Maharashtra Breaking News Today LIVE: रायगडमधील महाडच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 january 2026: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक राजकीय हालचाली घडत असताना, दुसरीकडे जिल्हा परिषद, नगर पंचायती निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.   

Shivraj Yadav | Feb 05, 2026, 20:49 PM IST
twitter
Maharashtra Breaking News Today LIVE: रायगडमधील महाडच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 january 2026: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक राजकीय हालचाली घडत आहेत. अजित पवारांच्या शोकसभेच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलं होतं. तसंच विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत शरद पवारांनी जय पवार आणि पार्थ पवारांशी संवाद साधला. तसंच दुसरीकडे जिल्हा परिषद, नगर पंचायती निवडणुका तोंडावर आल्या आहेत. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी डोकलामच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. लोकसभेतील 8 खासदारांना निलंबित केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या. 

 

5 Feb 2026, 20:48 वाजता

दिल्लीतील ‘लापता’ प्रकरणांबाबत दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

दिल्लीमध्ये अलीकडे समोर आलेल्या लापता व्यक्ती व मुलांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

दिल्ली पोलिसांचे PRO संजय त्यागी यांनी सांगितले की, लापता प्रकरणांबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. आतापर्यंत कोणत्याही गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिल्लीमध्ये लापता व्यक्ती आणि मुलांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. जानेवारी २०२६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत लापता प्रकरणांमध्ये घट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

लापता व्यक्तीची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात, ऑनलाइन माध्यमातून तसेच ११२ क्रमांकावर नोंदवता येते. ठराविक SOPनुसार दिल्ली पोलीस तातडीने शोध मोहीम राबवतात. लापता मुलांच्या प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग स्क्वाड’ तसेच क्राईम ब्रांचअंतर्गत अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कार्यरत असून त्या पातळीवरही तपास सुरू असतो.

लापता किंवा अपहरण प्रकरणांमध्ये कोणत्याही गँगचा सहभाग समोर आलेला नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

5 Feb 2026, 20:10 वाजता

रायगडमधील महाडच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग 

रायगड - महाडच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग 
एम्बायो कंपनीत भीषण आग 
औषधी  पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत आग 
भीषण आगीमुळे कंपनी परिसरात भीतीचे वातावरण
आगीमुळे परिसरात ज्वाळा  आणि धुराचे लोट

5 Feb 2026, 18:33 वाजता

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील पाचही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी 

दिग्दर्शक रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील पाचही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

5 Feb 2026, 18:13 वाजता

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची समितीकडून पाहणी

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची समितीकडून पाहणी

शिशीर शिंदे, पराग अळवणी हे उद्धव ठाकरेंच्या सेनेव्यतिरीक्त भाजप आणि शिवसेनेचे प्रतिनीधी प्रथमच बैठकीस उपस्थित

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पहिल्या संयुक्त बैठकीला सुरवात.

राज्य शासनाच्यावतीने नेमण्यात आलेल्या समितीची ही पहिली बैठक होतेय… राज्य शासनाचे सदस्य आणि स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही पहिली एकत्रित बैठक पार पडत आहे.

16 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकावर भाजप आमदार पराग अळवणी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांचा या समितीमध्ये सहभाग करण्यात आला होता. आजच्या बैठकीला हे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे नेते बैठकीत सहभागी आहेत.

तर या स्मारक समितीवर उद्धव ठाकरे अध्यक्ष, आदित्य ठाकरे सदस्य आणि सुभाष देसाई हे सचिव, MMRDA चे आयुक्त, महानगर पालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव देखील समितीमध्ये कार्यरत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असल्याने स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती... 

स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्याचे काम निधी अभावी रखडले आहे...

