Live Now

Breaking News Live Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 October 2025: राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा. 

Breaking News Live Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश
27 October 2025 09:18 PM (IST)

...

27 October 2025 08:09 PM (IST)

निवडणूक आयोगाच्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचे राजकारण पेटणार! आज रात्री मतदार...

निवडणूक आयोगाच्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचे राजकारण पेटणार! आज रात्री मतदार याद्या फ्रीज होणार; 'या' 12 राज्यांमध्ये SIR होणार

27 October 2025 08:08 PM (IST)

भारतात धडकलेल्या सर्वात मोठ्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रात; कोकणात समुद्र...

भारतात धडकलेल्या सर्वात मोठ्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रात; कोकणात समुद्र खवळला, रत्नागिरीत तुफान वारा आणि...
 
27 October 2025 07:54 PM (IST)

धृतराष्ट्राची 100 पोरं कशी झाली? मतदार याद्यांमध्ये उत्तर, राऊतांनी सर्वच...

धृतराष्ट्राची 100 पोरं कशी झाली? मतदार याद्यांमध्ये उत्तर, राऊतांनी सर्वच काढलं;मोदींच्या मतदारसंघात...' 

27 October 2025 07:53 PM (IST)

2030 पर्यंत गायब होईल ही टेक्नोलॉजी; तुम्ही रोजच्या आयुष्यात करता वापर!...

2030 पर्यंत गायब होईल ही टेक्नोलॉजी; तुम्ही रोजच्या आयुष्यात करता वापर!

27 October 2025 07:51 PM (IST)

वरळीच्या मतदार यादीत सर्वात मोठा घोटाळा, आदित्य ठाकरेंनी दाखवली संपूर्ण मतदार...

वरळीच्या मतदार यादीत सर्वात मोठा घोटाळा, आदित्य ठाकरेंनी दाखवली संपूर्ण मतदार यादी; 19333 बोगस मतदार आणि...'

27 October 2025 07:23 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या...

Breaking News Today LIVE Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांची फसवणूक करून भाजपच्या विशाल परब यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता असा दावा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. अशा पद्धतीने फसवणूक प्रवेश घडवून आणल्यास विशाल परब यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा संजू परब यांनी दिला आहे.

27 October 2025 07:23 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या...

Breaking News Today LIVE Updates : सिंधुदुर्ग- भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांची फसवणूक करून भाजपच्या विशाल परब यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता असा दावा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. अशा पद्धतीने फसवणूक प्रवेश घडवून आणल्यास विशाल परब यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा संजू परब यांनी दिला आहे.

27 October 2025 05:37 PM (IST)

...

27 October 2025 04:18 PM (IST)

अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम, महिलेने ...

अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम, महिलेने 'वाजले की बारा' वर धरला ठेका!

27 October 2025 04:18 PM (IST)

भारताच्या तुलनेत दुबईत किती स्वस्तात मिळतं GOLD? महिला-पुरुष एकावेळी किती...

भारताच्या तुलनेत दुबईत किती स्वस्तात मिळतं GOLD? महिला-पुरुष एकावेळी किती सोनं भारतात आणू शकतात?

27 October 2025 04:05 PM (IST)

...

27 October 2025 03:50 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : कृषी केंद्र चालकांची उद्या राज्यात बंदची...

Breaking News Today LIVE Updates : कृषी केंद्र चालकांची उद्या राज्यात बंदची हाक

राज्यभरातले 85 हजार कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांनी उद्या एकदिवसीय बंद पुकारलाय. सरकारच्या साथी पोर्टल फेज 2 वापरण्याच्या धोरणाविरोधात कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेत्यांनी बंदचा निर्णय घेतलाय. या एकदिवसीय बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील 3 हजार 500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी होणार आहे.

27 October 2025 03:45 PM (IST)

मुलाची बदनाम करताना...; तब्बल 19 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येबाबत...

'मुलाची बदनाम करताना...'; तब्बल 19 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येबाबत प्रकाश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

27 October 2025 03:09 PM (IST)

...

