Maharashtra Breaking News Today LIVE: पुणे- मुंबई एक्सप्रेस-वेवर दुसरा अपघात, पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीला अडथळा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 4 February 2026: महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेत कुणाचा महापौर बसणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Dakshata Thasale | Feb 04, 2026, 22:42 PM IST
twitter
Maharashtra Breaking News Today LIVE: पुणे- मुंबई एक्सप्रेस-वेवर दुसरा अपघात, पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीला अडथळा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 4 February 2026: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना घडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघाती निधन झालं. यानंतर महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरलं. तसेच मुंबईच्या महानगरपालिकेवर कुणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आणि 9 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार रंगली आहे. असं असताना महाराष्ट्रात अनेक घडामोडीत घडत आहेत. महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे क्षणाक्षणाचे अपडेट Live Blog मध्ये पाहायला मिळणार आहे. 

4 Feb 2026, 22:37 वाजता

पुणे- मुंबई एक्सप्रेस-वेवर दुसरा अपघात, पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीला अडथळा

पुणे - मुंबई एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. पुण्यात दुसरा मोठा अपघात झाल्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पेट्रोलच्या टँकरला कंटेनर धडकले आहे. टोनी धाब्याजवळील घटना घडली आहे. खडकाळे गावाजवळ हा अपघात झाला आहे. 

4 Feb 2026, 18:34 वाजता

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती 

नमन अग्रवाल या विद्यार्थ्याची आयआयटीमध्ये नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.

पोलिसानी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मागील काही दिवसापासून तो तणावात होता.

नमन अग्रवाल हा सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.

मूळचा राजस्थानचा असलेला नमन दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता अशी माहिती.

पवई पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

4 Feb 2026, 17:11 वाजता

मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांचीही कोंडी, दादर टीटी येथे गेल्या 4-5 तासांपासून प्रवासी अडकले. 

4 Feb 2026, 15:50 वाजता

IIT मुंबईत 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

नमन अग्रवाल हा सिव्हिल शाखेतील दुसरा वर्षाचा विद्यार्थी होता. हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं. नैराश्य हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिसांचा तपास सुरू आहे. 

4 Feb 2026, 15:47 वाजता

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ

सोन्याच्या दरात 6 हजार 500 रूपयांची वाढ तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 700 रुपये तर चांदीचे दर 2 लाख 95 हजार 600 रुपयावर पोहोचले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दराने मोठ्या घसरणीनंतर आज पुन्हा दरामध्ये उसळी घेतली आहे. चांदी पुन्हा तीन लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. ऐन लगनसराई मध्ये सोन्या-चांदीचे दर चढ उतार होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम अवस्था पाहायला मिळते आहे

4 Feb 2026, 15:27 वाजता

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या 50 किमीपर्यंत रांगा 

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गॅस टँकर पलटी होऊन गळती सुरू झाली असून त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत ही पन्नास किलोमीटरपर्यँत वाहतूक कोंडी झाली असून काल पासून वाहन चालक प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. उर्से टोल नाक्यावरून या वाहतूक कोंडी झाली आहे. 

4 Feb 2026, 15:21 वाजता

विधीमंडळातील हक्कभंग समितीच्या बैठकीला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे अनुपस्थित 

अनुपस्थिती बाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता साक्ष देण्यासाठी आपल्याला 5 फेब्रुवारीला बोलावल असल्याची अंधारे यांनी माहिती दिली आहे. आज साक्ष देण्यासाठी बोलावलच नसेल तर उपस्थित कसं राहणार? अंधारेंचा सवाल.

विधीमंडळात मात्र हक्कभंग समितीच्या बैठकीला सुरुवात . बैठकीसाठी समितीचे प्रमुख प्रसाद लाड उपस्थित आहेत. 

4 Feb 2026, 14:46 वाजता

शशी थरुर थोडक्यात बचावले 

काँग्रेस खासदार शशी थरूर संसद भवनातील जिन्यावरून उतरताना घसरले. घटनास्थळी उपस्थित खासदार अखिलेश यादव आणि उपस्थित नेते आणि कर्मचारी ह्यांनी तात्काळ मदत केली. 

 

4 Feb 2026, 14:45 वाजता

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूकीत बदल, लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा महामार्ग पोलिसांचे आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल करण्यात आला आहे. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेस वे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे. असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

4 Feb 2026, 14:33 वाजता

 चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिक भयभीत

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडे, दडपिंप्री, बोरखेडा व करगांव परिसरात बिबट्याचा मुक्त वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकताच तरवाडे, करगांव परिसरातील हिंगण्या नाल्याजवळील मक्याच्या शेतात बिबट्या जाताना दिसून आला असून हा प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. इच्छापुर तांडा, चैतन्य तांडा, तरवाडे, खरजई व वडगांव लांब परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.