Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Swapnil Ghangale Tue, 25 Jun 2024-10:35 pm,

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Today Breaking News LIVE Updates: 'नीट' परीक्षेसंदर्भातील गोंधळाबरोबरच आज 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं काम काजाकडे विशे, लक्ष असणार आहे. राज्यामध्येही राजकीय बैठकींचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचीही जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. या प्रकरणात आता निलंबनाचा बडगा उगारला जात आहे. या आणि अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

Latest Updates

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने तिहार जेलमधून अटक केली आहे. सुप्रीम कोर्टात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार होती.
    दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने तिहार तुरुंगातच सीएम केजरीवाल यांची चौकशी केली आहे. यानंतर केंद्रीय संस्थेने त्याला अटक केली. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याला उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे.

     

  • एका तरूण तरूणीला क्षुल्लक कारणावरून जमावाने बेदम मारहाण केलीये... संभाजीनगरमध्ये सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ ही घटना घडलीये... हे तरुण तरुणी रस्त्यावर गप्पा मारत उभे होते, हे बघताच समाज सुधारणेचा ठेका घेतलेले परिसरातील समाजकंटक आणि टवाळखोर टोळकं त्याठिकाणी आलं आणि त्यांनी या तरूण आणि तरूणीला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीचा हा व्हीडिओ आता व्हायरल झालाय. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थीती नियंत्रणात आणली..

  • पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली आहे. टोपी आणि मास्क घालून अल्पवयीन आरोपीला बाहेर काढण्यात आलं. होंडा सिटी गाडीतून तो घराकडे रवाना झाला. आज दुपारी मुंबई हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर केला करत तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. 

  • राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.                       

  • मु्ंबईत सह्याद्री गेस्ट हाऊस जवळ उभ्या असलेल्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. एका वाहनचालकांना ताफ्यातील गाडीला धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना इशारा

    पीक कर्ज देताना बँकांनी शेतक-यांकडे CIBILची मागणी केल्यास त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना हा इशारा दिलाय. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिलाय. गेल्यावेळी सुद्धा तेच सांगितले मात्र, बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज असल्याचं फडणवीस म्हणालेत.

  • भुजबळांनी काडी लावली, मराठा एक झाले- मनोज जरांगे

    मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालो होतो. आरक्षणाची लढाई आता आपण अंतिम टप्प्यात आणली आहे, मरणाची शेवटची घटका मोजेपर्यंत मी समाजाजासोबत आहे. आपल्यासोबत कुणीही जातीयवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीयवाद करायचा नाही. आपल्याला अंतर वालीतील कुणी कितीही दुखावलं तरी आपण एकही शब्द बोलायचा नाही. ज्यांनी आपल्या विरोधात आंदोलन केले ते आपले शिवभाऊ आहेत आपण त्यांना दुखवायचं नाही. छगन भुजबळ यांचं दंगल होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

  • पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर

    पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Car Accident) अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन (bail) मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका केली होती. ही आटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आलं होतं. 

  • नीट पेपर फुटी प्रकरणी संजय जाधव याला 6 दिवसांची पोलीस कोठडी 

    नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये मध्यरात्री अटक करण्यात आलेला आरोपी संजय जाधव याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्याला आज न्यायालयात हजर केलं होतं. तर जलील पठाण याला कालच न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

  • सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात आज हंटर मोर्चा 

    बँकेतील घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करावी,तसेच प्रशासक नेमून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर हा मोर्चा काढण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा हंटर मोर्चा काढण्यात येणार असून शहरातील स्टेशन चौक येथून जिल्हा बँके पर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

  • भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर

    भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना आता दिल्लीतून संपर्क सुरू आहेत. राज्यातील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी काय करावे लागेल? याची माहिती घेतली जातेय. केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर काही जुन्या जाणत्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी दोन्ही नेते चर्चा करणार आहे. चर्चेअंती एक अंतिम अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सोपवला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्रातून अॅक्शन प्लान तयार होणार आहे. 

  • मुंबईला 20-22 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक; 2 धरणं झाली रिकामी

    मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.30 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरला आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा असून ही धरणं पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने रिकामी झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

  • शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा

    लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 100 जागा लढवण्याचा मानस असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचा जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

  • कोल्हापूरमधील सर्व रिक्षा-टॅक्सी आज बंद

    पासिंग दंडाविरोधात आज कोल्हापुरात रिक्षा बंद आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील 16 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालक आज संपावर गेलेत. उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा संप सुरु राहाणार आहे. या संपामुळे कोल्हापुरकरांचे हाल होत आहेत.

  • पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे नातेवाईक मुख्यमंत्र्यांना भेटले

    पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात निरीक्षणगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या नातेवाईकांनी, मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान, या मुलाला बेकायदेशीरपणे निरीक्षणगृहात ठेवल्याचं सांगत, त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

  • भाजपाला सोडचिठ्ठी देणारी महिला नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

    माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकला.

  • फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरणार

    UPSC परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षांर्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्राचा वापर केला जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीनं ठरवलं आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखले जाण्याची शक्यता आहे.

  • लातूरमध्ये विद्यार्थ्यांचीही चौकशी

    लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमरग्याच्या इराण्णा कोनगलवारच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळेस त्याच्या घरात 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली. ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीट आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस चौकशीला बोलवणार आहेत.

  • नीट तपासाच्या कक्षा वाढवल्या

    NEET पेपर फुटीप्रकरणात CBI कडून तपासाच्या कक्षा वाढवल्या आहेत.  बिहार, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाच प्रकरणांवर सीबीआयचा तपास सुरु आहे. डमी परिक्षार्थींबाबतही  CBI तपास करणार आहे.

  • आणीबाणीविरोधात आज भाजपाची देशभर आंदोलनं

    आणीबाणीविरोधात भाजपची आज देशभरात आंदोलनाची तयारी. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षाध्यक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

  • लोकसभाअध्यक्ष पदासाठी नामांकनं

    संसदेच्या अधिवेशनात आज दुस-या दिवशी लोकसभाअध्यक्ष पदासाठी नामांकनं भरली जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यात बैठक सुरु होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link