7 Jan 2026, 20:32 वाजता
बावनकुळेंच्या प्रचार सभेत भाजप बंडखोरांचा गोंधळ
Chandrapur : चंद्रपूरच्या इंदिरानगर भागात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा भाजप बंडखोरांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न, इंदिरानगर भागात सभा सुरू असताना बंडखोर भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्यांच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा केला प्रयत्न, मात्र पोलिसांनी पोतराजे यांना अडवून प्रचार सभेतून लावलं हुसकावून, मनोज पोतराजे यांच्या पत्नीला म्हणजे पूजा पोतराजे यांना एमईएल प्रभागातून जाहीर झाली होती भाजपची उमेदवारी, मात्र ऐनवेळी पूजा पोतराजे यांच्या ऐवजी आशा देशमुख यांना देण्यात आला एबी फॉर्म, त्यामुळे पूजा पोतराजे यांनी कायम ठेवली आहे आपली अपक्ष म्हणून उमेदवारी.
7 Jan 2026, 18:39 वाजता
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांचा भाजपवर आरोपांचा बॉम्बगोळा
Pune Ajit Pawar : पुण्यात टँकर माफियाची गँग सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय...पुण्यातील कचरा वेळेत उचलेला जात नसून पाणी टंचाईची मोठी समस्या असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय...तसेच कुत्र्यांच्या नसबंदीत घोटाळा झाला असल्याचं म्हणत पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांचा भाजपवर आरोपांचा बॉम्बगोळा.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2026, 16:06 वाजता
अंबरनाथमध्ये नाट्यमय घडामोडी, काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा गट भाजपमध्ये जाणार
Ambernath Congress : अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसनं 12 नगरसेवकांना निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस नगरसेवकांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर गंभीर आरोप केलाय. ब्लॉक अध्यक्षपदासाठी सपकाळांनी एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2026, 15:42 वाजता
छ. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला
CSN Attack on Imtiaz Jalil Car : संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय.. एमआयएमचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली... पदयात्रा काढत असताना त्या पदयात्रेला विरोध होत... त्यांच्यासमोर हा राडा झाला...पदयात्रेला यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले.. त्यानंतर अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला..त्यामुळे दोन गटांमध्ये हमारीतुमरी होऊन हाणामारी झाली... त्यावेळी पोलिसांनीकडून हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2026, 14:34 वाजता
निकालाच्या दिवशी कमळ बाहेर पडतील- चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : एवढं जोरात बटन दाबा की निकालाच्या दिवशी बाहेर पडणारे कमळ बघून भाजपाच्या विरोधा पुन्हा कोणीच उभं राहायची हिम्मत करू नये, असं विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय..पुण्यातील प्रभाग क्रमांक तीन आणि चारच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडली या प्रचार सभेत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय..
7 Jan 2026, 13:25 वाजता
संदीप देशपांडे मनसेला रामराम ठोकणार?
Sandeep Deshpande : संतोष धुरींपाठोपाठ संदीप देशपांडेही मनसेला रामराम ठोकण्याची शक्यता- सूत्रांची माहिती...महापालिका निवडणूक झाल्यानंतर संदीप देशपांडे मनसेला सोडचिठ्ठी देणार असल्याची मनसैनिकांमध्ये चर्चा..ठाकरेंच्या युती आणि जागावाटपाच्या चर्चेपासून लांब ठेवल्यानं तसंच, संदीप देशपांडेंच्या जवळील कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्यानं देशपांडे नाराज- सूत्र..संदीप देशपांडे यांच्या माध्यमांशी बोलण्यावरही बंदी घातल्याचा संतोष धुरींचा दावा...मनसेचे मुंबई अध्यक्ष आणि प्रमुख प्रवक्ते तसंच कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणून संदीप देशपांडेंची ओळख
7 Jan 2026, 12:22 वाजता
'आता हिरवे नाही झाले का?, संजय राऊतांची भाजपवर टीका
Sanjay Raut on BJP : भाजपनं काँग्रेस आणि एमआयएमची हातमिळवणी केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केलीये. भाजपची MIMसोबत काही ठिकाणी छुपी तर काही ठिकाणी उघड युती असल्याचं जगजाहीर झाल्याचा टोला राऊतांनी लगावलाय.. अकोटमध्ये भाजपची MIMशी उघड युती
महाराष्ट्रात मात्र भाजपचा नवा पॅटर्न..हे दुतोंडी गांडूळ...मोदींना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे...महाराष्ट्र मात्र भाजपचा नवा पॅटर्न..'आता हिरवे नाही झाले का?' असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय..
7 Jan 2026, 11:40 वाजता
‘भाजपनं पिंपरी-चिंचवड मनपाला कर्जात लोटलं’, अजित पवारांची पुन्हा भाजपवर टीका
Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा भाजपवर बोचरी टीका केलीय. पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीचे पैसे सत्ताधा-यांनी खाल्ल्याचा आरोप अजितदादांनी केलाय. पंतप्रधान आवास योजनेतही भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. महापालिकेत 40 हजार कोटींची कामं केल्याचा दावा भाजप करतो मात्र विकास कुठंच दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एवढंच नाहीतर महापालिकेला चार हजार कोटींच्या कर्जात लोटल्याचाही आरोप त्यांनी केलाय.
7 Jan 2026, 11:17 वाजता
संभाजीनगरमध्ये NCP उमेदवाराचं कार्यालय पेटवलं
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे...राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार कार्यालय पेटवून देण्यात आला आहे...शहरातील कैलासननगर परिसरातील घटना...राष्ट्रवादीचे उमेदवार मयुर सोनवणे यांचे कार्यालय होते
7 Jan 2026, 10:46 वाजता
वेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्या- जयंत पाटील
Jayant Patil : महापालिकेतील बिनविरोध निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटलांनी भाजपाला टोला लागावलाय..वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्या,त्यामुळे मिर्ची लागली आहे. सरळ मार्गाने निवडी झाल्या नाहीत, पैसे,पळवा-पळवी,दमदाटी करून निवडी झाल्यात असं लोक म्हणत असल्याचं पाटील यांनी म्हटलंय..