)
Mohan Bhagwat : विजयादशमीच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाला संबोधित केलं.. आपल्या शेजारील देशांमध्ये उलथापालथ सुरु असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं..श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये हिंसाचार झाला मात्र अशा हिंसक आंदोलनामुळे अराजकता पसरते असं ते म्हणाले.. पहलगाम हल्ला तसंच अमेरिकेच्या टॅरिफवरुनही त्यांनी टीका केली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pankaja Munde : पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर होणार आहे. वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे.या मेळाव्याचे हे 11 वे वर्ष आहे. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त - मुंडेंचे लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात.संत भगवान बाबाच्या जन्मभूमी असल्या कारणाने सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्याला महत्व आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nilesh Ghaywal : पुण्याच्या कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयता हल्ल्यातील फरार आरोपी निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय.. निलेश घायवळचा आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय.. त्यासाठी निलेश घायवळने नावात बदल केल्याचं दिसून येतं आहे. पुण्यातील कोथरुड विधानसभा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निलेश आणि त्याची बायको स्वाती घायवळच्या नावे ही ओळखपत्रे आहेत.
Ajit Pawar : 'वादग्रस्त वक्तव्यांना सरकारचं पाठबळ नाही'...'भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची नोंद घ्यावी'...'फडणवीस, रविंद्र चव्हाणांनी दखल घ्यावी'...पडळकरांचं विधान, अजित पवारांची प्रतिक्रिया
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Manoj Jarange : बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार आहे...मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे... यंदा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार नाही... दरम्यान हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आहे...त्यामुळे मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे...मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मनोज जरांगे भाषण करण्याची शक्यता कमी आहे... दरम्यान नारायण गडावरून शेतक-यांसाठी लढा उभारण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी ठाणे दौ-यावर दाखल झालेत.... या दौ-यादरम्यान ते जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का देणार आहेत.. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई हे आज पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत... जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थाना समोरच राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Gold Price Hike : विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या किंमती 10 ते 12 हजार रुपयांनी वाढल्या आहेत.सोन्याचे दर 1 लाख 21 हजारांच्यावर गेलाय. तर चांदीच्या दरातही वाढ झालीये...चांदी एक किलो 1 लाख 51 हजारांच्यावर गेलाय...सोन्याच्या दरात झालेली ही वाढ, ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरत आहे. मात्र, तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्कीच सोनं खरेदी करतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्याचा एक चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसानं हजेरी लावलीय. या पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलाचं साम्राज्य पसरलंय.. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याच्या तयारीत अडथळे निर्माण झालेत.. त्यामुळे नियोजित पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का याकडं सा-यांचं लक्ष लागलंय..
Uddhav Thackeray : मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचा आवाज घुमणार आहे. आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. या महापालिका निवडणुकांचं रणशिंग या मेळाव्यातून फुंकलं जाण्याची शक्यता आहे.