Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील पाच पराभूत उमेदवारांनी दाखल केले निकालाच्या पुनर्पडताळणीसाठी अर्ज
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुख्यमंत्री फडणवीस, तर शिंदेच्या वाट्याला काय?
मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार एकनाथ शिंदेंची माहिती. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे.
Latest Updates
पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील पाच पराभूत उमेदवारांनी निकालाच्या पुनर्पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांनी पुनर्पडताळणी प्रक्रियेसाठी आवश्यक रकमेचा चलान देखील भरला आहे. हडपसर मधून पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूर मधून अशोक पवार आणि खडकवासल्यातून सचिन दोडके, चिंचवड मधून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या चारही उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. यासोबतच कॅन्टोन्मेंट मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी देखील निकालाच्या पुनर पडताळणीसाठी अर्ज करत चलान भरले आहे.
पिंपरी चिंचवड मधील भाजप पदाधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड करांच श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात अभिषेक करत देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री व्हावेत असं साकडं घातलं. महायुतीचा घवघवीत यशात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना मुख्यमंत्री करावं अशी भावना भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला
जितेंद्र आव्हाड वर्षावर दाखल
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला
जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल.
भेटीचे कारण अस्पष्ट
गोंदियामधील बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर पोहोचला
गोंदियात शिवशाही बसचा अपघात; 5 ते 6 प्रवाशांचा मृत्यू, जखमींची संख्याही मोठी
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी-गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात. पाच ते सहा लोकांचा मृत्यू तर 30 ते 35 लोक जखमी असल्याची माहिती.
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्त्वाची बैठक 2 दिवसांनी पुढे ढकलली
मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीत मंत्रिपद ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तर या सगळ्यात अशी माहिती समोर आली आहे की ही बैठक 2 दिवसांनंतर होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
नव्या सरकारमध्ये किती महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी?
-नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी?-सूत्र
-भाजपकडून 14 महिला आमदार विधानसभेवर
-NCPच्या 4 महिला आमदार , शिवसेनेच्या 2 महिला आमदार विधानसभेवर
-मंत्रिपदासाठी महिला आमदारांचे प्रोफाईल मागवले-सूत्र2 डिसेंबरला शपथविधी? भाजपकडून आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश
गटनेता निवडीसाठी सगळ्या आमदारांना मुंबईत येण्याचे भाजप आदेश देणार आहे. भाजप विधिमंडळ गटनेता 1 तारखेला निवडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादीकडून तब्बल इतक्या मंत्रिपदांची मागणी
नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून 10 मंत्रिपदांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. राष्ट्रवादीनं 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज मुंबईत खाते वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे.
महायुतीच्या बैठकीतील इनसाईट स्टोरी झी 24 तासच्या हाती...
1. मुख्यमंत्री भाजपचाच होणार, शिंदे आणि आणि अजित पवारांनी दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत प्रस्ताव दिल्याची माहिती.
2. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..
3. एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर देण्यात आल्याची सुत्रांची माहिती. एक म्हणजे डीसीएम आणि दुसरं केंद्रात मोठ कॅबिनेट देण्याची ऑफर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
4. एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रीपदाची मागणी -सूत्र
5. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेची मागणी -सूत्र
6. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंची अमित शहांना विनंती
EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. EPFO ग्राहकांना होणार आणखी लाभ. आता PF ची12 टक्क्यांची मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लवकरच एटीएममधून PF काढण्याची सेवाही मिळण्याची शक्यता.
अहिल्यानगरमधील 6 मतदारसंघातील ईव्हीएम पडताळणी
20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. तरी सुद्धा अजूनही काही ठिकाणी मतदारसंघात उमेदवारांकडून ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर आता अहिल्यानगरमधील 6 मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. तर पराभूत उमेदवारांकडून पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे झुकलंय - संजय राऊत
महाराष्ट्राच्या नेतृत्त्वावर बोलताना संजय राऊतांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की 'महाराष्ट्रात कोणी काय करायचं ते अमित शाह ठरवतात. महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे झुकलंय तर एकनाथ शिंदे, अजित पवारांना जे हवं ते कधीच मिळणार नाही.'
कधी होणार मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा शपथविधी
2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती.