Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, नवी मुंबईतल्या उलवेतील धक्कादायक घटना

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 July 2025: आज दिवाळीचा शेवटचा दिवस असून राज्यभरात भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा.

Maharashtra Breaking News Today LIVE: एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, नवी मुंबईतल्या उलवेतील धक्कादायक घटना
23 October 2025 11:06 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : सुरतमधील कापड मार्केट 15 दिवस बंद

सूरतमधील कापड मार्केट 15 दिवसांसाठी ठप्प झाले आहे.  छट पूजा आणि बिहार निवडणुकांमुळे  सूरत कापड मार्केटमध्ये काम करणारे बिहारी कामगार मोठ्या प्रमाणात गुजरात सोडून बिहारमध्ये परतत आहेत. सूरतमधील कापड युनिट्समध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशातील स्थलांतरित मजूर काम करतात. कापड गिरण्यांमध्ये दिवाळीची सुट्टी 5 ते 6 दिवसांची असते. मात्र यावर्षी मजुरांच्या कमतरतेमुळे आणि बिहार निवडणुकीमुळे ती 12 ते 15 दिवसांपर्यंत वाढणार आहे.

23 October 2025 11:04 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : उद्धव ठाकरेंचा 27 ऑक्टोंबरला मुंबईत मेळावा

येत्या 27 ऑक्टोबर रोजी वरळी डोम येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन  करणार आहेत. 'निर्धार मेळावा संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा' असा आशय असलेले पोस्टर जारी करण्यात आले आहे. 

23 October 2025 11:03 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : अकोल्यात 3 वाहनांचा भीषण अपघात

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कार, रिक्षा आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर आठ जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

23 October 2025 08:20 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : रबरी दुधाची बातमी, प्रशासनाला खडबडून जाग

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रबरी दुधाची बातमी दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन खळखळून जागं झालंय. झी 24 तासच्या बातमीची दखल घेत जळगावहून विशेष पथकाने शिरपूर शहरात दाखल होत संबंधित डेअरीवरनं दुधाचे नमुने घेतले. निकषात न बसणारं हे दूध गटारात फेकण्यात आलं. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये अहवाल येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन अधिका-यांनी दिलं. 

23 October 2025 08:18 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई मधील उलवा येथील जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबतील पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाला असून इतर चौघे वाचलते. चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जावळे गावात राहणा-या लोहार कुटुंबाचा दरवाजा दोन दिवसांपासून उघडला नाही. त्यामुळे घरमालकानं त्याची माहिती अग्निशमन दलाला दिलीय. अग्निशमन दलानं दरवाजा उघडल्यानंतर घरातील पाचही सदस्या बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर इतर चार जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती अद्यापही समोर आली नाही. 

23 October 2025 07:44 PM (IST)
23 October 2025 05:22 PM (IST)

Thackeray Bhaubeej : यंदा पवार नव्हे, ठाकरेंच्या भाऊबीजेचीच चर्चा; 'इतक्या' वर्षांनी बहिणीच्या घरी एकत्र...

23 October 2025 03:12 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : 'विकृतीविरोधात लढणं हे शिवसेनेचं काम'

विकृतीविरोधात लढणं हे शिवसेनेचं काम असून शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार रवींद्र धंगेकर यांनी झी 24 तासवरील मुलाखतीत व्य़क्त केलाय. पुणेकरांच्या भविष्यासाठी आपली लढाई सुरू राहणार असल्याचंही धंगेकरांनी स्पष्ट केलंय. तसेच यावेळी आपण शिवसेनेसोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

23 October 2025 03:09 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : 'धनंजय मुंडेंनी मुंडे घराण्यात दरी तयार केली'

पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या ख-या वारसदार आहेत, असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलंय. तर धनंजय मुंडेंमुळे मुंडे घराण्यात दरी निर्माण झाली, असा आरोप करत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. दुसरीकडे बीडमध्ये येऊन छगन भुजबळ द्वेष पसरवून गेले, अशी टीकाही मनोज जरांगेंनी केली.

23 October 2025 03:08 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा - करुणा मुंडे 

धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा असं वक्तव्य छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात केलं होतं. आता भुजबळांच्या सूरात सूर करुणा मुंडे यांना मिसळलाय. धनंजय मुंडेच दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार आहेत. असं वक्तव्य करुणा मुंडेंनी केलंय. पोटचा वारसा नसून ते विचारांचा वारसा आहेत. असंही करुणा मुंडे म्हणाल्या. तर सून म्हणून आपल्याकडेही गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा आहे, असंही त्या म्हणाल्या. 

23 October 2025 03:05 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates :'गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार पंकजा मुंडेच'

गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावरुन सातत्याने चर्चा सुरु आहेत. त्यात आता गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत, असे विधान प्रकाश महाजन यांनी केले आहे. तर छगन भुजबळ दोन्ही मुंडे बहिण-भावात वाद निर्माण करतायत का? असा आरोप प्रकाश महाजनांनी भुजळांवर केलाय. प्रकाश महाजन यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत फेसबुकवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे विधान करुणा शर्मा यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर प्रकाश महाजन यांनी पोस्ट केलीय. 

