Live Now

Breaking LIVE: मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान वेळापत्रकात बदल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 Oct 2025: आज काय विशेष? जाणून घ्या दिवसभरात राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकं काय घडणार...

Breaking LIVE:   मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान वेळापत्रकात बदल
11 October 2025 09:41 PM (IST)

मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान वेळापत्रकात बदल

मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. मेट्रो मार्गिका 7 (Dahisar East to Gundavali) आणि मेट्रो मार्गिका 2A (Dahisar East To D N Nagar) या मार्गावर सिस्टम इंटिग्रेशन (System Integration) आणि सेफ्टी ट्रायल्स (Safety Trials) सुरू असल्याने 12 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सकाळच्या सेवांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

Metro Red Line Extension Project : लाल मार्गिका विस्तार प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा
ही सुधारणा 'लाल मार्गिका विस्तार' प्रकल्पातील एक निर्णायक पाऊल आहे. अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान प्रवासासाठी हे काम अत्यावश्यक असल्याच मेट्रोने म्हटलं आहे. सध्या मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, लाईन 9 चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. RDSO (Research Design and Standards Organisation) ची तपासणी 23 सप्टेंबर 2025 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन (Trial Run) सुरू आहेत.

Mumbai Metro Schedule Adjustment : 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान सकाळच्या वेळेत बदल
या काळात मेट्रो सेवा नेहमीपेक्षा उशिरा सुरू होतील. काही प्रमुख बदल पुढीलप्रमाणे आहेत:

डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते गुंदवली पहिली मेट्रो

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01

शनिवार 07:00

रविवार 07:04 वाजता

डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते अंधेरी पश्चिम

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:06

शनिवार 06:58

रविवार 06:59

दहिसर पूर्व (Dahisar East) ते अंधेरी पश्चिम

सोमवार ते शुक्रवार सकाळी 06:58

शनिवार आणि रविवार 07.02

दहिसर पूर्व (Dahisar East) ते गुंदवली

सोमवार ते शुक्रवार – सकाळी 06.58

शनिवार 07:06

रविवार 07:01

अंधेरी पश्चिम (Andheri West) ते गुंदवली

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01

शनिवार 07:02

रविवार 07:04

प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne App, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि स्थानकांवरील माहिती फलक तपासावेत, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

महा मुंबई मेट्रोने सर्व प्रवाशांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. हे प्रणाली एकत्रीकरण हे मेट्रो मार्गिका 9 च्या पहिल्या टप्प्याच्या कार्यान्वयनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लवकरच गुंदवली ते मिरा रोड दरम्यान थेट आणि सुसंगत मेट्रो सेवा सुरू होणार असून, पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद (Fast) आणि सोयीस्कर (Convenient) होणार आहे.

11 October 2025 08:26 PM (IST)

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर येथे सद्गुरु विठोबा महाराज चातुर्मासे गुरुभक्त परिवार, पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल चरणी १०८ पानांचा सुवर्ण तुळस हार अर्पण करण्यात आला. या सुवर्ण तुळस हाराचे एकूण वजन ११.१७० मिली ग्रॅम असून त्याची किंमत रु. १,२२,०००/- इतकी आहे. या दानाचे औचित्य साधून गुरुभक्त परिवाराच्या वतीने मंदिर समितीला हार समर्पित करण्यात आला. या प्रसंगी समिती सदस्य जळगावकर महाराज यांच्या हस्ते हार स्वीकारण्यात आला तसेच गुरुभक्त परिवाराचा सत्कार करण्यात आला.

11 October 2025 06:08 PM (IST)

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील निर्वि येथे जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून जमिनीचा ताबा घेण्यावरून हा दोन गटात वाद झालाय, या मारहाणीत दोन्ही गटातील महिला आणि पुरुष एकमेकांना लाठी काठी आणि कोयत्याने एकमेकांना मारहाण करताना दिसत असून या मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या वादा नंतर शिरूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवरती सध्या शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत

11 October 2025 06:04 PM (IST)

Crime News : हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग...नागपुरातील निवासी परिसरातील धक्कादायक घटना 

11 October 2025 06:03 PM (IST)

Uddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूड

11 October 2025 06:01 PM (IST)

'कबुतराची हत्या म्हणजे भगवान शंकरावर हल्ला'; जैन धर्मसभेत सुरेश महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य

11 October 2025 04:53 PM (IST)

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्टिव मोडवर आले आहेत. त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध पदाधिका-यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत जागा वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतील नगरसेवकांमध्येच जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

11 October 2025 04:12 PM (IST)

कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस शिपाई इब्रार इनामदार बडतर्फ; बनावट नोटा छापल्याचे प्रकरण 

एक कोटी अकरा लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारा मुख्य सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस शिपाई इब्रार इनामदार याला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आल आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने इब्रार इनामदार याला बडतर्फ केले आहे. सांगली पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपये रकमेच्या पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार यांच्यासह चौघांना अटक केली. 

11 October 2025 03:09 PM (IST)

ज्यांच्यावर संकट आल् तो शेतकरी समाधानी आहे का ? हा प्रश्न आहे. मी स्वतः पाहणी केलीय, तुमच्या माध्यमातून देशाने पहिली. जमिनी खरडवून गेल्या आहेत.   खालचे दगडगोटे वाहून गेले आहेत. आयुष्य वाहून गेलंय. किमान 50 हजार हेक्टरी मदत मिळावी, ही शेतकऱ्याची मागणी आहे. बँक त्याला कर्ज देईल का ? जमीन पूर्ववत करणे आणि पूर्ण कर्ज माफी द्यावी. सरकारने पालकत्वाची भूमिका घ्यावी. पंतप्रधान आले, पण त्यांना कल्पना दिलीय की नाही माहित नाही, पण ते इथे येऊन काहीच बोलले नाही. राज उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येतील, महाराष्ट्राच्या प्रश्नावर , संकटाच्या वेळी दोन्ही भाऊ एकत्र येऊ असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. 

11 October 2025 02:16 PM (IST)

विरोधी पक्ष नेमणूक करायला कायदा लागतो मग 2 उपमुख्यमंत्री कसे? उद्धव ठाकरे 

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतक-यांसाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत. संभाजीनगरात शिवसेना UBTचा हंबरडा मोर्चा निघाला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघला. यावेळी बोलताना ते म्हणाले  मला सांगा हे म्हणता विरोधी पक्ष नेमणूक करायला कायदा लागतो मग 2 उपमुख्यमंत्री कसे, आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानणार नाही ते कायदेशीर नाही. 

11 October 2025 01:41 PM (IST)

मनसे पदाधिका-यांनी महिलेला कानशिलात लगावली

 
मनसेच्या महिला पदाधिका-यांनी एका परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावली. ठाण्यातील कळवा परिसरात ही घटना घडली. लोकलमधून उतरताना अर्जुन काटे यांचा एका महिलेला धक्का लागला. यावेळी त्यांनी तात्काळ माफी मागितली. मात्र त्या महिलेने रागाच्या भरात शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसंच मराठी भाषेबाबत अपशब्दांचा वापर केला. या घटनेनंतर अर्जुन काटे यांच्या पत्नी आणि मनसेच्या महिला पदाधिकारी स्वरा काटे यांनी परप्रांतीय महिलेच्या घरी जाऊन तिच्या कानशिलात लगावली. तसंच मराठी भाषेबाबत अपशब्द वापरल्यास धडा शिकवला जाईल, अशी धमकीही देण्यात आली.

11 October 2025 01:09 PM (IST)
11 October 2025 12:46 PM (IST)

रस्त्यांवर फटाकेविक्रीला बंदी, परवानाधारक विक्रेत्यांसाठीही नियमावली

दीपावलीची चाहूल लागली की कंदील, दिवे, उटणे या दिवाळीच्या साहित्यासह फटाकेविक्रीची दुकाने रस्त्यारस्त्यांवर, गल्लोगल्ली दिसू लागतात. अशाप्रकारे फटाक्यांची विक्री करणे अवैध असतेच, शिवाय ते धोकादायकही असते. त्यामुळेच यंदा मुंबई महापालिकेने शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर होणाऱ्या फटाकेविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने परिपत्रक जाहीर केले असून अशाप्रकारे विनापरवाना फटाकेविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अधिकृत परवानाधारक फटाके विक्रेत्यांनाही काही नियम तसेच ते फोडण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री, बेकायदा व्यवसाय असल्याचे मुंबई महापालिका आणि पोलिस नेहमीच सांगतात. मात्र ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. प्रदषणास कारणीभूत ठरणारे फटाके करतानाच, १४५ डेसिबलच्या पातळीचे फटाके उत्पादन आणि विक्रीस मनाई केली जाते. 

11 October 2025 12:05 PM (IST)

शिवसेना UBTचा संभाजीनगरात हंबरडा मोर्चा 

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतक-यांसाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत... थोड्याच वेळात संभाजीनगरात शिवसेना UBTचा हंबरडा मोर्चा निघणार आहे..उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे...संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होईल..  सरसकट कर्जमाफीसह शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होत आहे... तसेच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा दावा पक्षाने केलाय... त्यामुळे आता शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत..

11 October 2025 11:35 AM (IST)

नाशिक महापालिका भाजप स्वबळावर लढणार?

नाशिकमध्ये महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता

नाशिक शहरात भाजपकडे सर्व प्रभागात उमेदवार असल्याने ताकदवान

मुख्यमंत्री यांनी जिथे महायुती शक्य तिथेच एकत्र अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

नाशिकमध्ये संपूर्ण जागांवर लढा तरच 100 पेक्षा अधिक जागा मिळतील असे आवाहन

11 October 2025 11:03 AM (IST)
11 October 2025 10:57 AM (IST)

सावंतवाडीत शाळेच्या कँटीनमध्ये स्फोट, उडाला आगीचा मोठा भडका

सावंतवाडी बांदा येथील शाळेच्या कँटीनमध्ये अचानक स्फोट झाला.  स्फोटानंतर कँटीनमध्ये आगीचा मोठा भडका उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने स्फोटाच्या वेळी कँटीन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले.   स्फोटामागील कारणांचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाल. 

11 October 2025 10:27 AM (IST)

Breaking News LIVE Updates : मोठी बातमी! राज ठाकरे यांची मविआत एंट्री?

आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटीही वाढल्यात. अशातच आता राज ठाकरेंची महाविकास आघाडीतही एंट्री झालीय का अशी चर्चा सुरु झालीय. कारण महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेही या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे 13 ऑक्टोबरला ठाणे मनपावर शिवसेना UBT आणि मनसेचा एकत्रित मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत राज ठाकरेंची एंट्री झालीय का अशा चर्चांना उधाण आलंय. 

11 October 2025 10:20 AM (IST)

Breaking News LIVE Updates : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत  एका महिलेचा संशयास्पद मृत्यू

वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत  एका महिलेचा संशयास्पद मृत्यू. तिच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या खुणा असल्याने हा मृत्यू आहे की, यामागे काही कट आहे या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. सुनीता मधुकर भोयर असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा आकाश भोयर व सून प्राजक्ता हे  मुंबईला गेले होते. सुनीता एकट्याच घरी होत्या. आकाश व त्यांची पत्नी घरी परतले. घरी पोहोचल्यावर घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे ते मागील दारातून आत गेले. त्यांना दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन बघितला वर सर्व प्रकार उघडकीस आला. 

