)
फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली. पंकजा मुंडेंनी डॉ संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. संपदाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन लोटस कुठेच थांबणार नाही हळूहळू सर्वच तालुक्यात तुम्हाला पक्षप्रवेश झालेले दिसतील. ज्यांची नावे चर्चेत आहेत आणि ज्यांची नावे चर्चेत नाहीत अशा लोकांचेही प्रवेश होतील. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात मास्टर स्ट्रोक सुरू राहणार. 29 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. पर्यटक चाकरमानी यांना परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा फटका. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी. माणगाव जवळ वाहतूक ठप्प. मागील दीड तासांपासून वाहने अडकली कोंडीत.
धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बेमोसामी पाऊस
कापूस पिकाचे प्रचंड नुकसान..
एन पीक काढणीला पाऊसाने केली पिकांची दैना..
हाता तोंडाशी आलेला घास हिरवला गेला.
झी 24 तासच्या टू द पाईंट या मुलाखतीत नितेश राणे यांनी कोकणात स्वबळावर लढल्यास दोन्ही पक्षाची ताकद कळेल. स्वबळावर लढण्याची भाजप नेत्यांची मागणी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मृत डॉक्टर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करण्यात आलेल्या पोलिसांना निलंबित केलं असल्याचे माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. याच निमित्ताने मी आज जैन बोर्डिंगमध्ये आलो आहे. माझ्यावर होणारे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. जर मी खरंच दोषी असतो तर मी इथं आलोच नसतो असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे मिळाले नसल्याने हा गोंधळ घातला आहे.
दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकारीच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे आक्रमक. मतदारयादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्याने मुख्याधिऱ्यांना विचारला जाब. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दौंडचे मुख्याधिकारी कामकाज करीत नसल्याने विचारला जाब.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता मृत डॉक्टर महिलेला न्याय मिळावा आणि आरोपींवर कारवाई केली जावी अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलीय.
पराड्यातून जप्त केलेली निलेश घायवळच्या ताफ्यातली काळी स्कॉर्पिओ गाडी अखेर पोलिसांनी जप्त केली असून इतर गाड्यांचा शोध सुरू आहे. सध्या ही गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये लावली आहे.
जालन्यात काही दिवसांपासून सुरु असलेलं बंजारा समाजाचं उपोषण आता मागे घेण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थित विजय चव्हाण यांनी 9 व्या दिवशी उपोषण सोडलं आहे.
होय, मला शिंदेसाहेबांचा मला निरोप आलाय की आपल्याला कोणताही पक्ष अथवा व्यक्तीविरोधात बोलायचं नाही, मग मी तरी कुठे भाजपविरोधात बोलतोय मी तर जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्या विकृतीविरोधात बोलतोय, अशी मल्लीथानी धंगेकरांनी केली आहे. तोपर्यंत जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी बोलतच राहणार असा पुनउच्चारही धंगेकरांनी केला आहे.
वाशिम एसटी आगाराच्या वाहकाने 60 हजारांची रोकड आणि मौल्यवान वस्तू असलेली बॅग प्रवाशाला परत केली... छत्रपती संभाजीनगर ते वाशिम या बसमधील रॅकवर एका प्रवाशी त्याची बॅग विसरला होता.... यावेळी वाहकाने प्रामाणिकपनेने प्रवाशाला बॅग परत केली... बॅग परत मिळाल्याने प्रवाशाने एसटी वाहकाचे आभार मानले....
--निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
--मुंबई महापालिका जागावाटपाचं सूत्र ठरणार-सूत्र
---एकनाथ शिंदे मध्यरात्रीच अचानक दिल्ली दौ-यावर
--गेल्या दीड तासांपासून एकनाथ शिंदे मोदींच्या निवासस्थानी
- पक्ष-चिन्ह सुनावणीबबातच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता
-मुंबईसह आगामी मनपा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा?
-सीट शेअरिंग आणि प्रचाराबाबत प्राथमिक चर्चेची शक्यता
-भाजप-शिंदे युतीतील समन्वयाबाबत चर्चेची शक्यता
अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण , अतिवृष्टी आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणारेय... त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिलायं... यासाठी शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत...
