नागपूर : शहरात चार दिवसांपूर्वी दाखल झालेला बिबट्या (Leopard) मंगळवारी थेट महाराजबाग  प्राणीसंग्रहाल जवळच्या परिसरात दिसल्याने एकच  खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून या बिबट्याची नागपूर शहरात भ्रमंती सुरु आहे. तो शहराच्या इतका आत आल्यानं  आता वनविभागाचीही झोप उडाली आहे. या बिबटला पकडण्यासाठी आता मोठी मोहीम वनविभागानं हाती घेतली आहे. विविध ठिकाणी त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. महाराजबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि गस्त वाढविली आहे. (Leopard safari in Nagpur city)


पकडण्यासाठी लावण्यात आले पिंजरे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्या मार्गावर विविध ठिकाणी पिंजरे ठेवण्यात आलेय. या पिंज-यांमध्ये कोंबड्या ठेवण्यात आल्यात आहेत. शिवाय ट्रॅप कॅमेरेही वाढविण्यात आले आहे. साधरणपणे उन्हाळ्यात वन्यजीव प्रेमी  सफारीसाठी जंगलाकडे  जातात. मात्र लॉकडाऊनमुळं सध्या सफारी बंद आहे.  वन्यप्रेमी घरात आहे. मात्र आता एक बिबट्याच नागपूर शहरात पोहचला आहे.  तोच शहारत गेल्या चार दिवसांपासून  सफारी करत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी  गायत्रीनगर परिसरात हा बिबट्या पहिल्यांदा दिसला होता.त्यानंतर आय़टी पार्कमध्ये त्याचा वावर सीसीटीव्हीत चित्रीत झाला होता. मात्र दोन दिवस  त्यांच्या वास्तवाचे  पुरावे न दिसल्याने  हा बिबट्या अंबाझरी जैविविधता उद्यानाकडे परल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र सोमवारी सर्वांनाच धक्का बसला. 


बजाजनगर परिसरात बिबट्याा दिसल्याचं समोर आलं. त्यानंतर गायत्रीनगरपासून  आयटीपार्क, व्हीएनआटी, बजाजरनगर अशी भ्रमंती करत हा बिबट्या  सोमवारी चक्क महाराजबाग प्राणीसंग्रहालय परिसरात दिसल्यानं एकच खळबळ उडाली आहे..तो महाराजबाग नजिकच्या एका पुलाच्या कठड्यावर दिसला.त्यानंतर त्याच्या शोधासाठी या परसिरात मोठी मोहिम वनविभागानं  राबवली नाही. मात्र पुन्हा या बिबट्यानं हुलकावणी दिली.त्याचे हा परिसरात पगमार्कही शोधण्यात आले. दरम्यान यानंतर महाराजबाग परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहरात इतक्या आतपर्यंत हा बिबट्या पोहचल्यानं नागरिकांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडालेली आहे. सर्वांचेच अंदाज चुकवत आणि गुंगारा देत या बिबट्याचा शहरातील वावर आता चिंता वाढवणारा आहे.