5 Feb 2026, 17:23 वाजता

भाजप नेते  मुंबई महापालिकेतील नव्या कार्यालयाचा उद्या ताबा घेणार

मुंबई महापालिकेतील नव्या कार्यालयाचा भाजप नेते उद्या ताबा घेणार

भाजप मुंबई महापालिका गटनेते गणेश खणकर यांनी केली पाहणी

भाजप नगरसेवकांसोबत महापालिकेतील नव्या पक्ष कार्यालयाची केली पाहणी

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भाजप पक्ष कार्यालयाचे  उद्या उद्घाटन 

नव्या कार्यालयाची पुजा नवे गटनेते गणेश खणकर यांच्या हस्ते  होणार .

सकाळी १० वाजता नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन 

मराठमोठ्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडणार

मुंबई अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम 

७ फेब्रुवारी रोजी ह्या कार्यालयातून महापौर पदाचा उमेदवार अर्ज दाखल करणार 

गेले ३ वर्ष प्रशासक बसल्याने कार्यालय होती बंद

5 Feb 2026, 17:17 वाजता

मोठी घडामोड! शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल

शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटीत दाखल झाले आहेत.. कालच्या  सांत्वन भेटीनंतर आज पुन्हा एकदा पवार  सहयोग सोसायटी मध्ये दाखल झाले आहेत. सध्या सहयोग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवार यांचे पुत्र पार्थ, पवार,आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार,राजेंद्र पवार,अजित पवार यांच्या बहिण विजया पाटील आदी मंडळी उपस्थित आहेत

5 Feb 2026, 17:04 वाजता

'तानाशाही नही चलेगी...', पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत असताना विरोधकांचा गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणास सुरुवात केली.
यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला.
राज्यसभेचे सभापती यांनी विरोधी खासदारांना बसून पंतप्रधानांना बोलू देण्याचे निर्देश दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू लागताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत घोषणाबाजी सुरू केली.

विरोधकांकडून “तानाशाही नहीं चलेगी”, “नेहरूंचा अपमान सहन करणार नाही”, “इंदिरा गांधींचा अपमान सहन करणार नाही” घोषणा दिल्या जात आहेत.

5 Feb 2026, 17:00 वाजता

पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड

पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहुन उड्डाण घेण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंडेंचा सातारा दौरा प्रस्तावित होता. परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सातारा दौरा रद्द करण्यात आला. दौरा रद्द करून पंकजा मुंडे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने नेत्यांच्या हवाई प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

5 Feb 2026, 16:48 वाजता

नवी मुंबईच्या जनतेने हरामाच्या पैशाला धुडकावलं, गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना टोला

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांनी वन मंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. नवी मुंबईच्या जनतेने हरामाच्या पैशाला ठोकरलं आणि नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांकडे शहराचं नेतृत्व दिल त्याबद्दल नवी मुंबईकरांचे आभार व्यक्त करतो अशा शब्दांत नाईकांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. यावेळी स्वच्छ नवी मुंबई, भिकारिमुक्त नवी मुंबई, फेरीवाला मुक्त शहर आणि शिक्षण, आरोग्य बाबत सर्व सामान्य जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करू असे आश्वासन गणेश नाईक यांनी दिलं आहे.

5 Feb 2026, 16:06 वाजता

कोल्हापुरात भावोजीनेच मेहुण्यावर केला प्राणघातक हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील ASC कॉलेज परिसरात भावोजीने मेहुण्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  ए वन वडा सेंटरचे मालक मनोज बडवे असं हल्ल्यात जखमी झालेल्या मेहुण्याचे नाव आहे. मनोज बडवे यांचे  सख्खे भाऊजी महेश काजवे यांनी जुना कौटुंबिक वादाचा राग मनात धरून शस्त्राने प्राणघातक हल्ला केलाय. हे सर्व दृश्य कॅमेरा मध्ये चित्रित झाली असून या हल्ल्याप्रकरणी  इचलकरंजी मधील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटना घडल्यानंतर तात्काळ आरोपी महेश बडवे याला अटक केली आहे. मनोज बडवे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडत होते. त्याचवेळी महेश काजवे हे अचानक तेथे आले थेट मनोज बडवे यांच्या डोक्यावर हल्ला चढवला.  या हल्ल्यात मनोज बडवे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इचलकरंजी मधील IGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.