Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणखी एक दुर्घटना

Breaking News Today 8 July Rain Updates: : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपलंय. जनजीवन विस्कळीत झालंय असून घरं, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. दुसरीकडे आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आज प्रस्थान होणार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा. 

Maharashtra Breaking News Today LIVE: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणखी एक दुर्घटना
08 July 2026 12:29 PM (IST)

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणखी एक दुर्घटना

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणखी एक दुर्घटना अंधेरी मधे घडली आहे. ९:३० सकाळी कामावर जात असताना एका दुचाकीस्वाराच्या  डोक्या वर वाहनावर अचानक झाड कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. 

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी आणि पाहणी करण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या तयारीवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

08 July 2026 12:15 PM (IST)

सोमेश्वर धबधबा खळखळून वाहतोय 

मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकचा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला सोमेश्वर धबधबा खळखळून वाहताना दिसत आहे

08 July 2026 11:32 AM (IST)

राज्यातील विदारक चित्र बदलण्यासाठी ग्रामविकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय

अद्याप ही ७ हजार ४४४ गावांत स्मशानभूमी उपलब्ध नाही

लोकप्रतिनिधींना निधी देताना स्मशानभूमी असल्याचा दाखला द्यावा लागणार

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत माहिती

स्मशानभूमी दाखल्यानंतरच इतर कामांसाठी निधी देणार

राज्यात २ हजार ८२० ग्रामपंचायत आहेत

४० हजार ७६० महसुली गावे आहेत

३२ हजार ७९१ ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध आहेत

मात्र ८० टक्के ठिकाणी स्मशानभूमी असुन २० टक्के स्मशानभूमी नाही

08 July 2026 11:08 AM (IST)

माळीणमध्ये पुन्हा दरड कोसळली

आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोसळलेली दरड दोन घरांवर येऊन पडल्याने मोठा धोका निर्माण झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

08 July 2026 10:36 AM (IST)

महापालिकेने सिंहस्थ साठी उभारलेले तात्पुरते ऑफिस गेले वाहून 

 तपोवन परिसरात सुरू असलेल्या कामासाठी उभारण्यात आले होते शेड चे ऑफिस 
 पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे शेड गेले वाहून

08 July 2026 10:28 AM (IST)

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर 

- मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने महापालिका आयुक्तांचा निर्णय

- शहरातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाला महापालिकेच्या सूचना

08 July 2026 10:25 AM (IST)

सातपूरमधील नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर; किनारी भागात सतर्कतेचा इशारा

जोरदार पावसामुळे नंदिनी नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहतेय

महादेववाडी व गोरक्षनाथ रोडवरील पूल पाण्याखाली

पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

नदीकाठच्या घरांतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

08 July 2026 09:49 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  रत्नागिरीमधील दहिवलीत डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवली येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली घरासह गाडले गेलेले शांताराम बाळा शेलार आणि सतीश शांताराम शेलार या बाप लेकांचे मृतदेह २१ तासानंतर हाती लागले तर दुर्घटनेनंतर चार तासांनी कल्पना शांताराम शेलार या वृद्धेला ढिकाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले. दरम्यान येथील १५ कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले..

08 July 2026 09:45 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  रत्नागिरीमधील दहिवलीत डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवली येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली घरासह गाडले गेलेले शांताराम बाळा शेलार आणि सतीश शांताराम शेलार या बाप लेकांचे मृतदेह २१ तासानंतर हाती लागले तर दुर्घटनेनंतर चार तासांनी कल्पना शांताराम शेलार या वृद्धेला ढिकाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले. दरम्यान येथील १५ कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे तातडीने चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले..

08 July 2026 09:32 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  72 तासांपासून पुणे जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस, भीमाशंकरचा संपर्क तुटला

पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमाशंकर परिसराचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. भीमाशंकरकडे जाणाऱ्या दोन्ही प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांना पुढे जाता येत नाही. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून पर्यटकांना या मार्गावरील प्रवास टाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

08 July 2026 09:29 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates :  वसई-विरार उपनगरात पुराची गंभीर परिस्थिती 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार उपनगरात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागातील पाणी ओसरलेले नाही. संपूर्ण शहराचा तब्बल ७० टक्के भाग पाण्याखाली गेला असून, लाखो नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. घरात आणि सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांनी नातेवाईकांकडे किंवा हॉटेल्समध्ये आश्रय घेतला आहे. या पावसाने मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाच्या शहरातील पायाभूत सुविधा, शहर नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

08 July 2026 09:22 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : रोहा शहराला पुराच्या पाण्याचा वेढा, नागरिकांचे स्थलांतर

कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ 

अष्टमी आणि रोहा शहराच्या काही भागात पुराचे पाणी

रोहा अष्टमीला जोडणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद

रोहा ते नागोठणे वाहतूक ठप्प

रोहा कोलाड मार्गावरही पुराचे पाणी

रोह्यातील सर्वप्रकारच्या शाळा आज बंद राहणार 

कामावर पोहोचू शकत नसल्याने कामगारांची दांडी

बचाव पथकांकडून नागरिकांचे स्थलांतर

 

08 July 2026 09:12 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्यामुळे नद्याची पाणी पातळी रात्रीपासून स्थिर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस काहीसा कमी झाल्याने रात्रीपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी अवघ्या 2 इंचाने वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट 4 इंच इतकी आहे. असं असले तरी पंचगंगा नदीची वाटचाल हळूहळू इशारा पातळीकडे सुरू आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील एकूण 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत

08 July 2026 09:04 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : पुणे-नाशिक महामार्गावर पूरस्थिती, वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण-वाकी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्याचे पाणी थेट महामार्गावर आल्याने रस्ता जलमय झाला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक वाहने पाण्यात अडकली असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय. 

