Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: शेतक-यांना आणि लाडक्या बहिणींना मदत मिळेल, मात्र नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत सांगता येत नाही; गिरीश महाजन यांची कबुली

Maharashtra Breaking News Today LIVE: महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातील ताज्या बातम्यांचा धावता आढावा एकाच क्लिकवर...

Maharashtra Breaking News Today LIVE: शेतक-यांना आणि लाडक्या बहिणींना मदत मिळेल, मात्र नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत सांगता येत नाही; गिरीश महाजन यांची कबुली
09 October 2025 09:45 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : मुंबईत प्रवाशांचा भुयारी मेट्रोला प्रतिसाद...

Breaking News Today LIVE Updates : मुंबईत प्रवाशांचा भुयारी मेट्रोला प्रतिसाद

दक्षिण मुंबईत प्रवाशांचा भुयारी मेट्रोला मोठा प्रतिसाद दिलाय. पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील CSMT मेट्रो स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल भुयारी मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्यात उद्घाटन केलं. मेट्रो लाईन 3 आजपासून पूर्ण क्षमेनेते प्रवाशांच्या सेवेत रुजू झालीय. यामुळे लोकल रेल्वेवरचा ताण कमी होणारेय. आतापर्यंत आरे मेट्रो स्थानक ते वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकापर्यंत मेट्रो सेवा सुरू होती. मात्र आजपासून दक्षिण मुंबईतील कफ परेडपर्यंत मेट्रोची सेवा सुरू झाली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय.

09 October 2025 09:44 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : ठाण्यातील कळव्यामध्ये महिलेचा धुडगूस...

Breaking News Today LIVE Updates : ठाण्यातील कळव्यामध्ये महिलेचा धुडगूस

ठाण्यातील कळवा पूर्व परिसरात एका महिलेने रस्त्यावरील स्टॉलची तोडफोड केलीय. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या पाणीपुरी आणि मोमोज दोन स्टॉलचे महिलेने नुकसान केले. स्टॉलवरील साहित्याची नासधूस करत गरम तेलाची कढईदेखील सांडण्याचा प्रयत्न केला. या महिलेच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.

09 October 2025 09:41 PM (IST)

नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा; कधी सोडणार तिढा?...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा; कधी सोडणार तिढा?

09 October 2025 08:35 PM (IST)

दिवाळीआधी सरकारची मोठी घोषणा! खात्यात 8 टक्के जास्त रक्कम....; 49.19 लाख...

दिवाळीआधी सरकारची मोठी घोषणा! खात्यात 8 टक्के जास्त रक्कम....; 49.19 लाख लोकांना होणार फायदा, असेल फक्त एकच अट

09 October 2025 08:34 PM (IST)

BR Gavai: मी हैराण झालो होतो, पण..., वकिलाने केलेल्या शूज हल्ल्यावर...

BR Gavai: 'मी हैराण झालो होतो, पण...,' वकिलाने केलेल्या शूज हल्ल्यावर सरन्यायाधीश गवईंनी सोडलं मौन

09 October 2025 08:33 PM (IST)

मुंबईत युगांडा,केनियातील महिलांचे बेकायदेशीर वास्तव्य;पोलिसांनी असा केला...

मुंबईत युगांडा,केनियातील महिलांचे बेकायदेशीर वास्तव्य;पोलिसांनी 'असा' केला नेटवर्कचा फांडाफोड!

09 October 2025 08:31 PM (IST)

Jio चा दिवाळीआधीच मोठा धमाका, 800 रुपयांच्या आत मिळेल पहिला सेफ्टी शील्ड फोन;...

Jio चा दिवाळीआधीच मोठा धमाका, 800 रुपयांच्या आत मिळेल पहिला सेफ्टी शील्ड फोन; 100 रुपयांत करा बुकींग!

09 October 2025 07:01 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : घायवळ बंधुंचे आणखी कारनामे समोर...

Breaking News Today LIVE Updates : घायवळ बंधुंचे आणखी कारनामे समोर

निलेश घायवळ बंधू सचिन घायवळचे आणखी कारनामे समोर आलेत. 10 फ्लॅट बळकावल्याप्रकरणी घायवळ बंधुंसह घायवळ गँगवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय.पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  कोथरुड गोळीबारानंतर मोक्कासह हा सलग 5 वा गुन्हा दाखल झालाय.

09 October 2025 05:02 PM (IST)

गुंड निलेश घायवळचा त्या व्हिडीओमुळे भाजपचा मोठा नेता अडचणीत?; कोण आहे तो?...

गुंड निलेश घायवळचा 'त्या' व्हिडीओमुळे भाजपचा मोठा नेता अडचणीत?; कोण आहे तो?

09 October 2025 04:49 PM (IST)

20 की 21, नक्की कोणत्या दिवशी दिवाळीची सुट्टी? किती दिवस शाळा-कॉलेज बंद?...

20 की 21, नक्की कोणत्या दिवशी दिवाळीची सुट्टी? किती दिवस शाळा-कॉलेज बंद?

09 October 2025 04:49 PM (IST)

मला कॉल करुन धमक्या.., डॅनी पंडीतने हात जोडून मागितली माफी.. माझ्या आईला...

'मला कॉल करुन धमक्या.., डॅनी पंडीतने हात जोडून मागितली माफी..' माझ्या आईला दोघांनी घेरलं आणि..' 

09 October 2025 04:49 PM (IST)

Breaking News Today LIVE Updates : उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Breaking News Today LIVE Updates : उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर

उद्यापासून (10 ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 3 दिवसांत 6 विभागीय बैठका घेणार आहेत. तर 
10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान फडणवीसांच्या विभागनिहाय बैठका होणार आहेत. नाशिक आणि मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर येथे फडणवीस यांच्या जिल्हानिहाय बैठका होणार आहेत. 

09 October 2025 04:27 PM (IST)

महिलेच्या अंगावर एकही कपडा नाही अन् पुरुष...; मार्केटमधील धक्कादायक VIDEO...

महिलेच्या अंगावर एकही कपडा नाही अन् पुरुष...; मार्केटमधील धक्कादायक VIDEO व्हायरल

09 October 2025 04:26 PM (IST)

गरज पडल्यास मी आजच..., घायवळ प्रकरणी योगेश कदमांनी सोडलं मौन, वस्तुस्थिती...

'गरज पडल्यास मी आजच...', घायवळ प्रकरणी योगेश कदमांनी सोडलं मौन, 'वस्तुस्थिती लक्षात घेऊन...'

09 October 2025 03:01 PM (IST)

एका व्यक्तीच्या शिफारशीमुळे घायवळला शस्त्रपरवाना, त्या व्यक्तीचं नाव...

'एका व्यक्तीच्या शिफारशीमुळे घायवळला शस्त्रपरवाना, त्या व्यक्तीचं नाव फडणवीसांना...', रामदास कदमांचा रोख नेमका कोणाकडे?

09 October 2025 02:28 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: नागपूर मधील त्या सह दुय्यम निबंधकाचे...

Maharashtra Breaking News Today LIVE: नागपूर मधील 'त्या' सह दुय्यम निबंधकाचे अखेर निलंबन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून निलंबन आदेश जारी. सह दुय्यम निबंधक अतुल कपाले निलंबित. महसूल मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक दिलेल्या भेटीत ड्रॉवरमध्ये सापडले होते पैसे. नोंदणी व मुद्रांक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी केल्या होत्या तक्रारी. ड्रॉवरमध्ये पाच हजार रुपये रोकड सापडल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळेंची कारवाई

09 October 2025 01:36 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: या खुर्चीवर बसल्यापासून एकाही अशा...

Maharashtra Breaking News Today LIVE: या खुर्चीवर बसल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिलेला नाही. लवकरच माहिती घेऊन मी यावर बोलणार आहे. मी परत सांगतो गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी परवाना दिला नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

09 October 2025 01:33 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: 3 दिवसांत 3 मोठे नेते संभाजीनगरात येणार...

Maharashtra Breaking News Today LIVE: 3 दिवसांत 3 मोठे नेते संभाजीनगरात येणार 

मनपा निवडणुकीचं रणशिंग संभाजीनगरातून फुंकलं जाणार आहे. 3 दिवसांत 3 मोठे नेते संभाजीनगरात येणार आहेत. उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हा दौरा आहे. 11 ऑक्टोबरला शिवसेना UBTचा शेतकरी मोर्चा आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात  संभाजीनगरमधून राजकीय घडामोडी वाढणार आहेत. 

