)
TMC नेते अभिषेक बॅनर्जींना ईडीचं समन्स
15 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
आज ईडीचं पथक अभिषेक बॅनर्जींच्या घरी दाखल झालं होतं
- मोनोरेलला सीएमआरएसचे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त
- सीबीटीसी तंत्रज्ञानासाठी अंतिम मंजुरी मिळाली
- आता प्रस्ताव राज्य शासनाकडे
- शासनाच्या हिरव्या कंदिलानंतर सुरू होणार नवी सेवा
- अधिक सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम मोनोरेलकडे मुंबईची वाटचाल
- मोनोरेल आधुनिकीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. महाराष्ट्रात शिवसेनेत जशी उभी फूट पडली होती तशी उभी फूट ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पडलीये. ममतादीदी म्हणजे तृणमूल आणि तृणमूल म्हणजे ममतादीदी असं समीकरण होतं. विधानसभेला ममतादीदींचा पराभव झाल्यानंतर घर फिरलं तसं घराचे वासेही फिरले. एकेकाळी ममतादीदींचे विश्वासू असलेल्या ऋतब्रत बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पाडलीये. तृणमूलच्या 80 आमदारांपैकी तब्बल 58 आमदार ऋतब्रत बॅनर्जींनी फोडले. या आमदारांसह विधानसभा अध्यक्षाकडं वेगळ्या गटासाठी दावा दाखल करुन विरोधी पक्षनेतेपदही पदरात पाडून घेतलं.
यवतमाळमधील काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला... साबेहराव कांबळेंनी अर्ज मागे घेतल्याने मविआत खळबळ उडाली... मविआकडे पूर्वीचे संख्याबळ नसल्याने अर्ज मागे घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली...
सोलापुरातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय. विधान परिषद उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यामागे एक नाट्यमय घडामोड कारणीभूत ठरली. फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचे नाव आणि स्वाक्षरी होती. मात्र, छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत, 'या अर्जावरील सही माझी नाही' असा खळबळजनक आक्षेप घेतला. या गंभीर हरकतीनंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सूचक नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फत्तेपूरकर या दोघांचीही बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आपला निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता. मात्र, अखेर सूचक नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद केला. दरम्यान याबाबत आता काँग्रेस न्यायालयात दाद मागणार आहे.
सोलापूर विधानपरिषदेचे काँग्रेसचे अपात्र उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय. प्रशासनाकडून अद्याप नक्कल प्रत न झाल्याचा दावा फेत्तेपूरकरांनी केलाय. नक्कल प्रत प्राप्त न झाल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा विषय रेंगाळल्याचं फत्तेपूरकर म्हणालेत.
विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढलीय. कारण शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलाय. दुसरीकडं गोकुळ गीतेही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळं नाशिकची निवडणूक तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय.
मुंबई महानगरपालिकेत निधी वाटपावरून विरोधक पालिका प्रशासनावर आरोप करत आहेत. अशातच आता पालिका अधिकारी विरोधी नगरसेवकांचे काम ही करीत नसल्याच्या आरोप काँग्रेस नेते नसीम खान यांनी केला आहे. आज कुर्ला विभागातील विविध समस्यांबाबत त्यांनी परिमंडळ पाच च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पालिका एल विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार केली. पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. अधिकाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधीना समान वागणूक द्यायला हवी, अधिकाऱ्यांची व्हिजिलन्स च्या माध्यमातून चौकशी करायला हवी अशी प्रतिक्रिया या वेळी नसीम खान यांनी दिली
शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया गतीमान करावी. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
शाळा सुरु होण्याआधीच पालकांना मोठा धक्का बसला आहे. स्कूल बस दरामध्ये भाडेवाढं झाली आहे. 15 टक्के भाडेवाढं करण्यात आली. स्कूल बस मालक असोशीयेशनने भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी ची कारवाई केली आहे. आरोपी हे संघटित पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्री करून आर्थिक लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून सातत्याने अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात आढळून आले. यात चंद्रपूरच्या टोळी प्रमुख वसीम झिमरी, सिद्धांत गोंडाणे आणि मो. अखिल शकील शेख यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या एका टोळीचा प्रमुख बल्लारपूर येथील जयसुखलाल ठक्कर आणि त्याचा साथीदार अजयकुमार गुंडोजवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान या टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरात ही घटना घडली. मोहम्मद मुस्तफा खान हे दुकानातून घरी जात असताना सलमान शेख, इस्माईल शेख उर्फ ईच्चा आणि दिशान खान यांनी त्यांचा पाठलाग केला. शारदा चौक परिसरात आरोपींनी खान यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडलं. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात खान यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे
पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत जिथून विषारी दारुची विक्री झाली, तो कर्नल सिंग याचा दारू अड्डा महापालिका नेस्तनाबूत करणार आहे. महापालिकेच्या पडताळणीत हा दारू अड्डा अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळं हा दारू अड्डा हटवण्याचा आदेश देण्यात आलाय. स्वतःहून न हटवल्यास पालिका हा अड्डा हटवण्याची कारवाई करणार आहे.
अमरावती विधान परिषद निवडणूक वादात मोठा ट्विस्ट आला आहे. बाजोरिया पिता पुत्राला विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने बाजोरिया पिता-पुत्र नागपूरहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बाजोरिया पिता-पुत्र आता दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्रचा संघर्ष पेटणार आहे. बोगस दाखले घेतलेल्यांना जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही असल्याचा OBC नेत्यांचा आरोप आहे. जरांगेच्या भूमिकेचा विरोधात 12 तारखेला OBC नेते रस्त्यावर उतरणार आहेत. बावनकुळे नाव आणि काम 96 कुळ्यांचं चालणार नाही. OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी हा आरोप केला.
जात पडताळणीसाठी पश्चिम बंगाल पॅटर्न महाराष्ट्रात रबावण्याची मागणी OBC नेत्यांनी केली आहे. ओबीसी उपसमितीने राजीनामा दिला पाहिजे असेही ते म्हणाले.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 June 2026 : विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढवली. काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेतली असली तरी काही ठिकाणी बंडखोरांचं टेन्शन कायम आहे. अशातच पुण्यात आरोप प्रत्यारोप होत असताना नाशिकमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेश गीते, गोकुळ गीते निवडणूक लढणार आहेत. तर, दुसरीकडे विप्लव बाजोरियांना कोर्टाचा दिलासा नाही. अर्ज फेटाळल्यानं बाजोरिया कोर्टात गेले होते.