27 October 2025 02:32 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : नागपुरात क्षुल्लक कारणावरून कारचालकावर...

Breaking News Today LIVE Updates : नागपुरात क्षुल्लक कारणावरून कारचालकावर चाकूने हल्ला

नागपुरात कारची रिक्षाला धडक बसल्याच्या क्षुल्लक कारणामुळे वाद निर्माण झाला होता. यात कारचालकावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली. नागपूरच्या कपिलनगर पोलिस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे. मृत राजेश कोरेकर हे आपल्या चारचाकी वाहनाने जात असताना त्यांच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचं नुकसान झालं. या कारणावरून रिक्षाचालकासोबत त्यांचा वाद झाला. यावेळी 3 ते 4 आरोपी घटनास्थळी आले त्यांनी कारचालकाला मारहाण करत चाकूने वार केला. यात कारचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरुय. 

27 October 2025 02:31 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : शांतपणे ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल नाही...

Breaking News Today LIVE Updates : 'शांतपणे ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल नाही'

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलीय. सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष्य करणा-या शिवसेनेला सुनील तटकरे यांनी चांगलेच सुनावलं. कोण काय बोलतोय ते मी शांतपणे ऐकतो. शांतपणाने ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल किंवा कमकुवत नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा तटकरे त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा राजकीय प्रतिकार करायला दुप्पट वेगाने बाहेर पडतो, असा इशाराही तटकरेंनी दिलीय.

27 October 2025 02:31 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्याशी बोलू नये.....

Breaking News Today LIVE Updates : 'जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्याशी बोलू नये...'

जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही, असं सांगितलय, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. मात्र सिंह हा एकटा असतो कळपात येत नाही, असा टोला गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना लगावला. सांगलीच्या आटपाडी येथील विभूतवाडीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

27 October 2025 02:27 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : नांदेडच्या मुदखेडमध्ये तहसीलदारांची कार...

Breaking News Today LIVE Updates : नांदेडच्या मुदखेडमध्ये तहसीलदारांची कार फोडली

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली. 34 वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलीसानी अटक केलीये. अतिवृष्टीग्रस्त असुनही अजुन अनुदान न मिळाल्याने या शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडल्याची ची माहिती आहे. 

27 October 2025 02:26 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : भाजप ऑफिसच्या जागेवरून राऊतांचा हल्लाबोल...

Breaking News Today LIVE Updates : भाजप ऑफिसच्या जागेवरून राऊतांचा हल्लाबोल 

भाजप ऑफिसच्या जागेवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. नियम डावलून महापालिकेची जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'भूमिपूजनाआधी शाहांनी जागेचं रहस्य समजून घ्यावं'आणि 'राफेलच्या वेगाने फाईल्स फिरवत जागा पदरात पाडून घेतली', असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. तर कार्यालयाची जागा 90 कोटी रुपयांना रितसर खरेदी केली असल्याचा दावा भाजपने केलाय.

27 October 2025 01:41 PM (IST)

...

27 October 2025 01:07 PM (IST)

Shreyas Iyer In ICU: श्वास घ्यायला त्रास, अंतर्गत रक्तस्राव अन्...;...

Shreyas Iyer In ICU: श्वास घ्यायला त्रास, अंतर्गत रक्तस्राव अन्...; ऑस्ट्रेलियातून चिंता वाढवणारी बातमी

27 October 2025 12:39 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या...

Breaking News Today LIVE Updates : सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या 'सत्याच्या मोर्चा' त दिसू द्या- राज ठाकरे 

सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या ' सत्याच्या मोर्चा' त दिसू द्या. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणाली बाबत प्रेझेंटेशन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी याबाबत उघडपणे बोला. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या चुका, यादीतील घोळ, कार्यप्रणालीतील राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टींबाबत पुरावे जमा करून लोकांशी बोला, राज ठाकरे यांचे आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश. एकीकडे ठाकरे गट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार तर दुसरीकडे घराघरात जाऊन लोकांची मत जाणून घेऊन त्यांना त्या मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात मनसेतर्फे सांगितले जाणार. 