09 October 2025 01:02 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: ओबीसी तरुणांच्या आत्महत्या...

Maharashtra Breaking News Today LIVE: ओबीसी तरुणांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करवा

कोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. 

09 October 2025 01:01 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा...

Maharashtra Breaking News Today LIVE: 'गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय'

गुंड सचिन घायवळच्या बंदूक परवान्यावरून रोहित पवारांनी थेट सभापती राम शिंदेंवर निशाणा साधलाय. राम शिंदेंच्या सांगण्यावरूनच घायवळला बंदूक परवाना दिला असावा असा दावाच रोहित पवारांनी केलाय. 

09 October 2025 12:26 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर...

Maharashtra Breaking News Today LIVE: अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर ट्रोल

अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर ट्रोल होतेय.. दीपिकानं हिजाब परिधान केल्यानं वाद पेटलाय.. अबुधाबी टुरिझमसाठी दीपिका आणि रणवीरनं एक जाहिरातीचं शूट केलं.. याच जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. या जाहिरातीत दीपिका पादुकोण शेख जायद मशिदीत हिजाब घालून उभी असल्याचं पाहायला मिळतंय.. आता याच हिजाबवरुन दीपिकाला ट्रोल करण्यात येतंय.. 

09 October 2025 12:21 PM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: कुणाचाही दबाव असेल पण अधिकारांची जाणीव...

Maharashtra Breaking News Today LIVE: कुणाचाही दबाव असेल पण अधिकारांची जाणीव असायला हवी. योगेश कदम यांची सही आहे, तेच याला जबाबदार आहेत. हा गुंड आहे व गुंडाचा भाऊ आहे असंही पोलिसांनी म्हटले आहेत. ज्या ग्राऊंडवर पोलिसांनी नाकारला, तसा यांनीही नाकारला हवा होता.डान्सबार, वाळू चोरी प्रकरण आणि हे प्रकरण घेवून मी लोकायुक्तांकडे जाणार आहे. कोर्टातही जाणार आहे.

09 October 2025 11:44 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील गँगवॉरला सरकारचा पाठिंबाः...

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील गँगवॉरला सरकारचा पाठिंबाः अनिल परब

पुण्यात मोठे गॅंगवॉर सुरू आहे. 70 गॅंग तिथं आहेत. सरकारचे पाठबळ त्यांना आहे. निलेश घायवळ देशाबाहेर गेला आहे. याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना मंजूर केला आहे. याची एक प्रक्रिया आहे. पोलिसांकडून सर्व तपासणी करतात. हा सोपा विषय नाही. समाजात त्याची इभ्रत असावी लागते.

09 October 2025 11:44 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: अहिल्यानगरमध्ये आज असदुद्दीन ओवैसींची...

Maharashtra Breaking News Today LIVE: अहिल्यानगरमध्ये आज असदुद्दीन ओवैसींची सभा

अहिल्यानगर शहरांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे. गेल्या आठवड्यात रद्द झालेली सभा आज होणार आहे. आज संध्याकाळी शहरातील मुकुंदनगर भागातील CIV मैदानावर एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींसह माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे पदाधिका-यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. या सभेत शहरातील काही नगरसेवक एम आय एम मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सभेची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेत ओवैसी, इम्तियाज जलील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

09 October 2025 11:03 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: नागपुरात उद्या सकल ओबीसी समाजाचा...

Maharashtra Breaking News Today LIVE: नागपुरात उद्या सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा

-नागपुरात उद्या सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा
-उद्याच्या मोर्चासाठी नागपुरात जय्यत तयारी
-ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून आढावा
-2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी  महामोर्चा 
-यशवंत स्टेडियमपासून निघणार महामोर्चा....
-सकल ओबीसी महामोर्चा मार्ग......यशवंत स्टेडियम, पंचशील टॉकिज, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, झिरो माइल पॉईंट .... आणि संविधान चौक 
- संविधान चौक  येथे सभा होणार

