Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीपासून, विदर्भातील उमेदवारांच्या अर्जांपर्यंत... सर्व राजकीय घडामोडी एका क्लिकवर   

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी

Loksabha Election 2024 Live : आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु आहे. बारामती मतदार संघात खुद्द सुनेत्रा पवार यांनी गावखेड्यात जाऊन सामान्यांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या असतानाच आता अजित पवार गटाच्या अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिथं विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नावं जाहीर झालेल्या नेतेमंडळींची लगबगही सुरु आहे. तर, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नुकतीच 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्याच्या इतरही भागांमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी? इथं पाहा वेगवान अपडेट.... 

27 Mar 2024, 11:40 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजपच्या चिन्हावर लढण्यास किरण सामंत यांचा नकार

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढण्यास किरण सामंत यांचा नकार. संबंधित मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल असल्याने कोकणात धनुष्यबाण चिन्हावर लढणे अधिक सोयीस्कर असल्याचा सामंत दावा सामंत यांनी केला. भाजपने किरण सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदूर्गमधून इच्छुक असून ते उदय सामंत यांचे भाऊ आहेत. हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. 

27 Mar 2024, 11:38 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उबाठा गटाची यादी जाहीर होताच शरद पवार गटाचा विरोध 

ईशान्य मुंबई लोकसभा उबाठा कडून संजय पाटील उमेदवार जाहीर झाली. त्यानंतर एनसीपी शरद पवार गटाने विरोध करत घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. एनसीपी कार्यालय येथे घोषणाबाजी शरद पवार पक्ष कार्यालयात बैठक घेत असतानाच महाविकास आघाडी उमेदवार विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. 

27 Mar 2024, 11:34 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर....

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गटाकडून हातकंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु असून, नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत तर सुजित मिणचेकर हे हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत. चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 

राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठींबा मागत आहेत तर, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीने सांगितलं आहे. दरम्यान, नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणुक लढवण्याची देखील ईच्छा दर्शवली होती. परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे. 

27 Mar 2024, 11:31 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार- फडणवीस 

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार असून त्यांचे सरसेनापती गडकरी आज अर्ज दाखल करत आहेत. असं सांगताना गडकरी हे राष्ट्रीय नेते असल्याचं म्हणज पुढील पाच वर्षात देशातील गरिबी दूर करू असं आश्वासक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महायुती मोठी झाली. आता घड्याळ आमच्यासोबत विरोधकांचे बारा वाजवू. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

27 Mar 2024, 10:44 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसे आग्रही 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी आम्ही अर्ज केला आहे, असं मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं. आपल्या पक्षाकडून 17  मे साठी अर्ज करण्यात आल्याचं ते म्हणाले. याच तारखेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अर्ज केलेला आहे, असं असलं तरीही प्रचार सभेसाठी पहिला अर्ज केल्यामुळं आम्हालाच परवानगी मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

27 Mar 2024, 10:23 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : जे पी गावित अपक्ष उभे राहणार ?

रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजची शिरीष चौधरी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. जे पी गावित यांना देखील कार्यकर्त्यांसोबत नाशिक मध्ये चर्चा केल्यानंतर दिंडोरी लोकसभेतून उभा राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे जे पी गावित अपक्ष उभे राहणार की महाविकास आघाडीचे उमेदवार होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

27 Mar 2024, 10:21 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होणार? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी दोन महत्त्वाचे चेहरे शरद पवारांच्या भेटीला आले असून, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे आमदार जे पी गावित शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं म्हटलं गेलं. तर, रावेर विधानसभेचे काँग्रेस आमदार श्री चौधरी देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. 

27 Mar 2024, 10:19 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरून  संजय निरूपम नाराज

मुंबई वायव्य मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांच्या उमेदवारीवरून  संजय निरूपम नाराज असल्याचं म्हटलं जात असून, यासंबंधीची भूमिका ते बुधवारी दुपारी 12 वा. माध्यमांशी संवाद साधतामा मांडणार आहेत. 

27 Mar 2024, 10:07 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 

महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहेत.

27 Mar 2024, 10:06 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : सांगलीची जागा काँग्रेसला?

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी सांगलीची काँग्रेस प्रतिनिधी आज दिल्लीत जाणार आहेत. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सोनिया गांधींची घेणार भेट घेणार असून, आमदार विक्रम सावंत,विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने कॉंग्रेस मध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.