Maharashtra Breaking News LIVE : आजचा दिवसही पाऊस गाजवणार? जाणून घ्या राजकारणापासून पावसापर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर... Live Blog मध्ये
26 Sep 2024, 12:53 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : पावसामुळे एपीएमसी मार्केट मद्ये भाजीपाला पडून, भाजीपाला सडला
मुंबई आणि उपनगरात झालेल्या पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये भाजीपाला पडून आहे, ग्राहक नसल्याने हा भाजीपाला पडून असून पावसामुळे हा भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे , यामुळे भाजीपाला दर हे 50 टक्के नी खाली उतरले असून, जी भाजी 50 ते 60 रुपये किलो एपीएमसी मार्केट मद्ये विकली जात होती ती भाजी आज 20 ते30 रुपये किलो विकली जात आहे , यात चवळी, कारले, गवार, वांगी, कोबी, दुधी, भाज्या पडून आहेत , आज मार्केट मद्ये 450 गाड्याची आवाक झाली असून, अतिवृष्टी चा इशारा दिल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
26 Sep 2024, 12:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात नाराजी
पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसैनिकांकडून स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रोश सभा.
पालघर जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक पदाधिकारी, सहसंपर्कप्रमुख आणि उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या विरोधात नाराजी. ठाकरे गटातील स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्रोश सभा. स्थानिक शिवसैनिकांमध्ये ज्योती ठाकरे भांडण लावत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप.
26 Sep 2024, 11:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : 4 ऑक्टोबरपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम
4 ऑक्टोबरपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम असून पूजा खेडकरला तोपर्यंत अटक करता येणार नाही. पूजा खेडकरच्या वकिलांनी कोर्टात 15 दिवसांची वेळ मागितली होती. मात्र UPSC chya वकिलांनी विरोध केल्याने कोर्टाने तो वेळ कमी करत आठवड्याचा वेळ दिला. आता इथून पुढं सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
26 Sep 2024, 11:32 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : काँग्रेसच्या आमदाराला, अजितदादांचं बळ!
आमदार झिशान सिद्धिकी यांच्या मतदारसंघाला शासनाकडून निधीची खैरात. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघाला अजित पवारांकडून निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. निधीच्या माध्यमातून झिशान सिद्दिकी यांना ताकत मिळाली असून, यातून वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात शासनाकडून निवडणुकीपुर्वी 100 कोटींच्या निधींची कामं मार्गी लागणार आहेत. नुकतीच त्यांनी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा त्यांच्या भागात फिरवली त्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत हया स्पष्ट चर्चा आहे.
26 Sep 2024, 10:53 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या! वडिलांचा बदलापूर पूर्व पोलिसांना अर्ज
अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने अक्षय शिंदे च्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या यासाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी स्थानिक उपायुक्तांच्या मार्फत स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं होतं ,मात्र अजूनही जमीन न मिळाल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा अक्षयच्या वडिलांचा आरोप केला आहे.
26 Sep 2024, 10:27 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळं मोदींचा दौरा रद्द
पुण्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आला आहे. प्राथमिक स्वरुपात मिळालेल्या माहितीनुसार या दौऱ्यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवण्यात येत होती. पण, आता मात्र हा दौराच रद्द करण्यात आला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार नियोजित कार्यक्रम.
26 Sep 2024, 10:12 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मायणी भागात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस...जनजीवन विस्कळीत
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.खटाव या दुष्काळी भागातील मायणी गावाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी वस्तीत आणि दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे.शेती पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.तर अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
26 Sep 2024, 10:01 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : अमित देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी
काँग्रेसने लातूरच्या सहा विधानसभांवर आपला दावा केल्याचे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या एका बैठकीत हे स्पष्ट केले आहे. काही दिवसापूर्वी अमित देशमुख यांनी निलंगा आणि औसा या जागेवर दावा केला होता आता त्यांनी अहमदपूर आणि उदगीर या दोन जागेवर हि त्यांनी दावा केला आहे. अहमदपूर आणि उदगीर या जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहेत. उदगीर मध्ये 90% ग्रामपंचायत आणि सोसायटी ह्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मिरीट वर या सर्व जागांवर आमचा अधिकार आहे. या जागेवर सुद्धा काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे या जागा सुद्धा काँग्रेसला दिला पाहिजे अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
26 Sep 2024, 09:57 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात
पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी एशियन पेट्रोलपंपा जवळ टँकरचा अपघात झालाय. मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर टँकर पलटी होऊन हा अपघात झाला आहे. कच्च्या तेलाची वाहतूक करणारा टँकर चा अपघात झाल्याने रस्त्यावर तेलाची मोठ्या प्रमाणत गळती झाली आहे. त्यामुळे गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
26 Sep 2024, 09:23 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग
धुळे एलसीबी ने midc मोहाडी येथिल लाल मसाल्या मधे हानिकारक रंग आणि केमिकल्स च्या भेसळी चे मोठे रैकेट पकडले आहे. या प्रकरणी पोलीस सविस्तर चौकशी करीत आहेत. इम्रान अहमद आणि मोहोम्मद असीम हे दोघे हानिकारक रंग आणि केमिकल्स मस्जिद बंदर येथून आणायचे आणि मुख्तार अन्सारी याच्या midc मधल्या कंपनी मधे भाड्याच्या गाळ्यात हे काम करायचे अशी चौकशी मध्ये माहिती समोर आली आहे. या कारवाई पोलिसांनी हानिकारक मुद्देमाल जप्त केला आहे. हे रॅकेट, १२० किलो लाल मसाला त्यात ८ किलो भेसळयुक्त तेल आणि ४० किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग आणि बाकीचे केमिकल्स टाकतात आणि ११० रुपये प्रती किलो माल विकतात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचे या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही यात चौकशीसाठी समावेश करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या मालाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून, त्यानंतर आलेल्या अहवालनंतर त्या प्रमाणे पुढील कायदेशीर कारवाही होईल