LIVE Updates: Worli Hit And Run Case : राजेश शाहची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

Breaking News LIVE Updates: Worli Hit And Run Case : राजेश शाहची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

LIVE Updates: Worli Hit And Run Case : राजेश शाहची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

बोगद्यामध्ये पाणी साचल्याने बंद असलेली कोकण रेल्वे पूर्ववत 

गेल्या काही काळापासून बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून कोकण रेल्वेचा मार्ग बंद होता. दरम्यान कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. पाहिली ट्रेन पेडणे बोगद्यातून 22: 34ला रवाना झाली आहे. विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्याची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

10 Jul 2024, 19:36 वाजता

विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारी कर्मचा-यांना आणखी एक मोठं गिफ्ट... महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ....1 जानेवारी 2024पासून पूर्वलक्षी प्रभावानं अमलबजावणी

10 Jul 2024, 18:41 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण

राजेश शाहची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी. राजेश शाह वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील. आरोपी मुलाला मदत केल्याचा आरोप...

10 Jul 2024, 17:37 वाजता

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांनी माघार घेतली आहे. आज नाना पटोले आणि भूषण पाटील यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दाखल केला होता. मात्र, नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भूषण पाटील, विहंग सरनाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यात लढत होणार आहे. 

10 Jul 2024, 15:11 वाजता

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या 2 गाड्या रात्रीच्या वेळी सुटणार 

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या दोन गाडी रात्रीच्या वेळी सुटणार आहेत. कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकाहून रात्री मुंबईच्या दिशेने रवाना  होणार आहेत.

10 Jul 2024, 14:37 वाजता

नाना पटोले 'क्रिकेटच्या मैदानात', MCA अध्यक्ष पदाचा भरणार अर्ज 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर अध्यक्ष पद हे रिक्त झाले आहे. रिक्त झालेल्या पदासाठी 23 जुलै रोजी निवडणूक होणार असून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत.  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपचा अर्ज भरण्यासाठी नाना पटोले MCA क्लब येथे दाखल झाले आहेत

10 Jul 2024, 14:13 वाजता

कोणाचा तरी फोन आला आणि विरोधकांनी...; अजित पवारांचा गंभीर आरोप

बैठकीवर बहिष्कार घालून विरोधकांनी राजकारण केलं, असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केला. कोणाचा तरी फोन आला म्हणून विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीचे नेते बैठकीला आले नाहीत असं शंभुराज देसाईंनी म्हटलं आहे. मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरुन विधानसभेत गदारोळ सुरु आहे.

10 Jul 2024, 11:47 वाजता

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी- खा. अमोल कोल्हे 

मुंबईमध्ये मराठा आरक्षण संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. याला खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिउत्तर देत सरकारने जनतेत संभ्रम निर्माण करु नये असे म्हटलंय. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. मागेच मराठा आरक्षणा बाबत मुख्यमंत्री यांचा व्हिडीओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे यामध्ये त्यांची काय भूमिका आहे? हे समजणे गरजचे असून सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

10 Jul 2024, 10:37 वाजता

सागवानाची अवैध कापणी, विक्री प्रकरणी 6 कर्मचारी निलंबित

चंद्रपूरात सागवानाची अवैध कापणी आणि विक्री केल्याप्रकरणी वनविकास महामंडळाच्या एका वनपरिक्षेत्राधिकार्‍यासह सहा कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. वन विकास महामंडळाच्या (FDCM) मामला परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील आत्राम, वनपाल विपुल आत्राम, वनपाल उमेश डाखोरे, वनपाल नेताजी बोराडे, वनरक्षक प्राची चुनारकर आणि वनमजूर किशोर गेडाम अशी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नाव आहेत. 

10 Jul 2024, 09:54 वाजता

फडणवीस यांनीच भुजबळांना बळ दिलंय- जरांगे 

आम्ही उभे राहू किंवा पाडू. फडणवीस यांनीच भुजबळांना बळ दिलंय. आम्ही शांततेत काम करतो. तो माणसांना आंदोलनं करायला लावतो, अशी टीका जरांगेंनी भुजबळ आणि फडणवीसांवर केलीय. सत्ताधारी विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता राहणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं तरी भुजबळांचं स्वप्न हे राज्य पेटवत ठेवण्याचं आहे. छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारने उभं केलंय, असेही ते म्हणाले.

10 Jul 2024, 09:19 वाजता

पुण्यात झिका रुग्णांचा आलेख वाढताच, शहरात आणखी तीन रुग्णांची भर

पुण्यात झिका रुग्णांचा आलेख वाढताच, शहरात आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रूग्ण संख्या 15 वर गेली आहे. नवीन तीन रुग्णांमध्ये पाषाणमधील 2 गर्भवती महिला आणि भुसारी कॉलनीतील एका 15 वर्षीय मुलाला बाधा झाली आहे. सगळ्या रुग्णांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षण आढळली आहेत.

आतापर्यंत झिकाचे कोणत्या परिसरात किती रुग्ण ?

एरंडवणे-5
मुंढवा -2
डहाणूकर कॉलोनी -2
पाषाण-3
आंबेगाव बुद्रुक -1
खराडी -1
कळस-1