09 October 2025 11:01 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढव्यात आय लव मोहम्मदचे...

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढव्यात 'आय लव मोहम्मद'चे बॅनर

पुण्यातील  कोंढवा मिठा नगर परिसरात एटीएस आणि पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर याच मिठानगर परिसरात I love u Mohammed चे ही फ्लेक्स लावण्यात आले आहे त्याचा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिठा नगर परिसरातील दुकाने सुद्धा बंद करण्यात आली आहे. पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी स्वतः या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.

09 October 2025 10:59 AM (IST)

...

09 October 2025 10:49 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: योगेश कदमांच्या आदेशानंतरही परवाना नाही...

Maharashtra Breaking News Today LIVE: योगेश कदमांच्या आदेशानंतरही परवाना नाही, शासनाच्या आदेशानंतरही घायवळला परवाना नाही

योगेश कदमांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली..मात्र शिफारस आल्यानंतरही पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नसल्याची माहिती आता समोर येतेय.. पुणे पोलिसातील वरिष्ठ अधिका-यांनी घायवळला शस्त्र परवाना दिला नाही.. 20 जानेवारीला पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवानी नाकारली होती.. मात्र त्यानंतर 26 जूनला शस्त्र परवान्यासाठी शासन आदेश आला. मात्र त्यावर होल्ड असं पोलीस अधिका-यांनी लिहिल्याची माहिती समोर आलीय.

09 October 2025 10:46 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसचं सर्च...

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसचं सर्च ऑपरेशन

एटीएस कडून पुण्यातील कोंढवा परिसरात रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑपरेशनबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी सुरू आहे.

09 October 2025 10:04 AM (IST)

...

09 October 2025 09:57 AM (IST)

...

09 October 2025 09:22 AM (IST)

कबुतरांमुळे मुंबईला लागणार ब्रेक? दिवाळीचा उल्लेख करत जैन समाजाचा अल्टीमेटम; ...

कबुतरांमुळे मुंबईला लागणार ब्रेक? दिवाळीचा उल्लेख करत जैन समाजाचा अल्टीमेटम; 'हिंदू धर्मात...'

09 October 2025 09:08 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: मराठ्यांनंतर मुंबईत आता ओबीसींचा एल्गार...

Maharashtra Breaking News Today LIVE: मराठ्यांनंतर मुंबईत आता ओबीसींचा एल्गार 

मराठा बांधवांनंतर आता आझाद मैदानात कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा. मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज आझाद मैदानावर दाखल. आझाद मैदानात भला मोठा मंच उभारला असून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात अनेक कुणबी समाजाचे नेतृत्व करणारे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती.प्रशासनाने मराठा बांधवांना बळी पडत त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं कुणबी समाजाचे म्हणणं..मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिले तर कुणबी समाज येणाऱ्या काळात नाहीसा होईल. हैदराबाद गॅझेट वर कुणबी समाजाने व्यक्त केली नाराजी

09 October 2025 08:09 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: कोल्ड्रिफपाठोपाठ आणखी 2 खोकल्याच्या...

Maharashtra Breaking News Today LIVE: कोल्ड्रिफपाठोपाठ आणखी 2 खोकल्याच्या औषधात विषारी घटक 

मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटकामुळे लहान बालकांचा मृत्यू झाला... त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध प्रशासनाने राबवविलेल्या मोहिमेनंतर आणखी 2 खोकल्याच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचे आढळून आले आहे... त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सुद्धा सतर्क झाली आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात राज्यातील या उत्पादनाच्या वितरणाचा आढावा घेतला. मात्र राज्यामध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधाचे वितरण झाले नसल्याचे आढळले

09 October 2025 08:08 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीच्या तोंडावर वीज कर्मचा-यांचा...

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीच्या तोंडावर वीज कर्मचा-यांचा सर्वसामान्यांना शॉक 

राज्यातील वीज कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत... वीज कंपनीतील खासगीकरणाविरोधात कर्मचा-यांनी संपाचं हत्यार उपसलंय...7 संघटनांचे 42 हजार कर्मचारी 11 ऑक्टोबरपर्यंत संपावर जाणार आहेत.. मात्र कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असून संपावर गेल्यास मेस्मा लावण्याचा इशारा महावितरणने दिलाय..वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही असे अश्वासन देऊनही सरकारने ते न पाळल्याने हे कर्मचारी संपावर जात आहेत.

