मुख्यमंत्री फडणवीस, तर शिंदेच्या वाट्याला काय?
मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार एकनाथ शिंदेंची माहिती. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे.
29 Nov 2024, 10:32 वाजता
EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. EPFO ग्राहकांना होणार आणखी लाभ. आता PF ची12 टक्क्यांची मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लवकरच एटीएममधून PF काढण्याची सेवाही मिळण्याची शक्यता.
29 Nov 2024, 10:28 वाजता
अहिल्यानगरमधील 6 मतदारसंघातील ईव्हीएम पडताळणी
20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. तरी सुद्धा अजूनही काही ठिकाणी मतदारसंघात उमेदवारांकडून ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर आता अहिल्यानगरमधील 6 मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. तर पराभूत उमेदवारांकडून पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
29 Nov 2024, 10:25 वाजता
कधी होणार मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा शपथविधी
2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती.
29 Nov 2024, 10:25 वाजता
महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे झुकलंय - संजय राऊत
महाराष्ट्राच्या नेतृत्त्वावर बोलताना संजय राऊतांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की 'महाराष्ट्रात कोणी काय करायचं ते अमित शाह ठरवतात. महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीपुढे झुकलंय तर एकनाथ शिंदे, अजित पवारांना जे हवं ते कधीच मिळणार नाही.'