Live Now

Maharashtra Breaking News LIVE: आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहाचा परवाना निलंबित

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 9:   मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं  राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE: आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहाचा परवाना निलंबित
09 July 2025 10:05 PM (IST)

आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहाचा परवाना निलंबित 

आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहाचे परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून निलंबित करण्यात आला आहे.  संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उपाहारगृहावर कारवाई केली आहे. 

09 July 2025 09:26 PM (IST)

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (दिनांक ९ जुलै २०२५) सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून १०२२ क्युसेक प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सुमारे ९० टक्‍के भरले आहे. या धरणाचे ३ दरवाजे उघडण्‍यात आले आहेत.  

 

09 July 2025 08:51 PM (IST)

आझाद मैदानावरवरचं शिक्षकांच्या आंदोलनाला तूर्तास स्थगित

आझाद मैदानावर उपस्थित २०,००० शिक्षकांच्या उपस्थितीने व सरकारमधील संकटमोचक या नावाने प्रसिद्ध असणारे मा.ना. गिरीशजी महाजन यांच्या मध्यस्थीने अनुदानाचा मार्ग मोकळा. धैर्यशील, प्रयत्नवादी, आशावादी व हाती घेतलेले काम अर्ध्यावर न‌ सोडणारे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे लढवय्ये नेते राज्य उपाध्यक्ष मा.खंडेराव जगदाळे सर‌ यांच्या निश्चयाला अखेर यश.

पुणे विभागातील सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनींना कळविण्यात येते की,आज अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना, देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांनी १४ आॅक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयास अखेर हिरवा कंदील दाखवला. मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व  शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत आज झालेल्या बैठकीत १४ आॅक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये  १ जुलै २०२५ पासून राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना टप्पा वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलं आहे. 

09 July 2025 08:19 PM (IST)

मुंबईला नावं ठेवणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर

मुंबईला नावं ठेवणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर... दुबेंचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट... तर मुंबईतील बड्या कंपनीत 16 वर्षं संचालक म्हणून केलेलं काम... 

09 July 2025 07:38 PM (IST)

मराठवाडा विद्यापीठ उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न

 

मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.. डॉ. हेमलता ठाकरे या बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्यानं खळबळ उडालीये. त्यांच्यावर संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांच्या खोलीत सुसाईड नोट आढळलीये.. या सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव असल्याची माहिती आहे.. त्यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील अधिका-यांवर गंभीर आरोप केले होते...

09 July 2025 07:13 PM (IST)

मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी दाखल 

आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन, गिरीश महाजन आंदोलन स्थळी दाखल झाले असून तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 

09 July 2025 06:38 PM (IST)

पुणे बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करा

पुणे बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंनी केलीय..सर्व संचालकांची ईडी आणि इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वंतत्रपणे चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलीये.. अन्यथा न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती विकास लवांडे यांनी दिलीये..

09 July 2025 06:29 PM (IST)

iPhone, पैसे आणि फसवणूक? यश दयालने शेवटी मौन सोडलं, यौन शोषणाच्या आरोपावर दिलं स्पष्ट उत्तर

 

09 July 2025 05:46 PM (IST)

महायुती सरकार हे चोरांचं सरकार- आदित्य ठाकरे

महायुती सरकार हे चोरांचं सरकार आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

09 July 2025 05:25 PM (IST)

महाराष्ट्रातील काळीमा फासणारी, शहापूरच्या खासगी शाळेत घृणास्पद प्रकार

शहापूर तालुक्यातील खासगी शाळेत घृणास्पद प्रकार घडला. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळले. यामुळे शाळा प्रशासनाने शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना बाथरूममध्ये नेत तपासलं. बाथरूम कोणी खराब केलं याची खातरजमा करण्यासाठी शाळेने हा घृणास्पद प्रकार केला. या प्रकारामुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली आणि शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेकडो पालकांनी थेट शाळेवर मोर्चा काढला. शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यात नेत असताना पालकांनी पोलिसांची गाडी रस्त्यावर अडवत रस्त्यावर ठिय्या मांडला.. गुन्हा दाखल होत नाहीपोर्यंत घरी जाणार नसल्याचा  निर्धार पालकांनी केलाय.. तसेच प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी आक्रमक पालकांनी केलीय. 