09 October 2025 08:06 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: कोल्ड्रिफ कंपनीचा मालक रंगनाथन ताब्यात...

Maharashtra Breaking News Today LIVE: कोल्ड्रिफ कंपनीचा मालक रंगनाथन ताब्यात 

-कोल्ड्रिफ कंपनीचा मालक रंगनाथन ताब्यात 
-कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 24 लहान मुलांचा मृत्यू 
-चौकशीनंतर रंगराजन यांना अटक होण्याची शक्यता 
-मध्य प्रदेश पोलिसांची तामिळनाडूत कारवाई 

09 October 2025 08:05 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसचं सर्च...

Maharashtra Breaking News Today LIVE: पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसचं सर्च ऑपरेशन

एटीएस कडून पुण्यातील कोंढवा परिसरात रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑपरेशनबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी सुरू आहे.

09 October 2025 08:03 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार...

Maharashtra Breaking News Today LIVE: गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

-गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार
-शस्त्र परवान्यामुळे सचिन घायवळ चर्चेत
-निलेश घायवळनंतर त्याचं संपूर्ण कुटुंब फरार
-पुणे पोलीस घायवळ कुटुंबाच्या मागावर

09 October 2025 08:02 AM (IST)

...

09 October 2025 07:58 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र आघाडीवर;...

Maharashtra Breaking News Today LIVE: देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र आघाडीवर; NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

ठाणे महानगरपालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे याच्यावरील कारवाईने खळबळ उडाली असताना देशभरातील भ्रष्टाचार विरोधी कारवायांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे उघड झाले आहे... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून माहिती समोर आलीय... 2023च्या अहवालानुसार, देशभरात एकूण 2 हजार 875 सापळे रचण्यात आले, यापैकी सर्वाधिक 795 कारवाया महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत... संपूर्ण देशातील कारवाईपैकी 28 टक्के सापळे हे महाराष्ट्रातच रचण्यात आले आहे... यंदा 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 530 सापळा कारवाया करण्यात आल्या... त्यात 785 शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना अटक केली...महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या, कर्नाटक  तिसऱ्या, तर गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीकडे राज्यातील अनेक माजी व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. 

09 October 2025 07:57 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा...

Maharashtra Breaking News Today LIVE: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलीय. राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीचा शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला. पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे विद्यार्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

09 October 2025 07:52 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे खासदार...

Maharashtra Breaking News Today LIVE: अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज सभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवैसी काय बोलणार याकडे लक्ष

09 October 2025 07:05 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीआधीच मुंबईकरांना गिफ्ट, नवी मुंबई...

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवाळीआधीच मुंबईकरांना गिफ्ट, नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा आणि मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उदघाटन, मोदींकडून भाषणात दि.बा. पाटलांच्या कार्याचा गौरव

09 October 2025 06:50 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: पंतप्रधान मोदींच्या दौ-याचा आज...

Maharashtra Breaking News Today LIVE: पंतप्रधान मोदींच्या दौ-याचा आज दुसरा दिवस, ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यासोबत राजभवनात बैठक तर सीईओ फोरमसह ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार

09 October 2025 06:49 AM (IST)

Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यातील वीज कर्मचारी आजपासून संपावर...

Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यातील वीज कर्मचारी आजपासून संपावर

राज्यातील वीज  कर्मचाऱ्यांचा संप रात्री बारापासून सुरू झाला आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापरीक्षण या तिन वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील विज कर्मचाऱ्यांचा हा 72 तासांचा संप  पुकारला आहे. दरम्यान या तीन दिवसांच्या संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाने आपातकालीन नियोजन केले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे..संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम मेस्मा लागू केलाय.

Add Zee News as a Preferred Source

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More