महिला टीसी - पोलिसांना महिला प्रवाशांकडून मारहाण
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय
अंबरनाथ : टीसीवरींल मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नम्रता शेंडगे या महिला टीसीला महिलांनीच मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीय. मीनल घुले या महिलेकडे तिकीटाची मागणी केली असता या महिलेने टीसीसोबत वाद घालायला सुरुवात केली.
या वादात महिला पोलीस अनिता कांबळे यांनी हस्तक्षेप करताच त्यांनाही बेदम मारण्यात आलं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय.
अधिक वाचा - कल्याण-डोंबिवलीकरांचे चार तास मेगा हाल
अधिक वाचा - दोन वेगवेगळ्या घटनांत रेल्वे टीसींना बेदम मारहाण
दोन दिवसांपूर्वी बांद्रा आणि किंग्ज सर्कलमध्येही दोन पुरुष टीसींना मारहाणीची घटना घडली होती. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये महिला टीसीला महिलांनीच मारहाण झाल्याचं समोर आलंय. याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.