कोकणात अनेक गावांवर दरड कोसळण्याची शक्यता

कोकणात अनेक डोंगरांना भेगा जाण्याच्या घटना वाढल्यात.

Updated: Aug 12, 2019, 07:25 PM IST
कोकणात अनेक गावांवर दरड कोसळण्याची शक्यता title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणात अनेक डोंगरांना भेगा जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी गावांवर डोंगर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकणातली शेकडो गावातील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.

कोकणात बहुतांश गावं ही डोंगरांच्या पायथ्याला आहेत. एकेकाळी गावकऱ्यांचा आधार असलेले हे डोंगर आता गावांचा घास घेतायत की काय अशी स्थिती आहे. गेल्या महिन्याभरात एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात ३० ठिकाणी डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 

चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यातल्या अनेक गावांना डोंगरांपासून धोका निर्माण झाला आहे. खचणाऱ्या डोंगरांमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

ज्या गावांशेजारी डोंगर खचतायत त्या गावांमध्ये सर्व्हेक्षण करण्याची गरज आहे. डोंगर का कोसळू लागलेत याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची गरज आहे. अन्यथा माळीणसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.