बोगस मतदाराला आमदार पुत्राने पळवला? बुलढाण्यातल्या घटनेची राज्यभरात चर्चा!

Buldhana Politics: बोगस मतदान करताना काही कार्यकर्त्यांनी एका इसमाला पकडलं आणि चांगलाच चोप दिला.

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 2, 2025, 10:15 PM IST
बोगस मतदाराला आमदार पुत्राने पळवला? बुलढाण्यातल्या घटनेची राज्यभरात चर्चा!
बोगस मतदार

Buldhana Politics: बुलढाण्यात संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी एका बोगस मतदाराला पळवल्याचा आरोप होतोय. एका व्हिडिओत बोगस मतदाराला काही कार्यकर्ते चोपतांना दिसतायत. मात्र, त्याच वेळी आमदार पुत्र कुणाल गायकवाड हे घटनास्थळी पोहोचतात आणि बोगस मतदाराला पळवून जाण्यास मदत करताना दिसतायत.नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

बोगस मतदान करताना काही कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिला.आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी एवढी माणसं असताना तसंच पोलिसही असताना हा बोगस मतदार पळाला कसा?बुलढाण्याचे आमदार महोदय संजय गायकवाडांचे पुत्र दबंग स्टाईलनं घटनास्थळी बुलेटवर पोहोचलेत. आणि त्यांनीच या बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप होतोय. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते या बोगस मतदाराला चोप देतायत मात्र, त्याचवेळी या ठिकाणी कुणाल गायकवाड पोहोचतात आणि एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तिन ते चार वेळा तिथून धूम ठोकण्यासाठी कुणाल गायकवाड हे बोगस मतदाराला सांगताना दिसतायत. 

एवढंच नव्हे घटनास्थळी पोलीस आल्यानंतर बोगस मतदार हा कुणाल गायकवाड यांना मिठी मारतोय. त्यावेळी पोलिसांकडे बोगस मतदाराला न देता उलट पोलिसांनाच कुणाल गायकवाड यांच्या कार्यकर्त्यानं पकडलं आणि बोगस मतदाराला पळू जाण्यास मदत केल्याचं व्हिडिओत दिसतंय. दरम्यान या व्हिडिओनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.

सत्ताधा-या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बोगस मतदारांद्वारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय, तर अनेकांकडे बोगस मतदान कार्ड आणि आधार कार्ड आढळल्याचा आरोपही करण्यात आलाय.

बुलढाण्यातील बोगस मतदाराला पळण्यासाठी कुणाल गायकवाड यांनी मदत केल्याच्या आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसतायत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं संजय गायकवाड यांच्यावर टीका केलीय.

बुलढाणाच नव्हे तर राज्यभरात अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत.. मात्र, कुणाल गायकवाडांनी बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप धक्कादायक आहे. एखाद्या बोगस मतदाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं, मात्र आमदार महोदयांच्या पुत्रानं थेट बोगस मतदाराला मदत केल्याचा आरोप होतोय. गंभीर बाब म्हणजे आमदार पुत्राच्या कार्यकर्त्यानं चक्क पोलिसाला देखील अडवलं, त्यामुळे व्हायरल व्हिडिओत जे दिसतंय त्याआधारावर संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांच्यावर कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागलंय.

FAQ 

प्रश्न : बुलढाण्यातील बोगस मतदार प्रकरण नेमकं काय आहे?

उत्तर : बुलढाणा नगरपालिका निवडणुकीदरम्यान (२ डिसेंबर २०२५) एका संशयित बोगस मतदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडले आणि चोप दिले. मात्र, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे घटनास्थळी बुलेटवर पोहोचले आणि बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये ते बोगस मतदाराला ३-४ वेळा पळण्यास सांगताना दिसत आहेत.

प्रश्न : व्हिडिओमध्ये कुणाल गायकवाड यांनी नेमकं काय केलं?

उत्तर : व्हिडिओनुसार, बोगस मतदाराला कार्यकर्ते चोपत असताना कुणाल गायकवाड पोहोचले आणि त्याला पळवण्यासाठी मदत केली. पोलिस आल्यानंतर बोगस मतदाराने कुणाल यांना मिठी मारली, तर कुणाल यांच्या कार्यकर्त्याने पोलिसांना अडवले आणि बोगस मतदाराला पळू दिले. काँग्रेसचा आरोप आहे की कुणाल यांनी पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी दिली.

प्रश्न : या प्रकरणावर काय कारवाई होणार आहे?

उत्तर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेनेही संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. प्रशासनाने बोगस मतदान रोखण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची अपेक्षा आहे, पण अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More