Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: आयटीआयमध्ये शिकवले जाणार मंत्रविधी

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 18 October 2025: गुंड निलेश घायवळने परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलाचे शैक्षणिक शुल्क कसे भरले याची चौकशी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केली. चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत मध्यरात्री चर्चा झाली.

Maharashtra Breaking News Today LIVE:   आयटीआयमध्ये शिकवले जाणार मंत्रविधी
18 October 2025 09:56 PM (IST)

आयटीआयमध्ये शिकवले जाणार मंत्रविधी 

नाशिक शहरात पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात वैदिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणात लागतील. ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारतर्फे नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रशिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडविण्याचा हा प्रयत्न आहे. याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी विरोध केलाय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वराच्या स्थानिक पुरोहितांनी याला विरोध दर्शविला आहे.

18 October 2025 08:32 PM (IST)

दारू पिण्याच्या वाद पेटला,मित्रांनीच मित्राला दगडाने ठेचून...  ...

दारू पिण्याच्या वाद पेटला,मित्रांनीच मित्राला दगडाने ठेचून...'  

सांगलीच्या औद्योगिक वसाहत मध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे.रोहित आवळे वय,22 असे या तरुणाचं नाव आहे. दारू पिण्याच्या वादातून रात्रीच्या सुमारास रोहित याच्या मित्रांकडूनच रोहितचा दगडाने ठेचून हा निर्घृण खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे.या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे.मात्र या खुनाच्या घटनेने संजयनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

18 October 2025 07:50 PM (IST)

...

विरोधकांनी फटाके पुरत राहावे निवडणुकीनंतर आम्ही फोडू- मंत्री गिरीश महाजन

विरोधकांनी फटाके पुरत राहावे निवडणुकीनंतर आम्ही फोडू, या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी प्रश्नांमध्ये जे कोणी आडवे येथील त्यांना आडवा केले जाईल. बघूया पुढे काय काय होतं ते कोण कुणाला आडवं करतं कोण कोणाला उभ करत. कोणीही वाइटावर असेल किंवा कोणीही चांगल्या वर असेल त्याची चिंता आम्हाला नाही. आम्ही लोकांची काम करतो आहोत जनतेचा आशीर्वाद आम्हाला असल्याचे ते म्हणाले.

18 October 2025 07:04 PM (IST)

...

मुलगी बघण्यासाठी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा अपघातात मृत्यू

तीन वाहनामध्ये झालेल्या अपघातात मुलगी बघण्यासाठी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. तर सात जन गंभीर जखमी झाले. नांदेड नागपूर राष्ट्रीय महार्गावर हदगाव तालुक्यात हा अपघात घडला. लातूर येथील देगुरे कुटुंब सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोज साठी मुलगी बघण्यासाठी चंद्रपूरला जात होते. मनोज स्वतःच गाडी चालवत होता. हदगाव शहारापासून 8 किलोमीटर असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी फिरणाऱ्या जे सी बी आणि नांदेडकडून आर्णीकडे जाणाऱ्या आयचर टेम्पोमध्ये आणि देगुरे कुटुंबाच्या गाडीमध्ये विचित्र अपघात घडला. ही तिन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. यात गाडी चालवणारा मनोज आणि त्याची बहीण मंजुषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर देगुरे कुटुंबातील सात जन आणि आयचर टेम्पो चालक असे आठ जन गंभीर जखमी झाले.

18 October 2025 06:09 PM (IST)

भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं? ...

'भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं?' 

भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बीडच्या सभेत भुजबळांनी दाखवायला नको हवा होता.मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका असा सल्ला नवनाथ वाघमारे यांनी भुजबळांसह वडेट्टीवार यांना दिला आहे.भुजबळांच्या मनात काय आहे आम्हाला काही कळेना असं म्हणत सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अस वाघमारे म्हणालेत.

18 October 2025 05:23 PM (IST)

लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी...

लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी

दिवाळी सणा निमित्त मुंबईतून अनेक जण आपल्या गावी जात असतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत असते यावर्षी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांना जाण्यासाठी प्रशासनाने चांगली तयारी केली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस च्या बाहेर मोठे तंबू लावण्यात आले आहे त्याचबरोबर प्रवाशांसाठी इतर सुविधा देण्यात आल्या आहेत प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून ही रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगळ्या तसेच जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांच्या रांगा वेगवेगळ्या आहेत.त्यामुळे प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यावर बसण्याची झुंबड उडत नाही आर पी एफ चे अधिकारी कर्मचारी रांगेतच प्रवाश्यांना सोडतात.

18 October 2025 04:40 PM (IST)

108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभार, रुग्ण अत्यावस्थेत...

108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभार, रुग्ण अत्यावस्थेत

सांगली जिल्ह्यातल्या 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय झाली आहे.रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना घेऊन जाताना रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.कुपवाड शहरातल्या बामणोली येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. एक तरुण कामावर जात असताना चक्कर येऊन पडला त्यानंतर संबंधितांनी 108 रुग्णवाहिकाला याची माहिती दिल्यानंतर अर्ध्या तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली,त्यानंतर संबंधित रुग्णाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्या.मात्र या दरम्यान रुग्णाची प्रकृती ही आणखी गंभीर बनले.

18 October 2025 04:13 PM (IST)

रायगडच्या शाळेला खासदार सुनील तटकरे यांचं नाव...

रायगडच्या शाळेला खासदार सुनील तटकरे यांचं नाव

रायगडच्या इंदापुरातील माध्यमिक शाळेला खासदार सुनील तटकरे यांचं नाव देण्यात आलंय. शाळेच्या नावाचा सुनील तटकरे नवजीवन विद्यामंदिर असा विस्तार करण्यात आला आहे. या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या नवीन वर्ग खोल्यांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

18 October 2025 02:56 PM (IST)

...

18 October 2025 02:19 PM (IST)

मतदारयाद्यांतील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाचे आदेश...

मतदारयाद्यांतील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाचे आदेश

विरोधकांनी ज्या ठिकाणी मतदार यादी घोळ आरोप केले त्यासंद्रभात स्थाविक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. मतदारयाद्यांतील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या समोर विरोधी पक्षांनी मतदार यादी बाबत आरोप केले त्याची माहिती रिपोर्ट कलेक्टर कडून घेतली जाणार केलेल्या आरोप यांची तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

18 October 2025 01:44 PM (IST)

येवल्यात शिवसेना UBTची बैठक संपन्न...

येवल्यात शिवसेना UBTची बैठक संपन्न

नाशिकच्या येवल्यात शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..... आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती..... या बैठकीत संपर्कप्रमुख जयंत दिंडे,  यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी   मार्गदर्शन केलं...

18 October 2025 12:37 PM (IST)

...

18 October 2025 12:33 PM (IST)

जंजीरा या शासकीय निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातील...

जंजीरा या शासकीय निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि पदाधिकार्यांसोबत तातडीची बैठक 

पंचायत समिती, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संसदीय पक्षाचे नेतेखासजार श्रीकांत शिंदे घेणार बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी साधणार संवाद. 

 पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांच्या कामाचा घेणार आढावा .  मंत्री दादा भुसे यांचे शासकीय निवासस्थान बी-3, जंजिरा बंगला येथे बैठकीला काही वेळात होणार सुरवात

18 October 2025 11:42 AM (IST)

...

18 October 2025 11:26 AM (IST)

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 मृत्यू, 3 गंभीर जखमी...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 मृत्यू, 3 गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जऊळका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डव्हा गावाजवळ रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारवरील नियंत्रण चालकाच्या हातातून सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.या भीषण अपघातात म्यानमार येथील दोघांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.एक जण किरकोळ जखमी आहे.प्राथमिक माहितीनुसार, ही इनोव्हा कार मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.त्यांनी जखमींना वाशीम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

18 October 2025 10:57 AM (IST)

...

