Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण, कोल्हापुरातून खुद्द शाहू छत्रपती महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असून, ते इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्यास कारणीभूत ठरू शकतात. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या टीकांवर कसं उत्तर देणार, सत्ताधाऱ्यांकडून कोणते चेहरे प्रभावी काम करत राजकीय रंगत वाढवणार... या सर्व घडामोडींच्या सर्व अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येतील.
16 Apr 2024, 12:59 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : सोलापुरात राम सातपुते यांच्या रॅलीला सुरुवात झाली असून, संभाजी महाराज चौकातून ते सात रस्त्यापर्यंत ही रॅली निघणार आहे. भाजप सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. या रॅलीच्या निमित्तानं सोलापुरात भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे.
16 Apr 2024, 11:40 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रवाना. निवडणूक कार्यालयाकडे आपला अर्ज सादर करून फडणवीसंच्या स्वागताला जाणार.
16 Apr 2024, 11:23 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : आताच्या क्षणाची मोठी बातमी. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी जाहीर. साताऱ्यातून उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत.
16 Apr 2024, 10:19 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची राज्यात सर्वाधिक मागणी असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभांवर सातत्यानं भर दिला जात असून, पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा पार पडल्या आहेत.
16 Apr 2024, 10:07 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीने सांगली बाबत खूप मोठी चूक केली आहे,पण 19 तारखेला 3 वाजेपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळेल आणि तीन दिवस अजून बाकी असून तीन दिवसात राजकारणात बरेच बदल होतात,
यामुळे पाहू, अशी भूमिका विशाल पाटील यांनी जाहीर केली आहे.
16 Apr 2024, 09:49 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस. 2024 लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याअगोदरच 2019 च्या लोकसभा निवडणूकी पेक्षा अधिक रक्कम आत्तापर्यंत तपासणीदरम्यान निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आली आहे. 1 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत देशभरातून 4658.13 कोटी रुपये आयोगाने जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
16 Apr 2024, 09:36 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : लातूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना लातूर शहरांचे आमदार अमित देशमुख यांची गाडी मराठा तरूणांनी आडवत घोषणाबाजी करत गाडी पुढं बोंबाबोंब आंदोलन केले आहे. आमदार अमित देशमुख हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी वासनगाव येथे जात असताना गावातील मराठा समाजाने गावच्या वेशीवरच त्यांच्या ताफा अडवला.यावेळी संतप्त मराठा तरुणांनी आमदार अमित देशमुख यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडत बोंबाबोंब आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे आणि अमित देशमुख यांना मराठा आरक्षणावर जाब विचारला आहे. दरम्यान यावेळी आमदार अमित देशमुख यांनी हा गोंधळ पाहून गाडीतून खाली न उतरता सरळ कोणालाच काही न बोलता तिथून निघून जान पसंत केलं आहे.
16 Apr 2024, 09:23 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : आज मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या बैठका. मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची एक बैठक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता मुंबई भाजपच्या दादर पक्ष कार्यालयात होणार बैठकांना सुरुवात होईल. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारांसह मुंबईतील लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहणार असून, तिथं लोकसभेच्या अनुषंगाने संघटनेच्या कामांचा आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
16 Apr 2024, 09:04 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : बारामतीत अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत...बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जातेय...बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय.
16 Apr 2024, 08:59 वाजता
Loksabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीचे धाराशिव चे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.