Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 13 october 2025: राज्याबरोबरच देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेत आहोत. ताजे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा...

Maharashtra Breaking News Today LIVE: बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा
13 October 2025 10:31 PM (IST)

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये आरक्षणासाठी उपोषण...

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये आरक्षणासाठी उपोषण

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे या ठिकाणी वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं. या मागणीसाठी तीन तरुणांनी उपोषण उपोषण केलं. अकरा दिवस चाललेलं हे उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. उपोषण सोडण्याआधी धनंजय मुंडे यांनीही फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. सरकारला हैदराबाद गॅझेटप्रमाणे वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावंच लागेल. अशी भूमिका मुंडेंनी मांडली.

13 October 2025 10:29 PM (IST)

निवडणूक लढण्याचा स्थानिक पातळीवर निर्णय- देवेंद्र फडणवीस ...

निवडणूक लढण्याचा स्थानिक पातळीवर निर्णय- देवेंद्र फडणवीस 

आगामी निवडणुकीच्या संदर्भात लढण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत उत्तम यश मिळेल. कोण कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही असं देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं आहे. 

13 October 2025 09:46 PM (IST)

बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा...

बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा

बीडमध्ये छगन भुजबळांची महाएल्गार सभा होणार आहे. ओबीसीचे सर्व नेते महाएल्गार सभेला उपस्थित राहणार आहेत. मागील आठवड्यातच होणार होती महाएल्गार सभा मात्र पाऊस असल्याने एल्गार सभा रद्द करण्यात आली होती.  17 ऑक्टोबरला होणार सभा. 

13 October 2025 08:52 PM (IST)

राड्यानंतर पुण्यातील नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी पोलीस आयुक्तांची भेट घेणार...

राड्यानंतर पुण्यातील नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी पोलीस आयुक्तांची भेट घेणार 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण  विद्यार्थी सेनेच्या आज पुण्यात झालेल्या राड्या नंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात. उद्या सकाळी पुणे पोलीस आयुक्त यांची 11.30 वाजता घेणार भेट.

13 October 2025 08:05 PM (IST)

राज, उद्धव ठाकरेंबाबत हायकमांड निर्णय घेणार- नाना पटोले...

'राज, उद्धव ठाकरेंबाबत हायकमांड निर्णय घेणार'- नाना पटोले

राज, उद्धव ठाकरे युतीबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीय. राज आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास  त्याबद्दल हायकमांड निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले म्हणालेत. जिथे आघाडी होईल तिथे एकत्र नाहीतर स्वबळावर निवडणूक लढू असं नाना पटोले म्हणालते. 

13 October 2025 07:12 PM (IST)

दहावी -बारावीचं वेळापत्रक जाहीर...

दहावी -बारावीचं वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारीख जाहीर झाल्या आहेत. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च  दहावीची परीक्षा. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च बारावीची परीक्षा. 

13 October 2025 06:51 PM (IST)

आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या 50 टक्के तरुणांना संधी- शरद...

आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या 50 टक्के तरुणांना संधी- शरद पवार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार. शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत घोषणा. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देतील यासाठी प्रयत्न करा. पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या सूचना. 

13 October 2025 06:21 PM (IST)

कन्नन गोपीनाथांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...

कन्नन गोपीनाथांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

दिल्लीमध्ये माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झालाय. यावेळी  काँग्रेसचे सरचिटणीस  के.सी. वेणुगोपाल आणि पक्ष नेते पवन खेरा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश संपन्न झाला.

13 October 2025 05:44 PM (IST)

जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसींची बाईक रॅली...

जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसींची बाईक रॅली

जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसी समाजाच्यावतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सहभागी यांनी सहभाग घेतला होता. परतूर रेल्वे स्थानक येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली तर तहसील कार्यालयावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

13 October 2025 05:04 PM (IST)

अभाविपविरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक, कार्यालयाला ठोकलं टाळं...

अभाविपविरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक, कार्यालयाला ठोकलं टाळं

पुण्यातील वाडिया कॉलेज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बायकॉट मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरविरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं. मनसे विद्यार्थी सेनेची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान जे पोस्टर लावण्यात आलेले ते आपण लावलंच नसल्याचं अभाविपने म्हटलंय.

13 October 2025 04:33 PM (IST)

बीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार?...

बीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका ? मुंबई काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची एकमताने मागणी केल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्र याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेसच मनसे सोबत कुठली तडजोड न करण्याचे धोरण सुत्रांची माहिती.

 

13 October 2025 04:02 PM (IST)

आगामी निवडणुकीबाबत फडणवीसांचं मोठं विधान ...