09 July 2025 05:17 PM (IST)

गडचिरोलीत मुसळधार पावसाचं थैमान, राष्ट्रीय महामार्गासह 15 मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा वेढा पडलाय. गडचिरोली येथील गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी या दोन राष्ट्रीय महामार्गासह 15 जिल्हा मार्ग बंद असून ही पूर परिस्थिती गोसेखुर्दचे पाणी कमी न केल्यास सायंकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्याने वाहनांच्या लांबाच लांब रांगा लागल्या आहेत

09 July 2025 04:48 PM (IST)

गुजरातमध्ये महिसागर नदीवरील गंभीरा पूल तुटला, पुलावरुन जाणारी 4 वाहनं नदीत कोसळली

मुसळधार पावसात गुजरातमध्ये एक जीर्ण झालेला पूल कोसळलाय.. आणंद-व़ोदरा यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक मधूनच तुटला. त्यामुळे 4 वाहनं नदीत पडली. या दुर्घटने 10जणांचा मृत्यू झालाय. तर तिघांना वाचवण्यात यश आलंय.. या अपघातात एक टँकर थोडक्यात बचावलाय.. हा पूल 45 वर्षे जुना आहे... जीर्ण झाल्यामुळे या पुलाची डागडुजी सुरु होती.. गंभीरा पूल तुटला तेव्हा या पुलावरुन एक दोन ट्रक, एक टँकर, बोलेरो जीप जात होते.. ही सर्व वाहनं नदीत पडलीत

09 July 2025 04:39 PM (IST)

नागपुरात मुसळधार पावसाचा कहर, कळमेश्वर परिसरात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती

  •  नागपूर ग्रामीण - विहिरगाव आणि हुडकेश्वर येथून मिहान अग्निशमन दलाने ९ जणांना वाचवले
  • कामठी: पांढुर्णा गाव स्थानिक बचाव पथकाने ८ जणांना वाचवले
  •  मुसळधार पावसामुळे कमलेश्वर परिसरात 1 जणाचा मृत्यू 
  • पाणी ओसंडून वाहत असल्याने   रस्ता/पुल बंद
  • कामठी: स्थानिक पथक पांढुर्णा येथे, तर एसडीआरएफ पथक सुमारे २० अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पावणगावला जात आहे.
  •  नागपूर ग्रामीण: विहिरगाव येथे मिहान अग्निशमन पथक
  • कुही: एनडीआरएफ पथक टेकेपार गावाला जात आहे.
09 July 2025 04:24 PM (IST)

मृत घोषित केलेलं बाळ झालं जिवंत

मृत घोषित केलेलं बाळ झालं जिवंत...बीडच्या रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळ मृत घोषित...अंत्यसंस्काराच्या वेळी बाळ रडू लागलं

 

09 July 2025 04:23 PM (IST)

तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बावनकुळेंच्या घोषणेचं महाविकास आघाडीकडून स्वागत केलं आहे. या संदर्भात 15 दिवसात एसओपी केली जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्याने व्यवहार करता येत नाही. तुकडे बंदी कायदा रद्द केला जाईल. एक एसओपी केली जाईल. महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल. ही समिती एसओपी करेल. सुमारे 50 लाख लोकांना  फायदा होईल. या संदर्भातील 15 दिवसात सूचना असतील, तर कराव्यात असेही बावनकुळे यांनी आवाहन केलं आहे.

09 July 2025 03:46 PM (IST)

आमदार संजय गायकवाडांकडून आमदार निवासातील कॅन्टीनचालकाला मारहाण

आमदार संजय गायकवाडांकडून आमदार निवासातील कॅन्टीनचालकाला मारहाण... जेवणात खराब झालेली डाळ दिल्याने  गायकवाडांकडून मारहाण .. 

09 July 2025 03:43 PM (IST)

शहापूरच्या खासगी शाळेतील बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यानं मुलींची तपासणी... आक्रमक पालकांचा शाळेवर धडक मोर्चा.

 

09 July 2025 03:18 PM (IST)

आझाद मैदानातील शिक्षक आंदोलन 

 

आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांच शिष्ठमंडळ विधानभवनात दाखल 

मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात आंदोलनकर्ते दाखल 

थोड्या वेळात शिक्षकांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

09 July 2025 03:04 PM (IST)

कल्याण पुन्हा हादरलं, अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये अत्याचार 

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर धावत्या एक्स्प्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. इगतपुरी ते अकोला दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे या नरधमाने तिला अकोला येथील आपल्या घरी नेले मात्र घरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून तो पसार झाला. यानंतर अकोला रेल्वे पोलिसांच्या नजरेस मुलगी सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. 

09 July 2025 02:46 PM (IST)

पुलाची पाहणी करताना ट्रक पलटला, अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ बालंबाल बचावले, दुर्घटनेचा थरारक लाईव्ह व्हिडिओ zee 24 तासच्या कॅमेरात कैद...!  

वडवणी तालुक्यातील खडकी देवळा गावाजवळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे शाळकरी मुलांनी पर्यायी रस्ता मागितला. आणि त्याच रस्त्याची पाहणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ या पुलाच्या शेजारी उभे होते. तेवढ्यातच एक मालवाहू ट्रक त्या ठिकाणाहून जात होता. डोळ्याची पापणी लवते ना लवतेच ट्रक जाग्यावरच पलटला. निव्वळ काही फुटाच्या अंतरावर अधिकाऱ्याने ग्रामस्थ त्या ठिकाणी उभे होते. ट्रक पलटल्यानंतर एकच हाहाकार उडाला.. ग्रामस्थांनी जीव मोठी धरून पळापळ केली. ही सर्व दुर्घटना झी 24 तास च्या कॅमेरात कैद झाली आहे. वेळ आली होती मात्र काळ नव्हता असाच प्रत्यय वाचलेल्या ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांना आला.

09 July 2025 02:01 PM (IST)
09 July 2025 01:40 PM (IST)

राजस्थानमधील चुरू येथे भारतीय वायुसेनेचे फायटर विमान क्रॅश

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राजस्थानमधील चुरू येथे  भारतीय वायुसेनेचे  फायटर विमान क्रॅश झाले असून या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे. 

09 July 2025 01:21 PM (IST)

'मारहाण करणं चुकीचं, त्याने चुकीचा संदेश जातो'- मुख्यमंत्री 

संजय गायकवाड मारहाणप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी मारहाण करणं चुकीचं आहे. यामुळे चुकीचा संदेश जातो असं म्हटलं आहे. 

09 July 2025 01:01 PM (IST)

मीरा-भाईंदर झाँकी, महाराष्ट्र बाकी है, बाळा नांदगावकर यांचा इशारा

आझाद मैदानावर गिरणी कामगारांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलन स्थळी मनसे नेते बाळा नांदगावकर पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना मीरा-भाईंदर झाँकी, महाराष्ट्र बाकी है म्हणत इशारा दिला आहे. 

09 July 2025 12:38 PM (IST)

मतदारांना शिवीगाळ ते छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; संजय गायकवाडांचे 8 वाद!

09 July 2025 12:36 PM (IST)

हिंदीला 'सहयोगी भाषा' म्हणून प्रस्थापित करण्याचा घाट; राजभवनातल्या 'त्या' भेटीचे फोटो समोर!

09 July 2025 12:32 PM (IST)

विद्यादीप बालगृह प्रकरणी महिला बालविकास अधिकारी निलंबित

ज्या काही अनियमितता बाहेर आल्या त्या भयानक आहेत. जिल्हा बालविकास अधिकारी तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. पोलिसांनी 80 मुलींची चर्चा केली. त्या बोलत नव्हता. आता त्या बोलताय अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यात. बालगृह  अधिक्षक आणि सगळ्यांवर पोलिसात  गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची मान्यता पूर्ण रद्द करण्यात आली असून 3 वरिष्ठ  पोलीस निरीक्षक याबाबत चौकशी करत आहेत. उद्या  याबाबत अहवाल देणार  आहेत. जे कुणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल.

09 July 2025 12:27 PM (IST)

नागपुरात पावसाचा कहर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती

नागपुरात मुसळधार पावसाचा कहर. कळमेश्वर परिसरात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कामठीच्या पांढुर्णामध्ये 8 जणांना वाचवण्यात यश.

09 July 2025 12:14 PM (IST)
09 July 2025 12:10 PM (IST)

गरीब कॅन्टीनवाल्याला मारलं, त्याचा काय दोष?- संजय राऊत

'जर डाळ खराब असेल तर तुमचं सरकार जबाबदार' आहे. त्यामध्ये गरीब कॅन्टीनवाल्याचा काय दोष? संजय राऊत यांचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल. 

09 July 2025 11:20 AM (IST)

नागपुरातील नरसाळा परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण

नागपूर शहरातील नरसाळा परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोहरा नदीच्या पाणी पात्र सोडून बाहेर आल्याने आजूबाजूच्या परिसरातील अनेक घरं पुराच्या पाण्यात वेढली गेली आहे. तिकडे बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन विभागाकडून करण्यात येतेय.

