Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on DECEMBER 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aashish Udas | Dec 02, 2025, 19:17 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Dec 2025, 19:15 वाजता

चंद्रपुरात गडचांदूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम फोडले

 

Chandrapur EVM : गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने फोडले ईव्हीएम,  प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील घटना, राम दुर्गे असं EVM फोडणाऱ्या मतदाराचे नाव, "नगारा" या चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचा आरोप, पोलिसांनी राम दुर्गे याला घेतलं ताब्यात, नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू.

2 Dec 2025, 14:00 वाजता

मी रोकड पकडून दिली तरी माझ्यावर कारवाई- निलेश राणे

 

Nilesh Rane : निलेश राणेंनी निवडणूक अधिका-यांची घेतली भेट...मालवणमधील पैसे वाटपाच्या मुद्द्यावर भेट...'मी चोरी पकडून दिली, काय कारवाई केली?'...'याआधीही रोकड जप्त केली, काय कारवाई झाली?'...'मी रोकड पकडून दिली तरीही माझ्यावर कारवाई'...आम्हाला न्याय मिळणार आहे का?- निलेश राणे...'काल रात्रीची दोन्ही माणसं मोकळं फिरतायत'...'माझ्यावर 100 टक्के गुन्हे टाका,फरक पडत नाही'...'आयकर विभागाकडे विषय देऊन काही होणार नाही'....तुम्ही पुढची कारवाई काय करणार आहात?- राणे

 

2 Dec 2025, 13:36 वाजता

रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची बाचाबाची

 

Raigad : रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ...मतदार केंद्रावर कार्यकर्त्यांची बाचाबाची...भरत गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची...ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं गर्दी वाढली...बाचाबाचीमुळे मतदान केंद्रावर तणाव

2 Dec 2025, 12:18 वाजता

निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची- फडणवीस 

 

Devendra Fadnavis : निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची- फडणवीस...'आयोगाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करावी'...मुख्यमंत्री फडणवीसांचा आयोगाला सल्ला...पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय, हे यंत्रणांचं अपयश'...-'अजून ब-याच निवडणुका बाकी, सुधारणा व्हावी'
--कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल-फडणवीस 

2 Dec 2025, 11:33 वाजता

 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली, मतमोजणी 21 डिसेंबरला

 

Maharashtra Eelections :  नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली.. उद्या होणारी सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

 

2 Dec 2025, 11:07 वाजता

भोरमध्ये मतदान केंद्रात EVMची पूजा, पोलिसात गुन्हा दाखल

 

Bhor : भोरमध्ये मतदानकेंद्रात EVMची पूजा...मतदान केंद्र प्रमुखांवर कारवाई...मतदान केंद्रावर नवे केंद्रप्रमुख नियुक्त...EVMची आरती करणा-यांवर गुन्हा दाखल

2 Dec 2025, 10:36 वाजता

माथेरानमध्ये 5 लाखांची रोकड जप्त

 

Matheran : माथेरानमध्ये 5 लाखाची रोकड जप्त...मतदान केंद्राजवळ सापडली रोकड..शिवसेनेची रोकड असल्याचा आरोप...शिवराष्ट्र पॅनलनं पकडून दिली रोकड

2 Dec 2025, 10:06 वाजता

बुलढाणा शहरात बोगस मतदानाचा प्रकार

 

Buldhana : बुलढाणा शहरात बोगस मतदानाचा प्रकार...दोघांना निवडणूक अधिका-यांनी रंगेहाथ पकडलं...बोगस मतदानामुळे मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण...दोघांना निवडणूक अधिका-यांनी रंगेहाथ पकडलं

2 Dec 2025, 09:30 वाजता

'मालवणमध्ये शिंदेंकडून पैशाचं वाटप',शिवसेना UBTच्या वैभव नाईकांचा आरोप

 

Vaibhav Naik : मालवणमध्ये शिंदेंकडून पैशाचं वाटप....‘2 बॅगांमधून रात्रभर पैशाचं वाटप झालं’...शिवसेना UBTच्या वैभव नाईकांचा आरोप

 

2 Dec 2025, 09:13 वाजता

भोरमध्ये EVMची पूजा करत आरती, EVMला हळदी-कुंकू वाहत पूजा

 

Bhor : भोरमध्ये ईव्हीएमची पूजा करत आरती...ईव्हीएमला हळदी-कुंकू वाहत पूजा...निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन...भोर नगरपालिका मतदान केंद्रावरील प्रकार