आगामी निवडणुकीबाबत फडणवीसांचं मोठं विधान 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत फडणवीसांनी मोठं विधान केलंय. त्यामुळे महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. जिथे शक्य, तिथे युती होणार. जिथे शक्य नाही, तिथे समोरासमोर लढू. परिस्थितीचा विचार करुन निर्णय घेणार. तर मुंबई महापालिकेचा आढावा पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत दिलीय. 

13 October 2025 03:35 PM (IST)

सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार ...

सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार 

सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार. शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार. उद्या उद्धव ठाकरे-राज ठाकरे आणि पवारांची एकत्र पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

13 October 2025 02:58 PM (IST)

ठाण्यात शिवसेना UBT, मनसेचा एकत्र मोर्चा ...

ठाण्यात शिवसेना UBT, मनसेचा एकत्र मोर्चा 

ठाण्यात आज मनसे आणि शिवसेना युबीटीचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असताना ठाण्यात शिवसेना UBT आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झालेत. या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणीप्रश्नासह पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र येत मोर्चा काढणार आहे. थोड्याच वेळात ठाण्यातील गडकरी रंगायतनपासून महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या आहे. सोबतच कळवा, दिवा भागात नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे.या सर्व प्रश्नांवर दोन्ही ठाकरे एकत्र येऊन आवाज उठवत आहे.

13 October 2025 02:18 PM (IST)

दिवाळीनंतर OBC आंदोलन चारपट वाढेल- लक्ष्मण हाके...

दिवाळीनंतर OBC आंदोलन चारपट वाढेल- लक्ष्मण हाके

2 सप्टेंबरच्या जीआरवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा अन्यथा ओबीसींची मते विसरा असा हाके म्हणालेत. तसंच जीरआर रद्द न केल्यास दिवाळीनंतर ओबीसींचं आंदोलन हे चारपट वाढणार असल्याचंही हाके म्हणालेत.

13 October 2025 01:41 PM (IST)

...

13 October 2025 01:36 PM (IST)

मी असे काहीही बोललो नाही; राऊतांचा मेसेज...

मी असे काहीही बोललो नाही; राऊतांचा मेसेज

मी असे काहीही बोललो नाही, असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पाठवल्याचं वृत्त आहे. सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचे मेसेजमध्ये खासदार संजय राऊत यांनी म्हटल्याचं, सूत्रांची माहिती आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे नेत्यांची नाराजी व्यक्त केल्यानंतर राऊतांनी ही भूमिका घेतली आहे. 

13 October 2025 01:26 PM (IST)

संजय राऊतांच्या त्या विधानामुळे राज ठाकरेंच्या मनसेत नाराजी...

संजय राऊतांच्या 'त्या' विधानामुळे राज ठाकरेंच्या मनसेत नाराजी

राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मनसेमध्ये नाराजी आहे. मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

13 October 2025 12:43 PM (IST)

काँग्रेसशी जुळवून घेत मनसे महाविकासआघाडीत? संदीप देशपांडेंनी सगळंच सांगून...

काँग्रेसशी जुळवून घेत मनसे महाविकासआघाडीत? संदीप देशपांडेंनी सगळंच सांगून टाकलं

उद्या निवडणूक आयोगाच्या भेटीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे. उद्याची बैठक फक्त निवडणुका पारदर्शकतेपणे व्हावी यासाठी आम्ही एकत्र येतोय. एवढाच प्रश्न आहे. महाविकास आघाडी बाबतची भूमिका आमचे प्रमुख राजसाहेब ठाकरे मांडतील. काँग्रेसबाबतची भूमिका आम्ही अद्याप मांडलेली नाही. राज ठाकरे किंवा प्रवक्ते यावर बोलतील, असं देशपांडेंनी स्पष्ट केलं. आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असंही ते म्हणाले.

13 October 2025 12:19 PM (IST)

...

13 October 2025 12:15 PM (IST)

संजय राऊत फोर्टीस रुग्णालयात दाखल...

संजय राऊत फोर्टीस रुग्णालयात दाखल

उद्धव ठाकरेंच्या शिसवेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत रूटीन चेकअपसाठी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात गेले आहेत.

 

13 October 2025 11:16 AM (IST)

...

13 October 2025 10:39 AM (IST)

संजय राऊतांचं मोठं विधान...

संजय राऊतांचं मोठं विधान

राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याची इच्छा आहे संजय राऊतांचं मोठं विधान

13 October 2025 10:35 AM (IST)

बदलापूरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का...

बदलापूरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीची घोषणा झाली आहे. मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बादलापुरात नेते आणि परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांची भेट घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच हा युतीचा प्रयोग झाल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

13 October 2025 10:29 AM (IST)

विद्यार्थिनींनी रात्री उशिरा बाहेर पडू नये; बलात्कार प्रकरणात ममतांच्या...