वाशिमच्या शिरपूरमधील मुख्य रस्त्याची दुरवस्था झालीयं...या रस्त्यावर खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय... तर वाहन चालकांना घाण पाण्यातून वाहन चालवावं लागत आहे...त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, रस्त्याची दुरुती करण्याची मागणी केलीयं...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला...मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित होण्याची शक्यता...
नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या समोरच टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी एकमेकिंशी भिडल्या.. कार्यक्रमातच खुर्चीसाठी या महिलांची रेटारेटी झाली... 17 व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी 51 हजाराहून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली... नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसल्या होत्या. मात्र, या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती. त्यांच्या नावाची पाटीही टेबलवर ठेवण्यात आली होती. मात्र त्या सोप्यावर दोन महिला अधिकारी बसल्या.. यातील एकीची बदली दक्षिण भारतात झाली होती मात्र त्यांनी अद्याप मुख्यालय सोडलेलं नाही.. त्यांच्या ठिकाणी दुस-या महिला अधिकारी रुजू झाल्या..या दोन्ही अधिकारी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या... दोघीही व्यासपिठावर एकाच खर्चीवर बसल्या आणि खुर्चीवरुन दोघींमध्ये धक्काबुक्की सुरु झाली.. एकमेंना धक्के मारून त्या खर्चीवरून उठवत होत्या... त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले..
BMCवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती... भाजपकडून 150चं टार्गेट... शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी.. सूत्रांची माहिती..
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’…https://t.co/T7XhMBGtE7 < येथे वाचा सविस्तर#MumbaiMegaBlock #Megablock #localtrain
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 25, 2025
भंडारा जिल्ह्यात सध्या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून सगळेच पक्ष आपल्या सत्तेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच भंडारा येथे नुकताच पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमांमध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी मागील काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये 25 ते 30 टक्के कमिशन घेतले शिवाय कोणतेही काम न झाल्यास दावा केलेला आहे. यामध्ये करोडोंचा घोटाळा ही झाला असल्याचा त्यांनी सांगितले आहे. नगर परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दम देखील दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. व नंतर प्रशासक बसविण्यात आला. दुसरीकडे राज्याची सत्ता भाजपच्या हातात असताना भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे परिणय फुके आपल्या सरकारवरच टीका करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं कैक चर्चांना उधाण. दिल्लीमध्ये NDA मधील वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता.
पक्षासोबत बेइमानी केली त्याच्या घरात घुसून मारू अस वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे करकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नाना पटोले म्हणाले की पक्षासोबत एकनिष्ठ राहील पाहिजे पण जे पक्षात राहून बेइमानी करतील त्यांच्या घरात घुसून मारू त्यामुळे आता नाना पटोले यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे. एकंदरितच बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे वॉट्सअप सार्विलेन्स वर टाकले आहेत असे वक्तव्य केले होते... आणि आता काँग्रेस मधून सुद्धा कार्यकर्त्यांना दम दिला जातो.
दिवाळीत पावसाने अल्पशी हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार दि. 26 पर्यंत नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे
ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम सीमावर्ती महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर दिसणार आहे.
कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात जॉइंट व्हील पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची मध्यरात्री सुटका झालीय. उरुसाच्या निमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठे मोठे पाळणे येतात. यावर्षी आलेल्या जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिक बसले होते. हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो. मात्र काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला. यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. पाळणा चालकाने एक तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते. शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीने एक एक नागरिक खाली घेतला. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बिडकीन बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच तुंबळ मारहाण झाली. यात 17 वर्षीय तन्मय चोरमारे आणि संतोष ठाणगे हे दोघे गंभीर जखमी झाले.या दोघांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तन्मय चोरमारे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
राजकीय दबाव? 'वरिष्ठांनी तक्रारी डावलल्या असतील तर...'; सातारा महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुंडें, दानवेंचा सूचक इशाराhttps://t.co/u2FFhk15qX
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत काय म्हणाले धनंजय मुंडे? या प्रकरणाचं बीड कनेक्शन काय? जाणून घ्या राज्याला हादरवणाऱ्या बातमीतील महत्त्वाची…— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 25, 2025
Birthday Special: नागपूरच्या कोळसा खाण कामगाराचा मुलगा, रुपया-रुपया साठवून घेतला चेंडू, टीम इंडियाचा बॉलर आज करोडोंचा मालhttps://t.co/ClHMvK757S < येथे वाचा सविस्तर#birthdayspecial #IndianCricketer #TeamIndia #nagpur #SuccessStory
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 25, 2025
जळगाव शहरातील एका गाण्यांच्या कार्यक्रमात एक तरुण कमरेला बंदुक लावून नोटा उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शस्त्र परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केलं, त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हा परवाना निलंबित करावा यासाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे अहवाल सुद्धा पोलिसांनी सादर केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित तरुण पीयूष मणियार याला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित दिवाळीनिमित्त्ताने आयोजित गायनाच्या कार्यक्रमात नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल.