11 October 2025 10:06 AM (IST)

Breaking News LIVE Updates : कल्याणमध्ये सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

कल्याण खडकपाडा परिसरातील  हायप्रोफाईल सोसायटी मधील धक्कादायक घटना. सोसायटीमधील सुरक्षारक्षकाकडून अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड. इमारतीच्या लिफ्टमध्ये मुलगी येत असताना केले अश्लील चाळे. इमारतीतील रहिवाशांना माहिती पडताच संतप्त  रहिवाशांनी वॉचमनला चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात. अमोल जगताप असं सुरक्षा रक्षणाचं नाव असून, कल्याण खडकपाडा पोलिसांत या प्रकरणाची नोंद. 

11 October 2025 09:50 AM (IST)

'त्या' रात्री नेमकं काय घडलं? अखेरीस सैफनं चाकू हल्ल्याबद्दल सोडलं मौन, ट्रोलर्सनाह दिलं चोख उत्तर!

 

11 October 2025 09:08 AM (IST)

Breaking News LIVE Updates : अमली पदार्थ तस्करीत 100 कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या टोळीशी निगडित असलेल्या फैजल जावेद शेख व अलफिया फैजल शेख या दोघांनी अमलीपदार्थाच्या व्यवहारातून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या शोधासाठी ईडीने मुंबईत बुधवारी केलेल्या छापेमारीत 100 कोटींच्या बेनामी व्यवहारांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी 41 लाखांची रोख, 3 सेकंड हँड आलिशान गाड्या, मालमत्तांची कागदपत्रे, बँक लॉकरची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.गेल्या काही वर्षापासून या दोघांनी अमलीपदार्थ विक्रीतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांचा शोध आता ईडीने सुरू केला आहे. कुख्यात अमलीपदार्थ तस्कर सलिम डोला याच्या माध्यमातून हे दोघे जण हा व्यवसाय करत होते. अमलीपदार्थ विक्री प्रकरणात डोला याचा शोध सुरू असून, त्याची माहिती देणाऱ्यास एनसीबीने बक्षीसही जाहीर केले. दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या फैजल याला 2023 मध्ये एनसीबीने अटक केली असून, त्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले होते. मात्र, तेथून तो सक्रिय होऊ नये यासाठी त्याला चेन्नई कारागृहात हलविण्यात आले आहे.

11 October 2025 09:01 AM (IST)
11 October 2025 08:37 AM (IST)

Railway Megablock: मुंबईकरांनो लक्षात घ्या! रविवारी कोणत्या मार्गावर ब्लॉक? टाईमटेबल बघूनच घराबाहेर पडा 

 

11 October 2025 08:26 AM (IST)
11 October 2025 08:24 AM (IST)

Breaking News LIVE Updates : 'आपण स्वत: सहभागी होऊन...' राऊतांचं फडणवीसांना पत्र? कारणही स्पष्ट...

'निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. 14 ऑक्टोबर 12.30 वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे,' अशी माहिती संजय राऊत यांनी X पोस्टच्या माध्यमातून दिली. 

11 October 2025 07:27 AM (IST)

Hardik Pandya Birthday: हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात! करवाचौथच्या दिवशी दिली प्रेमाची कबुली! जाणून घ्या कोण आहे ती मिस्ट्री गर्ल 

 

11 October 2025 07:09 AM (IST)

Breaking News LIVE Updates : म्हाडाच्या 5,354 घरांची सोडत

म्हाडा कोकण मंडळाच्या ठाणे आणि वसईतील 5 हजार 354 सदनिकांच्या विक्रीसाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणारेय. तर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 77 भूखंड विक्रीचीही सोडत यावेळी निघणार आहे. या सोडतीसाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह 1 लाख 58 हजार 424 अर्ज आहेत. 