विद्यार्थिनींनी रात्री उशिरा बाहेर पडू नये; बलात्कार प्रकरणात ममतांच्या वक्तव्याने वाद

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी वसतिगृहाचे नियम पाळावेत आणि रात्री उशिरा बाहेर जाऊ नये, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केले. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला असून भाजप, काँग्रेस, माकपच्या नेत्यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली. दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ओडिशातील एका विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री मैत्रिणीबरोबर जेवायला बाहेर गेली असताना सामूहिक बलात्कार झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले. यावरुन भाजपा आणि माकपाने मुख्यमंत्र्‍यांवर निशाणा साधला आहे.

13 October 2025 10:27 AM (IST)

राज्यात पुन्हा उन्हाचा ताप आणि उकाडा...

राज्यात पुन्हा उन्हाचा ताप आणि उकाडा

मोसमी पावसाने माघार घेतल्यापासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही पुन्हा उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, सकाळपासूनच दमट वातावरण असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्याच्या काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. तर आणखी काही भागातून पाऊस माघार घेण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दरम्यान, ‘शक्ती’ चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे.

13 October 2025 10:20 AM (IST)

...

13 October 2025 09:21 AM (IST)

...

13 October 2025 08:38 AM (IST)

शेअर बाजारावर दररोज 17 कोटी सायबर हल्ले...

शेअर बाजारावर दररोज 17 कोटी सायबर हल्ले

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज(एनएसई) दररोज तब्बल 17 कोटी सायबर हल्ल्यांचा सामना करत आहे. तरीदेखील, व्यवहार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी 'सायबर योद्ध्यांची' टीम 24 तास कार्यरत असते, असे एनएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान एका दिवशी सर्वाधिक 40 कोटी सायबर हल्ले एनएसईवर झाले होते. परंतु, अत्याधुनिक  सुरक्षा तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे प्रणालीवर कोणताही परिणाम झाला नाही. आमच्या तांत्रिक टीम आणि विशेष सॉफ्टवेअरमुळे हे हल्ले निष्फळ ठरतात, असे एनएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

13 October 2025 08:38 AM (IST)

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, मुख्य प्रवक्तेपदी सावंत...

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, मुख्य प्रवक्तेपदी सावंत

महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात प्रदेश कॉग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे राजकीय घडामोडी समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. या समितीमध्ये आमदार ज्योती गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार अस्लम शेख, अमीन पटेल, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, माजी आ. नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांचा समावेश आहे. कोषाध्यक्ष अस्लम शेख, तर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अमीन पटेल, अशोक जाधव यांची नियुक्ती केली आहे.

13 October 2025 08:37 AM (IST)

जालना : परतूरमध्ये आज ओबीसींचा मोर्चा...

जालना : परतूरमध्ये आज ओबीसींचा मोर्चा

लक्ष्मण हाके, वाघमारे, मंगेश ससारणेंसह ओबीसी नेते मंडळींची उपस्थिती आजच्या ओबीसी मोर्चाला राहणार आहे. परतूर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा असणार आहे. यात ओबीसी बांधव मोटरसायकल रॅली काढणार आहेत. सकाळी 11 वाजता मोर्चाला होणार सुरुवात होईल.

13 October 2025 07:47 AM (IST)

कबुतरांसाठी धर्माच्या.. मोदींचं नाव घेत ठाकरे सेनेचा टोला; फडणवीस सरकारने...

'कबुतरांसाठी धर्माच्या..' मोदींचं नाव घेत ठाकरे सेनेचा टोला; 'फडणवीस सरकारने अध्यादेश काढून जैनांवरील..'

13 October 2025 07:24 AM (IST)

राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; तरुणी 40 फूट दरीत कोसळली, रात्री रेस्क्यू...

राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; तरुणी 40 फूट दरीत कोसळली, रात्री रेस्क्यू मोहिम यशस्वी

राजगड किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. राजगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या अंजली पाटील  हिला मधमाश्यांच्या हल्ल्यापासून बचाव करताना 40 फूट खोल दरीत कोसळल्याने गंभीर दुखापत झाली. तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याने ती हालचाल करू शकत नव्हती. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस आणि रेस्क्यू टीम मध्यरात्री धाडसी रेस्क्यू मोहीम राबवली. निसरडा उतार आणि अंधारात 8 ते 9 तासांच्या प्रयत्नांनंतर तिला सुरक्षितपणे खाली आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे.

13 October 2025 06:47 AM (IST)

 ठाण्यात मनसे-शिवसेनेचा सरकारविरोधात धडक मोर्चा...

