)
Uddhav Thackreay : शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा'...पावसातही शिवसैनिक शिवतीर्थावर उभे होते'...'आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही'...उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
Anil Parab on Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरेंनी स्वत:च हाताचे मोल्ड बनवले होते'...मोल्ड आणि ठशांमधीस त्यांचा अभ्यास कमी'..अनिल परबांचा रामदास कदमांवर हल्लाबोल
Anil Parab on Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर रामदास कदमांनी केलेल्या आरोपावर अनिल परबांनी हल्लाबोल चढवलाय. आमच्या दैवताच्या मृत्यूवर संशय घेतलाय.बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर १४ -१५ वर्षांनी रामदास कदमांना कंठ फुटला असा आरोप परबांनी कदमांवर केलाय. मातोश्रीबाहेर कुठल्या बाकड्यावर ते बसले होते तो बाकडा मी शोधतोय असंही परबांनी म्हटलं. रामदास कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही परबांनी सांगितलं . इतकंच नाही तर त्यांची नार्को टेस्ट करा असंही परबांनी म्हटलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Rain Alert : गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात बरसणार आहे...राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय... तर 12 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेईल..राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे... या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे....इतर भागात पावसाची उघडीप राहील....मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत...मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sanjay Raut : महाराष्ट्र रामदास कदमांवर थुंकतोय-राऊत...-'कदम यांच्याकडून बाळासाहेबांची विटंबना'...टाळ्या मिळवण्यासाठी विटंबना केली'..-'रामदास कदम यांना किंमत मोजावी लागणार'...उद्धव ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न'...संजय राऊतांचा रामदास कदमांवर हल्लाबोल
Uddhav Thackreay : शिवसेना UBTनं आता मिशन पुणे महापालिका सुरू केलंय...त्यासाठी आज उद्धव ठाकरे पुणे दौ-यावर आहेत...ठाकरे शाखा प्रमुख आणि पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत..पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात शिवसेना UBTची महत्त्वाची बैठक होणार आहे... यामध्ये पुणे महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द होणार...पोलीस चौकशीतून घायवळची बनवेगिरी उघड...पुणे पोलीस आयुक्तांकडून बनवेगिरीची चौकशी...आडनावाच्या स्पेलिंगमध्ये फेरफार करून मिळवला होता पासपोर्ट...पुणे पोलीस आयुक्तांनी पासपोर्ट अधिका-यांना बोलावून या सगळ्या बनवेगिरीची चौकशी केली...यामध्ये फेक पत्ता दाखवून आणि आडनावातला 'एच' गायब करून हा तात्काळ पासपोर्ट मिळवल्याचं स्पष्ट झालंय..पण हा पासपोर्ट घायवळला मिळवून देण्यात नेमकं कोण दोषी होतं याचा शोध हा लागलाच पाहिजे अशी मागणी आरटीआई कार्यकर्ता विजय कुंभार यांनी केलीय...
Mumbai Cooper Hospital : मागील 2 महिन्यांमध्ये कूपर रुग्णालयामध्ये 6 रुग्णांना उंदीर चावल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिलीये.. या प्रकरणांची जुहू पोलिसांकडे आपत्कालीन पोलीस अहवालामध्ये नोंद करण्यात आलीये.. कूपर रुग्णालयामध्ये 2 रुग्णांना उंदराने चावा घेण्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या संदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने साफसफाईबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. या समितीने तातडीने कारवाई करून सफाई करणा-या कंत्राटदाराकडून रुग्णालयाची सफाई करून घेतली. तसेच प्रभाग कार्यालयातील अधिका-यांनी उंदीर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.. मात्र कूपर रुग्णालयात मागील दोन महिन्यांमध्ये सहा रुग्णांना उंदीर चावल्याची माहिती पोलिसांनी माहितीच्या अधिकारात उघड झालीये.. त्यामुळे रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पालघर आणि सातारा जिल्ह्यांतील दोन न्यायाधीशांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख अशी न्यायाधीशांची नावे असून, १ ऑक्टोबरपासून त्यांना पदमुक्त होण्यास सांगितले आहे.
Same Day Clearance : भारतीय रिझर्व्ह बँकेची नवी 'सेम डे क्लिअरन्स' व्यवस्था लागू झालीये.. त्यामुळे बँकेचा चेक ज्यादिवशी बँकेत भरला त्याच दिवशी वटणार आहे. सध्याच्या 'चेक व्यवहार व्यवस्थे'त बॅच-प्रोसेसिंग होते... मात्र आता बँका चेकचे फोटो आणि एमआयसीआर डेटा क्लिअरिंग हाऊसला पाठवतील. ही माहिती ड्रॉई बँकेकडे पाठवली जाईल. पुढे काही तासांत चेक वटला जाईल... हे सर्व काम बँक कामकाजाच्या वेळेत केले जाईल. मात्र जर पुरेशा रकमेअभावी चेक बाऊन्स झाला तर ग्राहकांना चेक बाऊन्स चार्जेसचा भुर्दंड बसू शकतो.
'संघाला हिंदू मोहम्मद अली जीनांचे...', ठाकरे सेनेची मोहन भागवतांवर सडकून टीका; 'डरपोक...'https://t.co/wdEfvxIzZV < येथे वाचा सविस्तर वृत्त...#uddhavthackeray #shivsena #mohanbhagwat #RSS #RSS100 #RSS100Year #RSSorg #rss100वर्ष #vijayadashami
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 4, 2025
Anil Parab : अनिल परब आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत... रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना ते प्रत्युत्तर देणार आहेत...बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाला दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता... त्यावर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब स्पष्टीकरण देणार आहेत...तर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रासंदर्भातसुद्धा या पत्रकार परिषदेतून खुलासा केला जाणार असल्याची माहिती आहे...
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज राज्यातील ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे...या बैठकीला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना देखील बोलवण्यात आलंय... तायवाडे यांनी सरकारने काढलेल्या जीआरला पाठिंबा दिला आहे... तर हा जीआर रद्द करावा ही मागणी सर्व ओबीसी संघटनांची आहे... यावर बैठकीत चर्चा होणारय... दरम्यान काँग्रेस नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे....