Maharashtra Breaking News Today LIVE: कोणाचा बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 January 2026: राज्यातील पालिकांसंदर्भातील प्रत्येक घडामोड यासह देश आणि विदेशातील प्रत्येक बातमीचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या. 

Pooja Pawar | Jan 10, 2026, 21:13 PM IST
twitter
Maharashtra Breaking News Today LIVE: कोणाचा बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 10 January 2026: राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वत्र प्रचार अगदी जोरात सुरु आहे.  एकीकडे ठाकरे बंधूंच्या सभा तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. दरम्यान नेते एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करतायत.  राज्यातील पालिकांसंदर्भातील प्रत्येक घडामोड यासह देश आणि विदेशातील प्रत्येक बातमीचा आढावा एका क्लिकवर येथे जाणून घ्या. 

10 Jan 2026, 21:10 वाजता

डॉ.संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात

डॉ.संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असूनपहाटे पाच वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट ३ चे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. 

10 Jan 2026, 19:42 वाजता

पनवेल मधील शहरी भागात भाजप चा प्रचार जोरात

पनवेल मद्ये ग्रामीण भागा पेक्षा शहरी भागात प्रचाराचा जोर वाढलेला पहायला मिळत आहे,शहरात कॉस्मोपॉलटीयन लोक संख्या असल्याने भाजप पक्षाने या भागात प्रचार जास्त जोर मारला असून,प्रचार रॅली, चॉक सभा , नेत्यांची रॅली चे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे

10 Jan 2026, 19:40 वाजता

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर मार्गावर एका चारचाकी वाहनाने घेतला अचानक पेट

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर मार्गावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला आहे. वाहन चालक सुखरूपरीत्या बाहेर पडले असून कुणालाही दुखापत झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गाडीला लागलेली आग विजवण्याचे प्रयत्न केले. 

10 Jan 2026, 19:14 वाजता

कोणाचा बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम

कोणाचा बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही,आमच्या सारखे लोक या ठिकाणी आहेत,हे कदापि आम्ही सहन करणार नाही,असा इशारा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपाला दिला आहे.भाजपाचे नेते अण्णामलाई यांनी "बॉम्बे इज नोट महाराष्ट्र सिटी"असं विधान केलं आहे.या विधानावरून संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमटत असून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी देखील अण्णामलाई यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतलाय. 

10 Jan 2026, 19:14 वाजता

मुंबई महापलिकेसाठी उद्या महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार 

मुंबई महापलिकेसाठी उद्या महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित होणार असून बीकेसीमधील एमसीए मध्ये जाहीरनामा सकाळी ११ः३० वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे. यात मुंबईबाबत आकर्षक घोषणा होण्याची शक्यता आहे. 

10 Jan 2026, 15:47 वाजता

सांगलीत महाविकास आघाडीच्या काळया फिती लावून प्रचार

चांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना आता काळ्याफिती लावून प्रचार करण्याची वेळ आली आहे.महापालिका निवडणुकीत प्रचारा दरम्यान सत्ताधारी भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप करत सांगलीवाडी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून काळ्या फिती लावून प्रचार करण्यात येत आहे.सांगलीवाडीच्या प्रभाग क्रमांक 13 येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होत आहे. 

मात्र सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून आणि नेत्यांकडून प्रभागातील मतदारांना, नागरिकांना धमकवण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत त्याचा निषेध म्हणून काळ्याफिती बांधून आपण प्रचार करत असल्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून सांगण्यात आले आहे

10 Jan 2026, 15:47 वाजता

लातूर मनपा निवडणुकीत 17 अपक्षांचा शिंदे गटात प्रवेश

लातूर  मनपा निवडणुकीत 17 अपक्षांचा शिंदे गटात प्रवेश केला असून यामुळे आता वादाला तोंड फुटलं आहे. पक्षप्रवेशावर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा थेट विरोध केला असून एकनाथ शिंदेंची दिशाभूल करून प्रवेश झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. स्थानिक नेतृत्वाला डावलून निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केलाय.   मनपा निवडणुकीआधीच शिंदे गटातील अंतर्गत कलह उघड झाला आहे. यामुळे लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

10 Jan 2026, 14:19 वाजता

मुख्यमंत्री फडणवीस सोलापुरात दाखल, सिद्धरामेश्वरांचे घेतले दर्शन 

महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेच्या अगोदर घेतले सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वरांचे दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस दर्शनानंतर हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

10 Jan 2026, 13:15 वाजता

चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीर केला वचननामा

चंद्रपूर शहर मनपाची 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपला वचननामा जाहीर केला. जलस्त्रोतांचे बळकटीकरण, मुबलक पार्किंग सोयी, शहर सुशोभीकरण यासह शहरातील बायपास रस्ता उभारणे यासह विविध मुद्द्यांवर यात भर दिला गेलाय. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे आणि आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. 

10 Jan 2026, 13:12 वाजता

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर मंदिर आजपासून तीन महिने बंद

दृष्टीने आवश्यक भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या विकासकामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण पूर्ण करण्यासाठी ९ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे.