)
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे.अस असताना पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडन येथे पसार झाला असून त्याला यासाठी पासपोर्ट कसा मिळाला तसेच त्याला राजकीय वरदहस्त मिळाला का की पोलिस दलांतूनच मदत झाली याबाबत आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.अश्यातच या प्रकरणी शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या कॉल डिटेल्स तपासावे यात घायवळ आणि तो किती वेळा बोलले आणि दादांना किती वेळा निरोप देण्यात आले याची माहिती मिळेल असा आरोप यावेळी धंगेकर यांनी केलं आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. लातूर,धाराशिव,सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पक्षाच्या वतीने बी बियाणे खत यांची मदत करणार आहेत.
पुण्यातील एकूण १८०० प्राथमिक शाळांपैकी ५६९ शाळा बंद होत असून, केवळ १२३१ शाळा उरणार आहेत. परिणामी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पदेही कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसराला दररोज हजारो ट्रक, कंटेनर आणि अवजड वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतूककोंडीचा शाप भोगावा लागत आहे. यामुळे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येविरोधात स्थानिक नागरिक, उद्योजक आणि कामगार ९ ऑक्टोबरला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयावर धडक पायी मोर्चा काढणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज सह्याद्री येथे अतिवृष्टी संधर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. तत्पूर्वी आष्टीकरांनी थेट सह्याद्री अतिथीगृहावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
2 सप्टेंबरला सरकारने काढलेला जीआर रद्द करावा. २०१४ पासून जातप्रमाणपत्र दिली यांबाबत श्वेतपत्रिका काढा या दोन्ही मागण्यांबाबत सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सकल ओबीसी समाजाचा मोर्चा १० ऑक्टोबर रोजी निघणार अशी भूमिका घेण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत तेही जानेवारी २०२६ महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने खडसावल्यानंतर या निवडणुका मुदतीत घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या गट अणि गणांच्या आरक्षणाच्या सोडतीच्या तयारी सुरू असतानाच, राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकीकरिताची प्रभागरचना शनिवारी सायंकाळपर्यंत फायनल होऊ शकते. त्यासाठी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल आणि या प्रक्रियेनंतर २९ महापालिकांच्या निवडणुकांचा नेमका कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूचं स्वित्झर्लंड कनेक्शन? अनिल परब स्पष्टच बोलले, 'कोण येणार होते हे नितेश राणेंना...'#maharashtra #politicshttps://t.co/CiJCgm82NX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
राज्यातील पावसाबद्दल हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट; 'या' दिवसापासून राज्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात#Maharashtra #Weather #Rainhttps://t.co/fwKN4u3Q8W
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
पहिल्या चित्रपटात ओळख, दुसऱ्या चित्रपटात प्रेम; विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाने उरकला साखरपुडा, यादिवशी घेणार सातफेरे#entertainment #VijayDeverakonda #rashmikamandannahttps://t.co/4yK7SeVzMK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
बाळासाहेबांच्या 'त्या' फोटोने प्रकरणाला कलाटणी? अनिल परबांनी मोबाईलमध्ये काय दाखवलं?https://t.co/csGXRhYe9d < येथे वाचा सविस्तर वृत्त...#maharashtra #anilparab #ramdaskadam #kadamthackeray #balasahebthackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
करमाळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख ( शिंदे गट ) महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
'गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?' चंद्रकांत पाटलांचा सवाल; फोन कॉलचा Video Viralhttps://t.co/loVkNeWosE < येथे जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय आणि चंद्रकांत पाटलांनी कोणाला केलेला हा कॉल?#maharashtra #maharashtra_news #gautamipatil #chandrkantpatil #BJP #ViralVideo #Video
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
यंदा पावसाने झोडपल्याने झेंडूचे उत्पादन कमी झाले, त्यामुळे दसऱ्यासाठी बाजारपेठेमध्ये फुलांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दसऱ्यासाठी राखून ठेवलेल्या झेंडूची बाहेरच्या जिल्ह्यातून बाजारात आवक वाढल्यामुळे दर कोसळले. परिणामी झेंडू रस्त्यावर टाकून जाण्याची वेळ आली. मुहूर्तावर सोने खरेदीसाठी दुकानांत गर्दी, तर झेंडूरूपी सोने रस्त्यावर, असे चित्र गुरुवारी शहरात सर्वत्र होते.
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या दसरा सणाला झेंडू फुलांची मोठी मागणी असते. हार-तोरणासाठी ही फुले वापरतात. मात्र, असे असले तरी दर न मिळाल्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसामुळे उत्पादन कमी झाले. काही ठिकाणी फुले खराब झाली. ज्यांनी खास सणासाठी झेंडू राखून ठेवला होता, त्यांना जादा दराची अपेक्षा होती. दसऱ्याच्या आधल्या दिवशी बुधवारी शंभर रुपयांवर दर मिळाला. मात्र, दसऱ्यादिवशी राखून ठेवलेल्या झेंडूची बाजारात आवक वाढल्याने गुरुवारी ५० व शेवटी ३० ते २० रुपये किलोने विकावा लागला. मागणीपेक्षा आवक जास्त असल्याने फुले खरेदीसाठी ग्राहक आला नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली फुले घेऊन जाण्याचा खर्च नको म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावरच फुलांचे ढीग टाकून घरी जाणे पसंत केले
विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरात वाहन विक्री जोमात झाली. दसऱ्यादिवशी ७७६, तर नवरात्रीत १० हजार ८ वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या नवरात्रीत ७ हजार ३९० नोंदणी झाली होती. यंदा ६९ कोटी ९४ लाखांचा महसूल जमा झाला. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही वाढ नोंदवली गेली आहे.
कोकणवासीयांसाठी आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेले काम मे महिन्या अखेर पूर्ण होईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. तिसऱ्यांदा फेरनिविदा काढल्यानंतर १९७ कोटी रुपयांच्या कामाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. सुनील तटकरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. या कामामध्ये ३ रेल्वे ओव्हर ब्रीज, २ मोठे पूल आणि संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे.
उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यातच महिला रुग्ण कक्षामध्ये 5 सप्टेंबर रोजी उंदीर दोन रुग्णांना चावल्याच्या घटना उघडकीस आल्या. या संदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने साफसफाईबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. या समितीने तातडीने कारवाई करून सफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून रुग्णालयाची सफाई करून घेतली. तसेच प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उंदीर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. तसेच रुग्ण व नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे उंदरांची संख्या आटोक्यात आली. कूपर रुग्णालयात मागील दोन महिन्यांमध्ये सहा रुग्णांना उंदीर चावल्याची माहिती पोलिसांनी माहितीच्या अधिकारामध्ये उपलब्ध दिली.
चक्रीवादळ शक्ती गुजरात किनाऱ्याकडे सरकत आहे. पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा धोका. गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Weather Update : गुजरातच्या शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा धोकाhttps://t.co/P8GZvam8SE#Maharashtra #weatherUpdate #gujrat #GujratShaktiCyclone #MaharashtraWeatherUpdate #Marathawada #Mumbai
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दिवसभराच्या दौऱ्यात ते वार्तालापासोबतच शाखाप्रमुख आणि पदाधिकारी मेळावाही घेणार आहेत तसंच काञज मधील शिवसेना शाखेलाही भेट देतील.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 7,8 आणि 9 ऑक्टोबर रोजी रोज दुपारी हे काम जाईल. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश केले विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होऊ शकतो. येथे तीन दिवस 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. शहर विभागातील ए, बी,ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात; तसेच पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागांत संपूर्ण परिसरात ही पाणीकपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रांत १० टक्के पाणीकपात लागू राहील.
मुंबई महापालिकेतील पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 'बी' वॉर्डाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांची के-पूर्व विभागात बदली झाली आहे, तर 'एस' वॉर्डाच्या सहायक आयुक्त ससाणे यांची बदली बाजार विभागाचे सहायक आयुक्त म्हणून झाली आहे.'सी' वॉर्डाचे संजय इंगळे यांची बदली नगर अभियंता विभागात झाली आहे. 'एफ-दक्षिण' वॉर्डाचे रमेश पाटील यांची 'एस' वॉर्डात आणि 'आर- दक्षिण' वॉर्डाचे मनीष साळवे यांची बदली नगर अभियंता विभागात झाली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 4 October 2025: रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन केलेल्या आरोपांवर आज अनिल परब उत्तर देणार आहेत. तसेच मुंबईतील सुपर स्टोअर्स आता 24 तास खुली राहणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीला वेग मिळेल आणि महसूल वाढीला हातभार लागेल अशी माहिती देण्यात आला आहे. राज्यातील इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.