महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी!

ladaki Bahin: अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाबाबत शंका होती.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 11, 2025, 02:55 PM IST
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी!
लाडकी बहीण

ladaki Bahin: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची माहिती आहे. दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. सप्टेंबर 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होत असून, यंदाच्या दिवाळीपूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरली आहे. त्यामुळे आताच मोबाईलवर मेसेज तपासा. 

Add Zee News as a Preferred Source

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाबाबत शंका होती; पण सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केल्याने ही प्रक्रिया गतिमान झाल्याचे म्हटले जात आहे. 

ई-केवायसी केलात का?

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून, ज्यांनी ती पूर्ण केलेली नाही त्यांनाही हा हप्ता मिळाला आहे. यामुळे योजनेचा लाभ अधिक व्यापक झाला आहे.ई-केवायसीद्वारे कुटुंबाच्या उत्पन्नाची (अडीच लाखांपेक्षा कमी) तपासणी होत असल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे योजनेचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल.

सामाजिक न्याय योजनांवर परिणाम 

सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 3960 कोटी रुपये मंजूर केले असून, सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी निधी केवळ या प्रवर्गांसाठीच वापरला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 14 हप्त्यांचे वितरण झाले आहे. सप्टेंबरच्या हप्त्यासह प्रत्येक लाभार्थ्याला 1500 रुपये मिळतील.

FAQ

प्रश्न: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर 2025 चा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळेल?

उत्तर: सप्टेंबर 2025 चा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल, ज्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या आणि न केलेल्या महिलांचा समावेश आहे. योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. तथापि, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही.

प्रश्न: योजनेच्या निधीसाठी कोणत्या विभागाचा पैसा वापरला गेला आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर: सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वळवण्यात आला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे या विभागाला आपल्या योजनांसाठी निधी वापरताना काटकसर करावी लागेल.

प्रश्न: लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी का आवश्यक आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांवर काय परिणाम होतो?

उत्तर: ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न (अडीच लाखांपेक्षा कमी) तपासले जाते. ही प्रक्रिया पूर्ण करणे योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक आहे. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. कठोर निकषांमुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत असून, यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपुरताच मर्यादित राहील.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More