23 October 2025 02:18 PM (IST)
23 October 2025 01:36 PM (IST)

प्रकाश महाजनांचं पंकजा मुंडेसंदर्भात मोठं विधान; 'मुंडे साहेबांचा...'

प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडेसंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.  गोपीनाथ मुंडे यांची खरी वारसदार पंकजा मुंडेच आहे असा दावा त्यांनी केला आहे. "क्या जमाना आ गया! स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे. एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो फक्त आणि फक्त माझी पंकजाताईच! दुसरे कोणी नाही," असं प्रकाश महाजन म्हणालेत.

23 October 2025 01:31 PM (IST)

ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र! दोघेही जयजयवंतीच्या घरी पोहोचले

उद्धव ठाकरे भाऊबीज निमित्ताने बहीण जयजयवंती यांच्या दादर येथील निवासस्थानी पोहोचले हेत. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थ येथे पोहोचले आहेत.

23 October 2025 12:39 PM (IST)

‘सत्य लपवता येतं, पण दाबता येत नाही…’ तमिळ थलायवाजच्या पराभवानंतर PKLमध्ये पवनच्या पोस्टमुळे उसळला वाद

 

23 October 2025 12:38 PM (IST)
23 October 2025 12:31 PM (IST)

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांचा सर्वोच्च न्यायालयात गंभीर आरोप

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सर्वोच्च न्यायालयात हलफनामा दाखल करत गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणतात की, गुप्तचर विभाग (IB) सतत त्यांच्या हालचालींवर नजर ठेवत आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि मौलिक अधिकारांचा भंग होत आहे. गीतांजली आंग्मो यांनी म्हटलं आहे की, त्या जोधपूरमध्ये आपल्या पतीला भेटायला गेल्या असता, राजस्थान पोलिस आणि आयबीचे अधिकारी त्यांचा माग घेत होते. त्यांच्या प्रवासावर आणि पतीसोबतच्या भेटीवर अधिकाऱ्यांनी कडक नजर ठेवली होती. त्यांनी दावाही केला आहे की, दिल्लीमध्ये सप्टेंबरपासूनच त्यांच्यावर सर्व्हिलन्स सुरू आहे, विशेषतः जेव्हापासून त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या जिथेही जातात, तिथे अधिकारी त्यांचं पाऊल न पाऊल पाठलाग करतात, असा त्यांचा आरोप आहे.

23 October 2025 11:17 AM (IST)

जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग; एकजण अडकला

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याची आणि अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

23 October 2025 10:45 AM (IST)

कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणांचा राडा, चालकाला मारहाण करुन चोरली कार; पळून जाताना तिघांना उडवलं, अखेर...

23 October 2025 10:28 AM (IST)

'हे' पाकिस्तानी सुधारणार नाहीत! ऑस्ट्रेलियामध्ये फिरताना शुभमन गिलसोबत घडली 'नापाक' घटना! Video Viral

 

23 October 2025 09:50 AM (IST)

राहुल गांधी होणार 'या' राज्याचे मुख्यमंत्री?

बिहार निवडणूकीत महाआघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज घोषित होणार आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार अशी जोरदार चर्चा आहे. तेजस्वी यादव सिंहासनावर बसल्याचा फोटो आरजेडीनं व्हायरल केला आहे. महाआघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून संघर्ष सुरू होता. मुख्यमंत्री पदाच्या चेह-याला पूर्णविराम मिळणार  आहे.  कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यात मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावर चर्चा झाली.  यापूर्वी पप्पू यादव यांनी राहुल गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप निश्चीत केला नाही.

23 October 2025 09:25 AM (IST)
23 October 2025 08:36 AM (IST)

संपूर्ण भारतात 1 नोव्हेंबर 2025 पासून IT चे नवे नियम लागू, इथून पुढे सोशल मीडियावरील तुमची पोस्ट....

23 October 2025 08:32 AM (IST)
23 October 2025 08:19 AM (IST)

‘पहलगाम हल्ल्यात नाव आले’ म्हणत तोतया ‘एनआयए’ अधिकाऱ्याकडून पुण्यात दीड कोटींची फसवणूक

पुण्यातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ‘पहलगाम हल्ल्यात तुमचे नाव आहे’ असे सांगून तोतया ‘एनआयए’ अधिकाऱ्याने तब्बल दीड कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारदाराने भीतीपोटी विविध खात्यांतून 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपये ट्रान्सफर केले. दीर्घकाळानंतर रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीने व्हिडिओ कॉल, बनावट ओळखपत्रे व सरकारी लोगो वापरून फसवणूक केली. सायबर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

23 October 2025 08:15 AM (IST)
23 October 2025 07:51 AM (IST)

तुमच्या सेव्हिंग अकाऊंटवर असते RBI ची नजर, 'या' 10 व्यवहारांवर Income Tax ची नोटीस येणारच!

23 October 2025 07:31 AM (IST)

...म्हणून महेश कोठारे भाजपाचे, मोदींचे भक्त झाले असतील! राज ठाकरेंच्या पक्षाचा खोचक टोला; 'कदाचित एखादा Video...'

23 October 2025 06:54 AM (IST)

आईसोबत नदीवर अंघोळीला गेलेल्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

दिवाळीनिमित्त आईसोबत नातेवाईकांकडे आलेल्या चिमुकल्या मुलीचा नदीतील पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरच्या चळणी येथे घडली. दहा वर्षीय चिमुकली अलका भावरचा नदीतील पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला अलका पालघरच्या दादडे येथील आश्रम शाळेतील चौथीची विद्यार्थी आहे. आईसोबत नदीत अंघोळीसाठी गेली असता पाय घसरून पाण्यात पडल्याने अलकाचा दुर्दैवी मृत्यू  झाला. स्थानिकांनी अलकाला पाण्यातून बाहेर काढेपर्यंत अलकाने प्राण गमावले होते. डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबीयांच सांत्वन केलं.

23 October 2025 06:52 AM (IST)

ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसणे गुन्हा आहे? मॅनेजर आला अन्… 

मुंबईतील ताज हॉटेल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगभरातील श्रीमंत आणि प्रतिष्ठीत व्यक्ती या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तसेच जेवणासाठी जातात. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला आपल्या बहिणीसोबत जेवायला गेल्यानंतर तिच्या बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. ही महिला जेवताना खुर्चीवर मांडी घालून बसलेली असताना ताज हॉटेलच्या मॅनेजरने येऊन ही योग्य बसण्याची योग्य पद्धत नसल्याचे सांगितले आहे. याच घटनेवर महिलेने नाराजी व्यक्त केली असून त्या संदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

23 October 2025 06:46 AM (IST)

रवींद्र धंगेकरांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवींद्र धंगेकर यांची तक्रार केली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आळी आहे. धंगेकर वारंवार महायुतीतल्या नेत्यांवर टीका करत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री थेट एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार का हे आता पाहावं लागणार आहे.

23 October 2025 06:45 AM (IST)

एका रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाकडून गेम

सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या गळाला लागले हेत. काँग्रेसचाही एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे. एका रात्रीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भाजपाने गेम केल्याची चर्चा स्थानिक राजकारणात आहे.

23 October 2025 06:45 AM (IST)

राणा दाम्पत्य अन् बच्चू कडूंमध्ये जुंपली

राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदारकी गेलेल्यांची नौटंकी सुरु असल्याचा नवनीत राणांनी टोला लगावला आहे. तर रामाचं नाव सोडून आपल्या नावाचा जप सुरुय, असा पलटवार बच्चू कडूंनी केला आहे.

23 October 2025 06:44 AM (IST)

ते पाच कोटी म्हणजे लाच; राऊतांचा हल्लाबोल

महायुतीच्या आमदारांना दिलेला 5 कोटींचा विकास निधी ही लाच आहे,असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं असून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमदारांनी आपल्याकडे यावं असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केलाय.

23 October 2025 06:44 AM (IST)

महायुती राज्यात स्वतंत्र लढणार: सुत्रांची माहिती

मुंबईत महायुती एकत्रित निवडणूक लढणार तर राज्यात इतर ठिकाणी स्वतंत्र लढणार, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी 'झी 24 तास'ला दिली आहे.

23 October 2025 06:44 AM (IST)

आघाडीची अद्यापही अधिकृत घोषणा नाही

आगामी निवडणुकीसाठी आघाडीची अद्यापही अधिकृत घोषणा नाही. तिन्ही पक्ष  एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

23 October 2025 06:43 AM (IST)

राज-उद्धव एकत्र आल्यास स्वागत : वडेट्टीवार

मुंबई महापालिका निवडणुकीचा निर्णय वर्षा गायकवाड घेणार असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच  राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास स्वागत करणार असल्याचं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे.

23 October 2025 06:43 AM (IST)

मनसे आणि वर्षा गायकवाडांची जुंपली

आम्ही संविधान आणि कायदे मानणारे आहोत. कायदे तोडणा-यांसोबत कसं जाणार? असं विधान महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या संभाव्य एन्ट्रीबाबत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. तसेच आम्ही कुणाकडे हात पसरायला गेलो नाही, असा टोला यावरुन मनसेनं लागवला आहे.

23 October 2025 06:43 AM (IST)

मुंबईत काँग्रेस स्वबळावर?

मुंबईत महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह उफळला आहे. मुंबई मनपा काँग्रेस स्वबळावर लढणार असून ते ठाकरेंसोबत जाणार नाहीत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा केलाय.

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More