Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aashish Udas | Feb 04, 2026, 23:11 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

4 Feb 2026, 22:57 वाजता

दोन मद्यपिंची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये खळबळ

 

Beed Audio Clip : बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा खळबळ उडालीये... दोन मद्यपींमधला हा संवाद आहे... एका मद्यपीकडून थेट मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याच्या धमकी देण्यात आली....ऑडिओ क्लिपमधील दोन्ही व्यक्ती हे कोण आहेत हे अद्याप स्पष्ट नाही... ऑडिओ हा बीडचा आहे की आणखीन कोणत्या जिल्ह्यातला हे अस्पष्ट आहे... या व्हायरल ऑडिओची झी २४ तास पुष्टी करत नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 Feb 2026, 21:34 वाजता

मुंबई महापौरपदासाठी अर्ज भरण्याची तारीख ठरली- सूत्र

 

Mumbai Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरलीये.. 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाणार तर, 11 तारखेला निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार याबाबत तिढा असल्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अकाली निधन झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली होती.. यानंतर महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भऱण्य़ाची तारीख ठरल्याची सूत्रांची माहिती.   

4 Feb 2026, 19:15 वाजता

ठाणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

 

Thane NCP : ठाणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
                         '..तर नजीब मुल्ला महापालिकेत विरोधी पक्षनेते'
                         एनसीपी SPच्या जिल्हाध्यक्षांचं सूचक विधान
                         जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानांचं विधान

 

4 Feb 2026, 18:14 वाजता

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी

 

Mumbai-Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ कोलमडून पडली आहे. इथे वाहनांच्या 50 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काल सायंकाळी पाच वाजता गॅस टँकर पलटी होऊन गळती सुरू झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत तब्बल 50 किलोमीटर पर्यँत वाहतूक कोंडी झाली आहे. कालपासून वाहन चालक आणि प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.

 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 Feb 2026, 17:41 वाजता

चंद्रपुरात वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या गटाला अडीच-अडीच वर्षं महापौर पद मिळणार

 

Chandrapur Congress : चंद्रपूरमधील काँग्रेसच्या वादावर मोठा निर्णय.. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला अडीच-अडीच वर्षं महापौर पद मिळणार.. पहिली अडीच वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद मिळणार.. तर शेवटची अडीच वर्षं विजय वडेट्टीवार यांच्या  गटाला महापौर पद दिलं जाणार.. पाच वर्ष काँग्रेसकडे महापौर पद राहील तर शिवसेना ठाकरे गटाकडे स्टॅंडिंग कमिटी राहणार.. दोन गटांमध्ये महापौर कोणाचा यावरून निर्माण झालेला वाद थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे गेला होता.

4 Feb 2026, 17:22 वाजता

बारामतीत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार

 

Ajit Pawar Smarak : बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातच अजित पवारांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये दीड तास बैठक झाली..या बैठकीत स्मारकाचा निर्णय घेण्यात आला.. तसंच स्मारकाबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला..  त्यानंतर जय पवारांनी अजित पवारांचा अंत्यविधी झालेल्या जागेची पाहणी केली.

4 Feb 2026, 16:30 वाजता

चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधींचे प्रयत्न- मुख्यमंत्र्यांची टीका

 

CM Fadanvis on Rahul Gandhi : राहुल गांधींना सभागृहात बोलायचंच नाहीये.. त्यांना केवळ खोटे आरोप करायचे आहेत.. देशाला, आपल्या सैन्याला बदनाम करायचं आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.. चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधींचे प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी फडणवीस म्हणालेत.

4 Feb 2026, 15:50 वाजता

बदलापुरातील स्वीकृत नगरसेवकपदाचा तिढा सुटला

 

Badlapur Corporator Position Dispute : बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकपदाचा तिढा अखेर सुटलाय. भाजपचे प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय. भाजपचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यांच्या जागी प्रवीण राऊत यांची वर्णी लागलीय. प्रवीण राऊत हे यापूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडून अलीकडेच भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालीय. स्वीकृत नगरसेवक पदाची घोषणा होताच राऊत समर्थकांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत एकच जल्लोष केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 Feb 2026, 14:50 वाजता

पुण्यात कोयता गँगची दहशत

Pune Crime

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरुच
पुण्यात एकावर कोयत्यानं वार
हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही चित्रित
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरातील घटना

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Feb 2026, 13:35 वाजता

नाशिकमध्ये सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

Nashik : नाशिक भाजप शहराध्यक्ष पदाचा सुनील केदारांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती आहे. प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्यानं सुनील केदारांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी  प्रस्ताव देखील दिला होता. याच प्रस्तावानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते

बातमीचा व्हिडीओ पाहा -