27 October 2025 12:36 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : एल.एल.बी. परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा गोंधळ,...

Breaking News Today LIVE Updates : एल.एल.बी. परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा गोंधळ, विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडे निषेध

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेल्या एल.एल.बी.च्या परीक्षेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. एल.एल.बी. प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या कॉन्ट्रॅक्ट - 2 या विषयाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सायबर क्राइम या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थी हैराण झाले. अकोल्यातील एल.आर.टी. महाविद्यालयात हा प्रकार घडला असून चुकीची प्रश्नपत्रिका मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विषयाशी संबंधित नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तत्काळ परीक्षकांना याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवली असून चुकी विद्यापीठाची असल्याने आम्हाला या पेपरमध्ये पास करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 

 

27 October 2025 12:23 PM (IST)

...

27 October 2025 12:07 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा...

Breaking News Today LIVE Updates : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा रविंद्र धंगेकर यांना फोन 

रत्नागिरी - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा रविंद्र धंगेकर यांना फोन. धंगेकर यांनी केलेल्या विधानासंदर्भात दोघांमध्ये झाली चर्चा. माझ्या विधानाचा विपर्यास केला धंगेकर यांची उदय सामंत यांना माहिती. कालच्या आळंदीच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना सूचना केल्या. धंगेकर यांनी केलेल्या विधानाबद्दल स्वतः धंगेकर लवकरच खुलासा करणार. उदय सामंत यांच्याशी झालेल्या संभाषणमध्ये धंगेकर यांचा सामंत यांना शब्द. 

27 October 2025 11:57 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : खासदार रजनी पाटील यांनी महिला डॉक्टर...

Breaking News Today LIVE Updates : खासदार रजनी पाटील यांनी महिला डॉक्टर कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट

बीड मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात खासदार रजनी पाटील यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या घटनेची सर्व माहिती दिली असून त्यांनी ट्विट करून घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान या प्रकरणात कुंपणच जेव्हा शेण खातं. तर न्याय कुणाला मागायचा? असा सवाल देखील खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही आत्महत्या होती की हत्या होती अशी शंका देखील उपस्थित करण्यात आली.

 

27 October 2025 11:29 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : अहिल्यानगर काँग्रेसचा स्वबळाचा नारा..?...

Breaking News Today LIVE Updates : अहिल्यानगर काँग्रेसचा स्वबळाचा नारा..? बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली... 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुकांमध्ये महायुती होणार की महाविकास आघाडी याबरोबरच मनसेची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पार पडली आणि या बैठकीत सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा देत एकला चलो रे ची भूमिका घेण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यासह जिल्ह्यातील सर्वच तालुका अधक्ष व पदाधिकारी यांच्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आला.. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका ठरवण्याचे सर्वाधिकार बाळासाहेब थोरात यांना दिले असले तरी आगामी सर्व निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात अशी आग्रही मागणी लावून धरण्यात आली.

 

27 October 2025 11:29 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये...

Breaking News Today LIVE Updates : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टीमधील मतभेद उघड

जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टीमधील मतभेद उघड. या संपूर्ण जमीन व्यवहार प्रकरणांमध्ये ट्रस्टीनी दबाव आणून राजीनामा घेतल्याचा चकोर गांधी यांचा दावा. 6 ऑक्टोंबरला चकोर गांधी यांनी एचएनडी ट्रस्टचा दिला राजीनामा. अर्धवट माहिती देऊन या व्यवहारात माझी सही घेतल्याचा चकोर गांधी यांचा दावा. अनेक वेळा ट्रस्टीना सांगून सुद्धा हा व्यवहार रद्द झाला नाही. 6 ऑक्टोबर धर्मदाय आयुक्ताकडे चकोर गांधी यांनी दिला आहे राजीनामा. 

