Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची निकाल हाती येत आहे. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची  सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

29 Apr 2023, 13:23 वाजता

बीडमध्ये 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले. या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

29 Apr 2023, 13:17 वाजता

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटासह काँग्रेसला धक्का

संपूर्ण राज्याचे रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकालाकडे लक्ष लागले असताना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी एकत्रित युती करत सहकार पॅनल उतरवलं होतं. मात्र त्यांना जोरदार धक्का देणारा निकाल समोर आला आहे. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सचिन किरपान यांनी शेतकरी सहकार पॅनल मैदानात उतरवलं होतं. किरपान यांनी 14 जागेवर विजय मिळवला आहे. तर भाजपच्या शेतकरी विकास सहकार पॅनलने चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे केदार आणि आमदार जयस्वाल गटाला जोरदार धक्का मिळाला आहे. एकूण 18 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत दोघांच्याही पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.

29 Apr 2023, 12:47 वाजता

रोहित पवार यांनी मोठा धक्का

Karjat Ahmednagar APMC Election Results  :  कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकालात भाजपच्या राम शिंदे यांची सरशी झाली आहे. 18 पैकी 11 जागेसाठी निकाल हाती आले असून भाजप आमदार राम शिंदे गटाला 7 तर 
रोहित पवारांच्या गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. भाजप आमदार राम शिंदे यांचा पॅनल आघाडीवर

29 Apr 2023, 12:42 वाजता

सांगलीमध्ये महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता

Sangli APMC Election Results :  सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली असून भाजपचा धुव्वा उडाला आहे. 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजयी झालाय. तर 1 जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी. भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील ,माजी आमदार विलासराव जगताप यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माज, मंत्री विश्वजीत कदम काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने  दणदणीत विजय मिळवला आहे.

29 Apr 2023, 12:39 वाजता

 छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती

Chhatrapati Sambhajinagar APMC Election Results  :  छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 18 जागांसाठी काल झाले तर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली यात महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचा एक व हमाल मापाडी मतदारसंघातून एक व व्यापारी मतदारसंघातून दोन असे सात जागेचे निकाल जाहीर झालेत.  हमाल मापाडी तोलारी मतदारसंघातून देविदास कीर्तीशाहीहे विजयी ठरले तर व्यापारी मतदारसंघातून कन्हैयालाल जयस्वाल  व निलेश सिठी हे विजयी ठरले.

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची सत्ता

15 पैकी 10 जागा भाजप शिंदे गटाला तर जागा महाविकास आघाडीला 

विजयी उमेदवार -   वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाची सत्ता

1 अविनाश गलांडे (महाविकास आघाडी)
2 संजय निकम (महाविकास आघाडी)
3 ज्ञानेश्वर जगताप (महाविकास आघाडी)
4 अनिता वाणी (महाविकास आघाडी)
5 प्रशांत सदाफळ (महाविकास आघाडी)

1 रामहरी बापू (भाजप-शिवसेना)
2 काकासाहेब पाटील (भाजप-शिवसेना)
3 कल्याण दागोडे (भाजप-शिवसेना)
4 कल्याण जगताप (भाजप-शिवसेना)
5 शिवकन्या पवार (भाजप-शिवसेना)
6 नजन रजनीकांत (भाजप-शिवसेना)
7 इंगळे गणेश पोपटराव (भाजप-शिवसेना)
8 पवार प्रवीण लक्ष्मण(भाजप-शिवसेना)
9 आहेर गोरख प्रल्हाद (भाजप-शिवसेना)
10 त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (भाजप-शिवसेना)

29 Apr 2023, 12:38 वाजता

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Islampur APMC Election Results  :  इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एकहाती सत्ता. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी.विरोधी सर्वपक्षीय आघाडीला हमाल तोलाईदार गटातून मिळाली केवळ 1 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा बाजार समितीवर राखलं आपलं वर्चस्व.

29 Apr 2023, 12:35 वाजता

पुणे बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला

Baramati APMC Election Results  : बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दौंड मध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणबाजी दिसून येत आहे. राहुल कुल यांच्या समर्थकांनी केली घोषणाबाजी. आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष. इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे  पॅनल आघाडीवर

29 Apr 2023, 12:27 वाजता

नागपुरात महाविकास आघाडीला मोठा विजय

Nagpur APMC Election Results  : नागपूर बाजार समिती निवडणुकीत मोठी चुसर पाहायला मिळाली आहे. पारशिवनी बाजार समिती निवडणुकीत सुनील केदार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. संपूर्ण 18 उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी  झालेत. तर मांढळ बाजार समिती निवडणुकीत 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. रामटेक बाजार समिती निवडणुकीत आमदार सुनील केदार आणि आमदार आशिष जयस्वाल गटाचा धुव्वा उडाला आहे. काँग्रेसचा तिसरा गट असलेल्या शेतकरी सहकारी पॅनलचे 14 उमेदवार तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी  आणि काँग्रेस गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी सहकारी पॅनलचे 4 उमेदवार विजयी झालेत.

29 Apr 2023, 12:25 वाजता

 पाथर्डी बाजार समिती निवडणुकीत भाजपची सरशी

Ahmednagar APMC Election Results  : अहमदनगर पाथर्डी बाजार समिती निवडणुकीचा निकाल हाती, 18 पैकी नऊ जागांचा निकाल आहे. 18 पैकी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या गटाला 9 जागा तर पाथर्डी बाजार समितीत मोनिका राजळींच वर्चस्व दिसून येत आहे.

29 Apr 2023, 12:20 वाजता

विजयकुमार गावित यांना मोठा धक्का

Nandurbar APMC Election Results  :  नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का. डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांच्या बाजार समितीत पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विक्रम वळवी यांनी प्रकाश गावित 84 मतांनी पराभव केला. प्रकाश गावित यांनी रिकॉर्डिंग मागणी केल्यानंतर देखील विक्रम वळवी यांच्या विजय झाला.