पुरे आता! क्षणोक्षणी बदलणाऱ्या हवामानाला, पावसाला नेमका कधी ब्रेक लागणार? 'ऑक्टोबर हिट'मध्येच आला सावधगिरीचा इशारा https://t.co/Dbpl0VBBNK
पुढच्या 24 तासांमध्ये कसं आणि कुठे बदलणार हवामान? कुठे पुन्हा पूरसदृश्य स्थितीची भीती? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.... #news…— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 25, 2025
अतिवृष्टीने कपाशीच्या पिकाचे मोठ नुकसान झाल आहे. त्यातच अद्याप ''''सीसीआय''''चे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विकावा लागला आहे. आठवडी बाजारात व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केल्याचे पाहायला मिळालं.
साता-याच्या फलटणमधील महिला डॉक्टरची हॉटेलमध्ये आत्महत्या. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 4 वेळा बलात्कार झाल्याचा उल्लेख, पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या, कुटुंबीयांचा आरोप. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे 21 वेळा केली होती तक्रार...तक्रारीची दखल न घेतल्याने टोकाचं पाऊल...
सातारा महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई. झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्याकडून दखल. आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश. महिला डॉक्टर बीडची मुंडे असल्याने वरिष्ठांनी तक्रार डावलली असेल तर गंभीर, SIT चौकशी करा; सातारा प्रकरणावर धनंजय मुंडेंची मागणी.
बीड मधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर वर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे केली होती आत्महत्या. अखेर आठ तासानंतर डॉक्टर महिलेच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोलापूर शहरात काल रात्री पुन्हा एकदा अतिवृष्टी सदृश पाऊस. शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात. शहरातील अवंती नगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर, तुळजापूर रोड या भागात नागरी वस्तीत पाणी साचायला सुरुवात. महिन्याभरापूर्वी सोलापूर शहरात अश्याच पद्धतीने पाऊस झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाली.
भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनासाठी 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी जारी केला आहे. 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने जैव विविधता संवर्धन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी या दोन गावांना प्रत्येकी 45.50 लाखाचा निधी दिला आहे.
वाळूज महानगर परिसरात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याकडून 16 लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. पीडित व्यापारी प्रदीप राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत हे उद्योजक असून त्यांची ओळख माणिकराव अस्वले आणि राम पवार यांच्या माध्यमातून श्रीपाद राजापूरकर याच्याशी झाली. ''''माझी अंधेरी एमआयडीसी कार्यालयात ओळख आहे, मी तुला वाळूजमध्ये प्लॉट मिळवून देतो'''', असे सांगून राऊत यांचा विश्वास संपादन केला. राऊत यांनी 10 डिसेंबर 2021 ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विविध बँक खात्यांमधून राजापूरकर यांना 16 लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. मात्र राजापूरकर यांनी प्लॉट मिळवून दिला नाही. अखेर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Breaking News Today LIVE Updates 25 october 2025 : मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली जिथं मोहोळ यांनी धंगेकरांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इथं हे राजकीय प्रकरण चर्चेत असतानाच साताऱ्यात फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावर लिहिलेली सुसाईड नोट या सर्व प्रकरणात बलात्कार झाल्याचा उल्लेख, पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या, कुटुंबीयांचा आरोप असे कैक फाटे फुटल्यानं आता हे प्रकरण आणि त्याचा तपास नेमकं कोणतं वळण घेणार, राजच्यात आज याव्यतिरिक्त कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचसंदर्भातील सर्व Live Updates एका क्लिकवर...