18 October 2025 10:56 AM (IST)

‘जर तो फिट असता तर...’, शमीवर अगरकरांची थेट प्रतिक्रिया; सगळ्यांसमोर केला...

‘जर तो फिट असता तर...’, शमीवर अगरकरांची थेट प्रतिक्रिया; सगळ्यांसमोर केला खुलासा 

18 October 2025 10:36 AM (IST)

साई संस्थानच्या 47 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल...

साई संस्थानच्या 47 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल

शिर्डीच्या साईं संस्थान प्रशासनातून धक्कादायक प्रकार समोर. साई संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल. साई संस्थानच्या अख्यारीत असणाऱ्या साई आश्रममधील 77 लाख 13 हजारांहून अधिक रकमेचे विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल. उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार तक्रारदार संजय काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. 2022 मध्ये करण्यात आली होती चोरीच्या प्रकरणासंदर्भात याचिका दाखल. 

 

18 October 2025 10:30 AM (IST)

...

18 October 2025 10:28 AM (IST)

अक्कलकोट- गाणगापूर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय ...

अक्कलकोट- गाणगापूर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय 

अक्कलकोट स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 20 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक,पालखी,मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 ते रात्री 9 असे 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी मंदिर खुला राहणार आहे.पहाटे पासून दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. दु.1 वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे

दिवाळी सुट्टयांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीत कुटुंब एकत्र येण्याचा काळ आहे.हा काळ सत्कर्णी लागावा आणि भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावा यासाठी या दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे,मुंबईसारख्या महानगरासह देशभरातून अपार श्रद्धेने स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येत असतात.भक्तांना दर्शन सुलभरीत्या मिळावे याकरिता दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 16 ऑक्टोबरपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या कालावधीत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे 3 ते रात्री 11 असे नियमितपणे 20 तास खुले राहणार आहे.

18 October 2025 10:24 AM (IST)

मराठी माणसाच्या संघर्षात ठाकरे बंधू एकत्र- संजय राऊत ...

मराठी माणसाच्या संघर्षात ठाकरे बंधू एकत्र- संजय राऊत 

राज- उद्धव ठाकरे एकत्र काम करतील. हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा. शरद पवार हेही राज्याची अस्मिताच. मराठी माणसाच्या संघर्षात ठाकरे बंधू एकत्र. किंबहुना सोबत राहण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र. 

 

18 October 2025 09:47 AM (IST)

हा नेता देणार शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार...

'हा' नेता देणार शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार

सांगोलामध्ये शेकाप नंतर आता पालकमंत्री जय कुमार गोरे शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार. 2024 विधानसभा उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सोबत सांगोला मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांची होणार भेट. 

18 October 2025 09:47 AM (IST)

60 वर्षीय व्यक्तीकडे बीएआरसीची बनावट कागदपत्र ...

60 वर्षीय व्यक्तीकडे बीएआरसीची बनावट कागदपत्र 

मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतील वर्सोवा परिसरातून अख्तर हुसैनी नावाच्या 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून बनावट बीएआरसी (भाभा अणु संशोधन केंद्र) ओळखपत्रे, बनावट कागदपत्रे आणि अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याने बनावट बीएआरसी कागदपत्रे का तयार केली हे शोधण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे: मुंबई गुन्हे शाखेचे

18 October 2025 09:17 AM (IST)

नांदेड जिल्ह्यात विहिरीच्या पाण्यातून विषबाधा...

नांदेड जिल्ह्यात विहिरीच्या पाण्यातून विषबाधा

विहिरीतील पाणी पिल्याने काही गावाकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीये. अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे काही जणांना काल दुपारी उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला. 70 ते 75 जणांना त्रास सुरु झाल्याने माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. तात्काळ आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचले. विहिरीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आरोग्य अधिकारी संगीता देशमुख आणि पथक गावात असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

18 October 2025 08:46 AM (IST)

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी! खोबरे 500 रुपये किलोवर...

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी! खोबरे 500 रुपये किलोवर

दक्षिणेकडील राज्यांत नारळाचे उत्पादन कमी झाल्याने चार महिन्यांपासून नारळ, तसेच गोटा खोबऱ्याचे दर तेजीत आहेत... त्यातच दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढल्याने पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये एक किलो खोबऱ्याचे भाव ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत...दिवाळीत लागणाऱ्या वाणसामानाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहेत. हरभरा डाळींसह सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून खोबऱ्याचे दर तेजीत आहेत. दिवाळीत करंजी, चिवड्यासाठी गोटा खोबऱ्यालामागणी असून, किरकोळ बाजारात पाव किलो गोटा खोबऱ्यासाठी १२० रुपये मोजावे लागत आहे

18 October 2025 08:45 AM (IST)

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना सरकारचा मदतीचा हात ...

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना सरकारचा मदतीचा हात 

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील 21 लाख 66 हजार 198 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1356 कोटी मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे... तसेच, जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या 15 लाख 45 हजार  हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख २५ हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे.. नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल असं मदत व पुनर्वसन मंत्रीमकरंद जाधव-पाटील यांनी सांगितलंय..

18 October 2025 07:07 AM (IST)

बीडमधील महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेवर टीका...

बीडमधील महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेवर टीका

बीडमधील महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेवर टीका केलीय.. त्यांच्या टीकेला जरांगेंनीही उत्तर दिलंय... राज्याचा  7/12 तुमच्या नावावर आहे का? असा सवाल करत जरांगेंवर भुजबळांनी टीका केलीय.. तर त्यांच्या टीकेला जरांगेंनी उत्तर दिलंय.. 

18 October 2025 07:06 AM (IST)

भुजबळांची विखे पाटलांवर टीका ...

भुजबळांची विखे पाटलांवर टीका 

छगन भुजबळांनी बीडमधली महाएल्गार मेळाव्यातून वारंवार जरांगेंना भेटणा-या विखे पाटलांवरही टीका केलीय.. नेहमी तुम्ही जरांगेंना का भेटता त्यामुळे  आम्हाला तुम्हालाही बघावं लागेल असा इशारा भुजबळांनी विखेंना दिलाय.. तसेच जरांगेंच्या समर्थनार्थ बोलणा-या भाजप नेत्यांनाही भुजबळांनी इशारा दिलाय... 

18 October 2025 07:06 AM (IST)

ठाकरे बंधू-भगिनींचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल ...

ठाकरे बंधू-भगिनींचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

ठाकरे बंधू-भगिनींचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय... आदित्य ठाकरेंनी आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केलाय... मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्यात दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र आले होते...

18 October 2025 07:01 AM (IST)

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र...

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

मनसेच्या दीपोस्तवानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले होते... मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन पार पडलं... यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आल्याचं पाहायला मिळालं... या दीपोत्सवाच्या उद्धाटनाआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी गेले होते... यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये दिलखुलास गप्पासुद्धा रंगल्या होत्या...मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवानं ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलं... दिवाळीच्या पहिला दिवशी दीपोत्सवाला सुरुवात करण्याची मनसेची परंपरा...यंदा या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे हजर होते....ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यांत साठवण्यासारखा होता..पण या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय अँगलही होता...यावेळी उद्धव ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

17 October 2025 09:31 PM (IST)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच

विरोधकांच्या शिष्टमंडळाने मतदार याद्यांमधील घोळामुळं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परंतु राज्य निवडणूक आयोग निवडणुका पुढे ढकलणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

17 October 2025 09:27 PM (IST)

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ...

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ

सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3  हजार 600 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 35 हजार 300 रुपयांवर पोचलेले आहेत.चांदीच्या दरात मात्र कुठलेही वाढ झालेली नसून चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 78 हजार रुपये एवढे आहे.

17 October 2025 09:26 PM (IST)

...

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

करियरची सुरुवात

वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी

शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.

लेखन शैली आणि दृष्टीकोन

संशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.

विशेषज्ञानाची क्षेत्रे

ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

Read More