08 July 2026 08:58 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : गेल्या सात तासांपासून ढगफुटीसदृष्य पावसाने नाशिकला झोडपले

सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीत भरलं पाणी 
 मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी
दसक परिसरात रस्ते जलमय 
पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर पाण्यात 
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली 
 गेल्या सात तासांपासून ढगफुटीसदृष्य पावसाने नाशिकला झोडपले

08 July 2026 08:58 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : गेल्या सात तासांपासून ढगफुटीसदृष्य पावसाने नाशिकला झोडपले

सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीत भरलं पाणी 
 मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी
दसक परिसरात रस्ते जलमय 
पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर पाण्यात 
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली 
 गेल्या सात तासांपासून ढगफुटीसदृष्य पावसाने नाशिकला झोडपले

08 July 2026 08:50 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : वसई-विरारमध्ये पावसाचा जोर कायम

--वसई रोड, विरार रेल्वे स्टेशनमध्ये साचलं पाणी
--मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका
--पावसामुळे रेल्वे वाहतूक मंदावली

08 July 2026 08:49 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला

खोपोली ते वाकणफाटा वाहतुकीसाठी बंद
आंबा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी
पाली जवळ पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी
दोन्ही बाजूकडून येणारी वाहतूक ठप्प

08 July 2026 08:45 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काही तास उरले असताना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत घट झालीयं.   इंद्रायणी नदीवरील पुलावरून वाहणारे पाणी कमी झालंय. मात्र पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरू होणार नाही. त्यामुळे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. 

08 July 2026 08:43 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचं थैमान

मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती
शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप
शहरातील नालेसफाईची पोलखोल
कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

08 July 2026 08:28 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : नाशिकला तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट

7 ते 10 या वेळेत विजांच्या गडगडाटासह होऊ शकते अतिवृष्टी 

नाशिकसह मुंबई, ठाणे, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाऱ्याचा अंदाज

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन

अनावश्यक प्रवास टाळा; सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहा

हवामान विभागाचा (IMD) तातडीचा इशारा

08 July 2026 08:26 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : जायकवाडी धरणात अवघा 28 टक्के पाणीसाठा

जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी मराठवाड्यातील मुख्य धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथील धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नसल्यामुळे मराठवाड्यात चिंतेचे वातावरण आहे.  मराठवाड्यातल्या लघु प्रकल्पांत तर केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मंगळवारी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून २१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यानंतर त्यामध्ये घट होत संध्याकाळी १५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी हे पाणी जायकवाडी पोहोचणार असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात साधारण एक टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. 

08 July 2026 08:25 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ

नाशिकमधील गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं. मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरूये. त्यामुळे  रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली गेले आहेत. तर आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा  अलर्ट देण्यात आलायं. 

08 July 2026 08:23 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळली

दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू

9हून अधिक जण बेपत्ता, शोधकार्य सुरु

NDRF, पोलीस, अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु 

08 July 2026 08:22 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

जळगावमधील अमळनेरमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झालाय. मुलांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. खदाणीत सेल्फी काढतांना एक मुलगा पाय घसरून पडला, त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी उड्या मारल्या. मात्र तिघांचाही 30 फूट पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. 

08 July 2026 08:19 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : पुरात अडकलेल्या गरोदर महिलेची सुटका

पालघर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे  केळवे परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी एक गरोदर महिला घरामध्ये अडकले असता तेथील आशा सेविका, शेजारी आणि नागरिकांनी त्या महिलेला एका दरवाजावर ठेवून पुरातून जवळपास एक किलोमीटर सुरक्षित स्थळी बाहेर काढलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.पालघर मधील पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे केळवे परिसरातील रस्ते गेले दोन दिवस बुडून राहिले होते.त्यामुळे त्याचा मुख्य शहराशी संपर्क तुटला होता. आता या भागातील पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आलंय

08 July 2026 08:18 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : पालघरमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट  

--शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
--विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
--जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

08 July 2026 08:17 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : मान्सूनचा वेग आता मंदावणार 

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे.  हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला 'ब्रेक' लागण्याची शक्यतायं. आज दुपारपासूनच पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खंड २० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

08 July 2026 08:16 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : मुंबईतील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मध्य वैतरणा व मोडकसागर धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली असून सर्व धरणे   ५० टक्क्यांनी भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याच्या समस्या आता मिटलीयं. जून महिना कोरडा गेल्यामुळे धरणांनी तळ गाठला होता. मात्र आता मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली असून  मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता संपलीयं. 

08 July 2026 08:15 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी  

--विहार तलाव ओसंडून वाहू लागला 
--विहार तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस  
--इतर धरणांच्या पाणीपातळीतही वाढ  

08 July 2026 08:15 AM (IST)

Breaking News Today LIVE Updates : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी  

--खडकवासला धरण ओव्हरफ्लो
--खडकवासला धरणाचे सर्व 11दरवाजे उघडले 
-- धरणातून 7500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग 
--मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
--भिडे पुल आधीपासूनच वाहतुकीसाठी बंद 
---आता नदीपात्रातील रस्ताही बंद होणार
--पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला 
---पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे जलपूजन करणार

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Neha Choudhary

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

Read More