11 October 2025 07:02 AM (IST)

Breaking News LIVE Updates : 'ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात झाली नाही'- उद्धव ठाकरे

बेस्ट सोसायटी निवडणुकीत पराभवानंतर शिवसेना UBTचा शुक्रवारी मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ठाकरेंनी पदाधिका-यांना पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही. पराभव हा कायमस्वरूपी नसतो असा कानमंत्र दिला. तसेच ठाकरे ब्रँडला अजुन सुरुवात झाली नसून सुरुवात झाली की बघा तुमचा कसा बँड वाजतो ते असं म्हणत  सत्ताधा-यावर निशाणा साधलाय.

 

11 October 2025 07:01 AM (IST)

Breaking News LIVE Updates : ठाण्यात मनसे, शिवसेना UBTचा एकत्र मोर्चा

ठाण्यात नागरिकांच्या समस्यांसंदर्भात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहे. येता 13 तारखेला मासुंदा तलाव ते  ते महापालिका भवन मार्गावर असणार हा भव्य मोर्चा असेल.

 

11 October 2025 07:00 AM (IST)

Breaking News LIVE Updates : पूरग्रस्त शेतक-यांसाठी ठाकरे मैदानात 

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतक-यांसाठी ठाकरे मैदानात उतरले असून शनिवारी संभाजीनगरात शिवसेना UBTचा हंबरडा मोर्चा निघणार आहे. द्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे...सरसकट कर्जमाफीसह शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होत आहे... तसेच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा दावा पक्षाने केलाय... त्यामुळे आता शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत.

 

11 October 2025 06:59 AM (IST)

Breaking News LIVE Updates : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु 

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार, वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचा अजित पवार यांच्याकडून पाहणी. महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित. 

वारजेनंतर अजित पवार शिवणे नांदेड़ सिटी पुलाची पाहणी करून धायरीत येतील तिथे धायरी तील ट्रँफिक समस्या सोडवण्यासाठी डिपी रोड बनवण्याची अनेक दिवसांची मागणी हे त्याच प्रस्तावित धायरी डीपी रोड ची अजित पवार पाहणी करतील नंतर काञज चौकातील उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतील...थोडक्यात अजित पवार मनपा इलेक्शनच्या तोंडावर खडकवासला भागातील रस्ते समस्यांचा आढावा घेताना दिसताहेत. 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Sayali Patil

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव आहे. 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांपासून त्यांनी पत्रकारितेतील कारकिर्दीस सुरुवात केली. जिथं विविध विषय हाताळत त्यांनी भाषेवर प्रभुत्त्वं मिळवलं. 'इंडियन एक्स्प्रेस' समुहाच्या 'लोकसत्ता' वृत्तपत्रातील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं याशिवाय लोकप्रभा या मासिकासाठीसुद्धा त्यांनी लेखन केलं. पुढे लोकसत्ता डिजीटलसाठी (Loksatta.com) काम केलं. जिथं मनोरंजन, चित्रपट समीक्षण आणि देश- विदेश क्षेत्रातील बातम्यांसाठी त्यांनी योगदान दिलं.

कारकिर्दीची सुरुवात

लोकसत्तानंतर त्यांनी झी 24तासच्या डिजिटल टीममध्ये नव्या कारकिर्दीची सुरुवात करत राजकारण आणि महाराष्ट्रासह इतर विषयांवरील पकड मजबूत केली. 'एबीपी माझा' वाहिनीच्या संकेतस्थळासाठीसुद्धा त्यांनी काम केलं. ज्यानंतर 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत या अनुभवाचा वापर त्यांनी कारकिर्दीच्या नव्या टप्प्यासाठी केला. विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. 

शैक्षणिक पात्रता 

मुंबई विद्यापीठाच्या BMM अर्थात बॅचलर ऑफ मास मिडीयाचं पदवी शिक्षण असणाऱ्या सायली पाटील यांनी, प्रामुख्यानं मराठी पत्रकारितेत योगदान दिलं. मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रभुत्त्वासह हिंदी भाषेवरही त्यांचं प्रभुत्वं आहे.

अनुभव आणि हातखंड

प्रवास, मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.

Read More