 ठाण्यात मनसे-शिवसेनेचा सरकारविरोधात धडक मोर्चा

आज दुपारी 3 वाजता ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेचा सरकार विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

 

13 October 2025 06:45 AM (IST)

बिहार विधानसभेचं एनडीएचं जागावाटप जाहीर...

बिहार विधानसभेचं एनडीएचं जागावाटप जाहीर

बिहार विधानसभेचं एनडीएचं जागावाटप जाहीर झालं आहे. भाजप 101 जागा लढणार असून जेडीयूसुद्धा 101 जागांवर निवडणूक लढणार आहे. एलजेपी 29 जागा लढणार आहे तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा 6 जागा लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. बिहारचे भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे.

 

13 October 2025 06:45 AM (IST)

मनसेची आज मुंबईत बैठक...

मनसेची आज मुंबईत बैठक

मनसेची आज मुंबईत बैठक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांची शिवतीर्थवर बैठक बोलावली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

13 October 2025 06:41 AM (IST)

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन...

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

प्रलंबीत आर्थिक मागण्यांसाठी एस.टी. कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरु आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून (महाराष्ट्र राज्य) हे आंदोलन केलं जात आहे.

13 October 2025 06:41 AM (IST)

राज-उद्धव यांच्यासंदर्भात बाळा नांदगावकरांचं मोठं विधान...

राज-उद्धव यांच्यासंदर्भात बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये संवाद वाढतोय. आगामी काळात दोघे एकत्र येण्यासाठीच भेटीगाठ होत असल्याचा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकरांना व्यक्त केला आहे.

13 October 2025 06:38 AM (IST)

मविआमध्ये मनसेला जागा द्यायची की नाही? काँग्रेस आज घेणार निर्णय?...

मविआमध्ये मनसेला जागा द्यायची की नाही? काँग्रेस आज घेणार निर्णय?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आज महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. प्रभारी रमेश चेन्नीथलांसह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आज टिळक भवनात काँग्रेसकडून पीएसी बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत मनसेच्या मविआतील सहभागाबाबत चर्चेची शक्य आहे.

13 October 2025 06:38 AM (IST)

पश्चिम बंगालमध्ये चेंगराचेंगरी; अनेक जखमी...

पश्चिम बंगालमध्ये चेंगराचेंगरी; अनेक जखमी

पश्चिम बंगालमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली असून यामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बर्धमान रेल्वे स्टेशनवरच्या 4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ही दुर्घटना घडली. रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा ब्रिज चढत असताना, एक महिला तोल जाऊन ब्रिजच्या पाय-यांवर पढली. त्यामुळे इतर तिघांचाही तोल जाऊन ते पाय-यांवर पडले. यामुळे इथे चेंगराचेंगरी झाली. 

13 October 2025 06:37 AM (IST)

बारामतीत पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही...

बारामतीत पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही

> प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनी घेतला दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
> शरद पवारांच्या बारामतीतल्या गोविंदबाग निवासस्थानी यंदा दिवाळी सण साजरा होणार नाही.
> दरवर्षी बारामतीत पवार कुटुंबियांकडे मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो. 
> दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बारामती येत असतात.

13 October 2025 06:34 AM (IST)

फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा घेणार आढावा. यासोबतच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश पुंडकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

13 October 2025 06:34 AM (IST)

आता अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष पेटला? तालिबानचे 200 सैनिक मारल्याचा...

आता अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष पेटला? तालिबानचे 200 सैनिक मारल्याचा पाकिस्तानचा दावा

अफगाणिस्तानातील तालिबान सैन्याने शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचे आणि पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी काबूलवर केलेल्या हवाई हल्ल्याचा हा बदला असल्याचे म्हटले आहे. आम्ही तालिबानचे 200 सैनिक मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

 

13 October 2025 06:33 AM (IST)

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला...

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला

बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाच्या लगत असलेल्या गायरान परिसरात रात्री अचानक एका टोळक्याने लाकडी दांडे, धारदार शस्त्रांसह, दगडाने सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक महिला अती गंभीर असून एकूण चार महिला जखमी आहेत. खोक्या भोसले हिची पत्नी देखील जखमी झाली आहे. सध्या जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

13 October 2025 06:33 AM (IST)

ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडियाने पुन्हा गुडघे टेकले, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा...

ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडियाने पुन्हा गुडघे टेकले, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 विकेट्सने पराभव केला. भारताचा वर्ल्ड कप 2025 मधील हा सलग दुसरा पराभव होता. ऑस्ट्रेलियाला भारताने 331 धावांचं आव्हान दिलं होतं. महिला क्रिकेट वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला.

Add Zee News as a Preferred Source