09 July 2025 11:00 AM (IST)

नागपुरातील सद्याची परिस्थिती नियंत्रणात, नागरिकांनी काळजी घ्यावी-मुख्यमंत्री

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

09 July 2025 10:35 AM (IST)

शरद पवार आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी दाखल 

शिक्षक आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक. आझाद मैदानावर शरद पवार दाखल. शिक्षक आंदोलक आणि फडणवीसांच्या बैठकीत तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. 

09 July 2025 10:30 AM (IST)

शिक्षकांच्या आंदोलनस्थळी शरद पवार दाखल 

आझाद मैदानावर शिक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून आंदोलनस्थळी राष्ट्रवादी SP चे अध्यक्ष शरद पवार दाखल झाले आहेत. 

09 July 2025 10:09 AM (IST)

पोर्शे कार अपघात प्रकरण, ससून रुग्णालय प्रमाणे औंध रुग्णालयात सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न

पोर्शे कार अपघात प्रकरणी वकिलांनी मोठा खुलासा केला आहे.  ससून रुग्णालय प्रमाणे औंध रुग्णालयात सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब असलेली कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. ससून रुग्णालयाच्या अगोदर औंध रुग्णालयात रक्ताचे नमुने बदल करून घेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आल्याचं समोर आला आहे. हाय प्रोफाईल या प्रकरणात अटक असलेले विशाल अग्रवाल यांनी जामीनासाठी अर्ज केला असून आई आजारी असल्याने जामीन मिळावा अशी मागणी सुद्धा केली आहे. या अपघात प्रकरणात दहा आरोपी विरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे

09 July 2025 09:58 AM (IST)

गुजरातच्या बोरसदमध्ये पूल तुटला

गुजरातच्या बोरसदमध्ये पूल तुटल्याची घटना समोर आली आहे. महिसागर नदीवर ही घटना घडली आहे. या घटनेत एक ट्रक आणि टँकर नदीत कोसळला आहे. 

09 July 2025 09:41 AM (IST)

मधमाशांमुळे इंडिगो विमान उड्डाण रखडलं

धाराशिव-जयपूर प्रवाशांची धांदल उडाली. मधमाशांमुळे जयपूरला जाणारे विमान तासभर खोळंबलंय. दरम्यान मधमाशांना हाकलण्यासाठी धुराचा वापर केला जातोय.

09 July 2025 09:29 AM (IST)
09 July 2025 09:26 AM (IST)

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.  मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यताय..विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

09 July 2025 09:05 AM (IST)

संजय गायकवाडांकडून आमदार निवासातील कॅन्टीनचालकाला मारहाण

आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आमदार निवासातील कॅन्टीनचालकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. निकृष्ट जेवण दिल्यानं संजय गायकवाड संतप्त झाले. मळमळू लागल्याने संजय गायकवाड यांनी कॅन्टीनचालकाला केली मारहाण. 

09 July 2025 09:01 AM (IST)
09 July 2025 08:19 AM (IST)

पहिल्या फेरीत अकरावीच्या सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी 7 जुलै रोजी संपुष्टात आली. या फेरीमध्ये 5 लाख 8 हजार 96 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी, राज्यभरातील महाविद्यालयांनी विविध निरनिराळ्या कारणास्तव 6 हजार 402 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. यापैकी दोन हजार 193 विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला.

09 July 2025 07:45 AM (IST)

आझाद मैदानावर गिरणी कामगारांचा मोर्चा

आज गिरणी कामगारांच्या आझाद मैदान इथल्या मोर्चासाठी उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,अंबादास दानवे, अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर सकाळी 11.30 नंतर उपस्थित राहतील.

09 July 2025 07:07 AM (IST)

मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत ही माहिती समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली आहे.

09 July 2025 07:00 AM (IST)

आज भारत बंदची घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

09 July 2025 06:45 AM (IST)

नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संतधार वा मोठ्या सरी नागपूर जिल्ह्यात सुरु आहेत.  त्यामुळे शहरातील नदी- नाले दुथडी भरून वाहत आहे. अशात पावसाची मोठी सर आल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सावधतेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

09 July 2025 06:18 AM (IST)

बदलापूर नगरपालिकेच्या सर्व शाळांना ISO मानांकन

बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 20 शाळांना ISO मानांकन मिळालय. या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण दिलं जातय. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी सर्व शाळांमध्ये प्रवेश फुल झाले आहेत. गांधी चौकातील शाळा क्रमांक 1 ची केंद्राच्या पीएमश्री मध्ये म्हणजेच प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइजिंग इंडियासाठी निवड झालीये. या शाळेला जिल्हास्तरावरील 11 लाखांचा पहिला पुरस्कारही प्राप्त झालाय.

About the Author

Tejashree Gaikwad

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.