 

27 October 2025 10:54 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : वराई तालुक्यात जनावरांमध्ये लंपीचा कहर;...

Breaking News Today LIVE Updates : वराई तालुक्यात जनावरांमध्ये लंपीचा कहर; पंधरा दिवसांच्या कालावधीत 12 जनावरांचा मृत्यू

बीडच्या गेवराई तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजाराने कहर केलाय. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत गेवराई तालुक्यात 12 बैलांचा मृत्यू झालाय. गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा, तांदळा, कोळगाव यासह परिसरातील अनेक गावांत जनावरांमध्ये लंपी आजाराने कहर केलाय. अतिवृष्टीने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर लंपीच्या रूपाने नवे संकट उभा ठाकले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही असा आरोप इथले शेतकरी करत आहेत. मागील पंधरा दिवसांत जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. यावर काही प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या मात्र जनावरे दगावल्याचं यात समोर आले आहे. या संकटामुळे पशुपालक अडचणी देत असून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पशुपालक करत आहेत.

27 October 2025 10:15 AM (IST)

IPL 2026 पूर्वी अर्जुन तेंडुलकरचा धमाकेदार परफॉर्मन्स, रणजी ट्रॉफीत...

IPL 2026 पूर्वी अर्जुन तेंडुलकरचा धमाकेदार परफॉर्मन्स, रणजी ट्रॉफीत फलंदाजांना केलं गार 

27 October 2025 10:14 AM (IST)

रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात कधी दिसणार? पाहा आगामी सामन्यांचं...

रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात कधी दिसणार? पाहा आगामी सामन्यांचं शेड्युल

27 October 2025 09:44 AM (IST)

...

27 October 2025 09:33 AM (IST)

30 कोटी भारतीयांचे ₹340000000000 सरकारने अदानींसाठी वळवले? अदानी भाजपचे नक्की...

30 कोटी भारतीयांचे ₹340000000000 सरकारने अदानींसाठी वळवले? अदानी भाजपचे नक्की कोण लागतात? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

27 October 2025 09:29 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात महत्त्वाची...

Breaking News Today LIVE Updates : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात महत्त्वाची बातमी

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात महत्त्वाची बातमी. 230 कोटी रुपये धर्मदाय आयुक्तांनी गोठवले. प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत ट्रस्टी ला 230 कोटी रुपये काढता येणार नाहीत. धर्मादाय आयुक्तांनी दिले निर्देश. व्यवहार रद्द झाला तर गोखले यांना पैसे परत  मिळण्याची शक्यता. मात्र धर्मादाय आयुक्तांनी पैशाला दिली स्थगिती. 

 

27 October 2025 08:46 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर अटक...

Breaking News Today LIVE Updates : सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर अटक

नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा फरार सराईत गुन्हेगार शुभम चंद्रकांत निकम याला अटक आलीये. अंबड करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने गौळाणेरोड, पाथर्डी गाव येथे ही कारवाई केलीये. गुन्हा घडल्यापासून संशयित फरार होता. वरिष्ठ निरीक्षक यांच्या पथकाचे गस्त करत असताना फरार संशयित गौळाणेरोड येथे आल्याचे समजले. पथकाने सापळा रचत संशयिताला घराजवळून ताब्यात घेतले. संशयिताविरोधात नाशिक तालुका, सातपूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

27 October 2025 08:44 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : वाळूज औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात दोघे...

Breaking News Today LIVE Updates : वाळूज औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात दोघे जागीच ठार, एक गंभीर

कामावरून घरी परतत असलेल्या कामगाराच्या दुचाकीला वाळूज औद्योगिक परिसरातील गुड इयर चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. नितीन खरात शालिक सोनवणे असे मृताचे नाव आहे तर नितीनचा चुलत भाऊ सिद्धार्थ हा गंभीर जखमी आहे त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

27 October 2025 08:43 AM (IST)

...

27 October 2025 08:41 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : समृध्दी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु...

Breaking News Today LIVE Updates : समृध्दी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु

जालन्यातील घनसावंगीतील समृद्धी साखर कारखान्याच्या गळीप हंगाम 2025-26 सुरु झाला आहे.समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते सतिष घाटगे यांच्या हस्ते गाळप सुरू करण्यात आलं. संत महंत आणि शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात कारखान्याच्या 10 हजार मे.टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट वीज प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.समृद्धी साखर कारखाना यावर्षी 2 हजार 970 रुपये प्रतिटन भाव ऊसाला देणार आहे.यावेळी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी, बळीराम महाराज राठोड, सुरेश महाराज रामदासी, योगीराज कैलासनाथ महाराज उपस्थित होते.

27 October 2025 08:41 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : समृध्दी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु...

Breaking News Today LIVE Updates : समृध्दी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु

जालन्यातील घनसावंगीतील समृद्धी साखर कारखान्याच्या गळीप हंगाम 2025-26 सुरु झाला आहे.समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते सतिष घाटगे यांच्या हस्ते गाळप सुरू करण्यात आलं. संत महंत आणि शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात कारखान्याच्या 10 हजार मे.टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट वीज प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.समृद्धी साखर कारखाना यावर्षी 2 हजार 970 रुपये प्रतिटन भाव ऊसाला देणार आहे.यावेळी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी, बळीराम महाराज राठोड, सुरेश महाराज रामदासी, योगीराज कैलासनाथ महाराज उपस्थित होते.

27 October 2025 08:31 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : कबुतरखान्याचा वाद पुन्हा पेटणार? जैन...

Breaking News Today LIVE Updates : कबुतरखान्याचा वाद पुन्हा पेटणार? जैन मुनींना उपोषणासाठी परवानगी...

मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी जैन मुनी निलेश हे कबुतरांच्या रक्षणासाठी आमरण उपोषण करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना 1 नोव्हेंबरच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. मनसे-मविआचा मतदारयादी घोळाविरोधात मोर्चा आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे उपोषणाची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे जैन मुनींचे आंदोलन पुढे ढकलण्यात आलं असून आता ते 3 नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

27 October 2025 08:14 AM (IST)

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी या 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत?...

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत?

Satara Doctor Death Case : फळटण येथील उपजिल्हा रुग्णायातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येला कोणत्या 5 गोष्टी जबाबदार ठरल्या ते पाहूया. नाहीतर महिला डॉक्टरचा जीव वाचला असता का?  

27 October 2025 08:14 AM (IST)

एकाच वेळी 83 मुलांना जन्म देणार जगातील पहिली AI मंत्री! प्रेग्नसीची घोषणा...

एकाच वेळी 83 मुलांना जन्म देणार जगातील पहिली AI मंत्री! प्रेग्नसीची घोषणा करताना PM म्हणाले, 'आम्ही धोका...'

27 October 2025 08:13 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : देशभरातील 8 हजार शाळा रिकाम्या; 20 हजार...

Breaking News Today LIVE Updates : देशभरातील 8 हजार शाळा रिकाम्या; 20 हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार

देशभरातील जवळपास 8 हजार शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही... असे शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे... या 'शून्य प्रवेश' असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20 हजार 817 शिक्षक कार्यरत आहेत... म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत... तरी यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये ५ हजारांनी घट झाली आहे...सर्वाधिक 'शून्य प्रवेश' असलेल्या सर्वाधिक 3 हजार 812 शाळा पश्चिम बंगालमध्ये आहेत..महाराष्ट्रासह गोवा, आसाममध्ये मात्र एकही शून्य प्रवेश शाळा नाही.

27 October 2025 07:57 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : चिचोंडी येथे कांदा चाळीत आढळला विषारी...

Breaking News Today LIVE Updates : चिचोंडी येथे कांदा चाळीत आढळला विषारी इंडियन कोब्रा

पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून पावसाचे पाणी सर्पाच्या बिळांमध्ये जाऊन सर्प निघण्याचे प्रमाण वाढले आहे. येवला तालुक्यातील चिचोंडी येथे दिलीप पवार यांच्या कांदा चाळीमध्ये विषारी इंडियन कोब्रा नाग निघाल्याची माहिती सर्पमित्राला मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागास रेस्क्यू केले आहे.

 

27 October 2025 07:52 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : मका गेला, कांदाही गेला अवकाळी पावसाने...

Breaking News Today LIVE Updates : मका गेला, कांदाही गेला अवकाळी पावसाने चांदवड तालुक्यात शेती पिकाचे नुकसान

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकच्या चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून आधी मान्सूनच्या पावसाने मका पीक पूर्ण उध्वस्त झाले त्यानंतर पावसाने उघडीप दिली यानंतर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याने कांदा पिक देखील उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. 

 

27 October 2025 07:37 AM (IST)

...

27 October 2025 07:36 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : उसाच्या वजनात काटा मारणाऱ्यांवर भरारी...

Breaking News Today LIVE Updates : उसाच्या वजनात काटा मारणाऱ्यांवर भरारी पथकाची नजर

शेतकऱ्यांची उसाच्या वजनात फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाईचा इशारा देत साखर आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला भरारी पथक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामाआधी विनापरवाना गाळप सुरू केल्याप्रकरणी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर अचानक तपासणी करून वजनातील तफावत आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

27 October 2025 06:35 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीची आजपासून होणार...

Breaking News Today LIVE Updates : एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीची आजपासून होणार पसंती नोंदणी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविल्या जात असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी कॉलेजांचे पसंतीक्रमांक भरण्यास 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पर्याय भरता येतील, तर 30 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा 8338 जागा असून, त्यावरील जागांवरील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जात आहे.

 

27 October 2025 12:33 AM (IST)

पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात मोठी बातमी! गोखले ट्रस्टचा जैन बोर्डिंगला...

पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात मोठी बातमी! गोखले ट्रस्टचा जैन बोर्डिंगला मेल, राजू शेट्टींकडून माहिती

27 October 2025 12:32 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी...

Breaking News Today LIVE Updates : गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी 

फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे कोर्टने ही कोठडी सुनावली आहे. 

27 October 2025 12:30 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : आज भाजपच्या नविन मुख्यालयाचे भूमीपूजन ...

Breaking News Today LIVE Updates : आज भाजपच्या नविन मुख्यालयाचे भूमीपूजन  

आज सकाळी 9.00 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुजा होणार आहे. दुपारी 12.00 वाजता अमित शाह, देवेंद्र फडणवीस आमि रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे.

27 October 2025 12:28 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते माझगाव डॉक...

Breaking News Today LIVE Updates : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते माझगाव डॉक' येथे नौकांचे उद्घाटन 

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत 'माझगाव डॉक' येथे खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उद्घाटन आणि वितरण होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

 

27 October 2025 12:28 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई...

Breaking News Today LIVE Updates :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सकाळी 10:30 वाजता नेस्को सेंटर गोरे गाव, मुंबई येथे इंडिया मेरीटाईम वीक 2025 च्या उद्घाटनात संबोधित करतील. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

27 October 2025 12:26 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची...

Breaking News Today LIVE Updates :  आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद  

या पत्रकार परिषदेत देशव्यापी मतदार यादी छाननी (SIR) संदर्भातील मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोग देशव्यापी छाननीला सुरुवात करणार आहे.पहिल्या टप्प्यात १२ ते १५ राज्यांत ही प्रक्रिया होईल — यात आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगालचा समावेश असेल.कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील मतदार यादीतही अनेक घोळ असल्याने महाविकास आघाडीने याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत केंद्रीय आयोगाला माहिती दिली असून, उद्या संध्याकाळी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद, उद्या केंद्रीय निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याची शक्यता,मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू, आणि विवेक जोशी हे आज दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

Neha Choudhary

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

Read More