा दाखल का नाही? यामागचं कारण अजित पवारांनी सांगितलंय. माझं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांच्याशी बोलणं झालं. ऑफिसला येऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मला मिळाल्याचे अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More