)
Latur : ओल्या दुष्काळावरून लातूरमध्ये चांगलंच राजकारण तापलंय... काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे... शासनाच्या शब्दकोशामध्ये ‘ओला दुष्काळ’ हा शब्द नाही, पण शेतकऱ्यांच्या मनात ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ अशी भावना आहे.... त्या भावनेची चेष्टा करू नका, अनादर करू नका. हे सरकार गंभीर नाही, अशी टीका त्यांनी केलीय..सरकार ओल्या दुष्काळाच्या पुढे जाऊन मदत करत आहे...शेतकरी प्रश्नावरून राजकारण करू नका...असा पलटवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mahayuti : मनपा, झेडपीसाठी महायुतीची रणनीती ठरली...पालकमंत्र्यांवर असणार मोठी जबाबदारी- सूत्र...पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात तिघांची समिती नेमली जाणार- सूत्र...पालकमंत्री आणि दोन पक्षांचे संपर्कप्रमुख अशी समिती- सूत्र...समिती जिल्ह्यातील निवडणुकीत युतीबाबत चाचपणी करणार असल्याची माहिती..यानंतर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील
Mahur Renuka Devi : साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानने पुराग्रस्तांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिलाय.... जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी याबाबत माहिती दिली... माहूर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, उपाध्यक्ष उवविभागीय पोलीस अधिकारी मळगने, सचिव उपविभागीय अधिकारी दंतोला यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिक आणि संस्थानानी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pandharpur : जेव्हा नव्हती गोदा, गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे....विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नव्याने विठ्ठल अभिषेकासाठी चंद्रभागेच्या पाण्याऐवजी थेट गंगेचे पाणी आणल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...विठ्ठल-रुक्मिणी अभिषेकासाठी पूर्वापार चंद्रभागा नदीतून पाणी आणले जायचे त्यासाठी काही सेवेकरी सुद्धा होते... पण सध्या या मंदिर समितीने चंद्रभागचे पाणी सोडून नवा पायंडा पाडत गंगेच पाणी आणले आहे... यावर महर्षी वाल्मीक संघाने आक्षेप घेतला आहे.. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मनमानी कारभार करत आहे... जर हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Abu Azmi : भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू कासीम आझमी हे आज भिवंडीत आलेले असताना त्यांनी हिंदी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी मराठीत प्रतिक्रिया देण्याबाबत मराठी माध्यमांनी विचारणा केली असता अबू आझमी यांनी हिंदीमध्ये तिखट उत्तर देताना सांगितले की, मराठी हिंदी मध्ये फरक काय आहे. मी मराठी बोलू शकतो पण मराठीची आवश्यकता काय आहे.ही प्रतिक्रिया फक्त भिवंडी पुरताच मर्यादित आहे.दिल्लीमध्ये आणि यूपीमध्ये जर ही मराठी बाईट जाईल तर कोणाला समजणार आहे.अस वक्तव्य अबू आझमी यांनी केले असून मराठीच्या मुद्द्यावरून मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देताना सांगितले की,*अबू अझमी तुम्ही राजकारण हे महाराष्ट्रामध्ये करत आहे. महाराष्ट्राचा राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैयांची परवा पडली आहे का भिवंडी ही महाराष्ट्रामध्ये आहे . महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत चालेल मराठी ची जर लाज वाटत असेल तर तुम्हाला मनसे स्टाईलने उत्तर देऊ
Gas : दस-याच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागले...व्यवसायिक सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ...घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही...हॉटेलचं जेवण महागण्याची शक्यता
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Keshav Upadhyay on Uddhav Thackeray : शिवसेना UBT पक्षाचा दसरा मेळावा एका दिवसावर असताना, या मेळाव्याच्या कथित खर्चावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केलीय. नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून शिवसेना UBT पक्षाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलीय. दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार असा दावाही त्यांनी केलाय.
Kalyan School : कल्याण मधील एका नामांकित शाळेचा अजब फतवा सध्या वादाचा विषय ठरत आहे...स्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, तसेच विद्यार्थिनींनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घातली आहे... यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली असून, शिक्षण विभागानेही शाळेला नोटीस बजावून लवकरच शाळेत जाऊन कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.
Railway Tickets Booking New Rules : IRCTCवरून सामान्य आरक्षणाचं तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या नवीन नियमानुसार, सामान्य आरक्षणासाठी आता आधार कार्ड व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे. तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत त्याच लोकांना बुकिंग करता येणार आहे. जर आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलं नसेल तर तिकीट बुकिंग करण्यात अडचणी येतील. त्यामुळे आताच आधार कार्ड व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. नाहीतर बुकिंग करण्यात अडचणी येतील. आत्तापर्यंत हा नियम केवळ तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागू होता. मात्र आता तो जनरल तिकिटासाठीही लागू झालाय. या नव्या नियमाची अंमलबजावणी आजपासून होतेय. तिकीट बुकिंगमध्ये होणारी गैरव्यवहार आणि दलाली रोखण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Flowers Price Hike : ऐन दसरा दिवाळीत फुलांच्या किंमती गगनाला भिडल्यात.. मुसळधार पावसामुळे फुलशेतीचं मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे बाजारात फुलांची आवक घडलीये. दुसरीकडे फुलांची मागणी वाढल्यानं फुलांच्या दरात कमालीची वाढ झालीये.. घाऊक बाजारात झेंडू 200 रुपये तर गुलाब 500 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय.. इतर फुलांच्या किंमतीतही मोठी वाढ झालीये.. मुंबई, नवी मुंबई, तसेच ठाणे येथील फुल बाजारांमध्ये नाशिक, पुणे, सोलापूर या भागांतून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांची शेती वाहून गेली, पिकांचेही नुकसान झाले. परिणामी फुलांची आवक कमी झालीये..त्यामुळे फुलांचे दर वाढलेत..
Rain Alert : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली. अशातच आता ऑक्टोबरची सुरुवातही पावसानंच होणार आहे.. राज्यात पुन्हा पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये..राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.. मुंबईसह कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.. नांदेड जिल्ह्यात मात्र वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून तेथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.