Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यानिमित्ताने राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याशिवाय सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय संतोष देशमुख प्रकरणाचे अपडेट्स येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबरोबरच देश आणि विदेशात घडणाऱ्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या अगदी मोजक्या शब्दांमध्ये....
13 Mar 2025, 20:17 वाजता
पसरणी घाटात भीषण अपघात; 1 व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी
सातारा - वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात भीषण अपघात झाला आहे. बुवासाहेब मंदिराजवळ गाडी 200 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. गाडीतील प्रवासी कोकणातून पुण्याला परतत असताना हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि रेस्क्यू टीम तत्काळ दाखल झाली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
13 Mar 2025, 19:38 वाजता
केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडियो व्हायरल
केडीएमसी 4 जे प्रभाग कार्यलयाच्या आवारात केडीएमसी कर्मचारी फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. भगवान पाटील असं कर्मचाऱ्याचे नाव आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका फेरीवाला मुक्त धोरण राबवत असताना एकीकडे पालिका कर्मचारी फेरीवाला दुकानदारांकडून रस्त्यावर दुकाने , हातगाड्या लावण्यासाठी कर्मचारीच पैसे घेण्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दोषी कर्मचाऱ्याची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सागितले आहे.
13 Mar 2025, 17:14 वाजता
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात होळी साजरी
राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्याहून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. नराधम दत्ता गाडे आणि वाल्मिक कराडच्या फोटोंचे होळीत दहन. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरचे फोटोही होळीत पेटवले.
13 Mar 2025, 15:59 वाजता
सतीश भोसले उर्फ खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा
सतीश भोसले याचा ट्रांजिट रिमांड बीड पोलिसांना मिळाला. त्यामुळे खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्याला बीडमध्ये आणले जाणार आहे.
13 Mar 2025, 15:01 वाजता
नाशिकच्या गोदावरीचं पाणी म्हणजे मिनरल वॉटर
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रम महामंडळानं नाशिकमधील गोदावरीच्यापाण्याला गुड टू एक्सलंट म्हणजे मिनरल वॉटरचा शेरा दिलाय.. प्रदूषण नियंत्रम मंडळानं जाहिर केलेल्या आकडेवारीत गोदावरीचं पाणी पिण्यास योग्य असल्याचं स्पष्ट झालंय... एकीकडे गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या या आकडेवारीमुळे गोदाप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीये.. इतकच नाही तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी देशातील नदी प्रदूणाचा मुद्दा उपस्थित केला होता.. त्यानंतरही प्रदूण नियंत्रण मंडळानं दिलेल्या या आकडेवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. पाहुयात राज ठाकरेंनी काय म्हटलंय...
13 Mar 2025, 14:37 वाजता
कोकणात जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी
शिमग्यासाठी कोकणात जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून पालीकडे जोडणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
13 Mar 2025, 14:01 वाजता
विखे पाटलांच्या बैठकीनंतर घोषणाबाजी व गोंधळ
पालकमंत्री विखे पाटलांच्या संगमनेर शहरातील आढावा बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ.
13 Mar 2025, 13:46 वाजता
उल्हासनगरमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला मारहाण
उल्हासनगरमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आलीये. जुन्या वादातून टोळक्यानं या विद्यार्थ्यावर हल्ला केला.. डोक्यात फरशी मारल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. तर मारहाण करणा-या टोळक्यातील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
13 Mar 2025, 13:21 वाजता
आनंदाची शिधा बंद होणार नाही मात्र ,काही योजनांना कात्री लावली-शिरसाट
बातमी आहे संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची. लाडकी बहिण योजना बंदी होणार नाही नसल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.. लाडक्या बहिण योजनेमुळेचं महायुती सरकार सत्तेत आल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.. तसेच आनंदाचा शिधा योजना बंद होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.. काही योजनांना कात्री लागली असल्याचं त्यांनी मान्य केलंय.. परिस्थिती सुधारल्यानंतर योजनांना निधी मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
13 Mar 2025, 12:56 वाजता
रायगडच्या खोपोली-वाकण महामार्गावर वाहतूक कोंडी
रायगडमध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीये.. खोपोली - वाकण महामार्गावर शिळफाट्याजवळ ही वाहतूक कोंडी निर्माण झालीये.. कोकणात जाणा-या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. शिमग्यासाठी हजारो चाकरमानी गावाकडे निघालेत.. त्यामुळे या मार्गावर ताण पडलाय.. या वाहतूक कोंडीमुळे हजारो चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकलेत