Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on NOVEMBER 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aashish Udas | Nov 04, 2025, 18:30 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

4 Nov 2025, 18:18 वाजता

दुबार मतदान रोखण्यासाठी टूलचा वापर- निवडणूक आयोग

 

Election Commission : दुबार मतदान रोखण्यासाठी टूलचा वापर-आयोग...दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्हं दिसणार - निवडणूक आयोग..तर दुबार मतदारांना कसं रोखणार?....अनिल परबांचा निवडणूक आयोगाला सवाल...दुबार मतदार यादी कधी देणार? - रोहित पवार 

4 Nov 2025, 16:54 वाजता

नगरपरिषद, नगरपंचायतींची निवडणूक जाहीर

 

Maharashtra Election : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूका घेतली जाईल. कोकण विभागात 27, नाशिक विभागात 49, पुण्यामध्ये 60, संभाजीनगरमध्ये 52 आणि अमरावती विभागात 45 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून, उमेदवारांच्या अर्जाची छानननी 18 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे. 13 हजार 355 केंद्रावर निवडणूक पार पडणार आहे. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून दक्षता घेण्यात आली आहे. 

4 Nov 2025, 15:12 वाजता

उद्धव ठाकरे पप्पू के पापा म्हणून स्मार्ट दिसतील- आशिष शेलार

 

Ashish Shelar on Uddhav Thackeray : सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय. शेलारांनी उद्धव ठाकरेंचा पप्पू असा उल्लेख केलाय. उद्धव ठाकरे पप्पू के पापा म्हणून स्मार्ट दिसतील अशी टीका शेलारांनी केलीय.. शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला होता. ठाकरेंच्या याच टीकेला शेलारांनी उत्तर दिलंय. 

 

4 Nov 2025, 14:06 वाजता

पंतप्रधान मोदी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेणार

Bullet Train Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत..  १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान मोदी सुरत ते बिलीमोरा दरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या कामकाजाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा

4 Nov 2025, 14:01 वाजता

हातावर मेंदी काढल्यानं वर्गात बसण्यास नकार

Mumbai School : हातावर मेहंदी लावल्याने चेंबूरमधील एका नामांकित शाळेत 15 ते 20 विद्यार्थिनींना वर्गात बसू न दिल्याची तक्रार पालकांनी केलीये... यानंतर उपशिक्षणाधिका-यांनी शाळेला भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली... तसंच याबाबत खुलासा करण्याची नोटीस शाळेला दिली.. शाळेने मात्र असा प्रकार घडल्याचा इन्कार करत 'आम्ही फक्त शाळेचे आणि पीटीएचे नियम पाळल्याचं म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Nov 2025, 13:54 वाजता

अमरावतीत दोन भावांमध्ये हाणामारी

Amravati : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराळा इथे वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी तहसीलदार रवींद्र काळे, ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाल्यानंतर रस्ता मोकळा करून देण्यासाठी चिकटे परिवारातील दोन चुलत भावांनी एकमेकांना विरोध केला. त्यातील एक भाऊ रस्ता मोकळा करण्यासाठी गेला असता दुसऱ्या चुलत भावाने सरकारी कामात अडथळा आणत  चुलत भावावर हल्ला केल्यामुळे दोघांमध्ये तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित असल्यामुळे त्यांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली आणि शासकीय कामात अडथळा आणणे व हाणामारी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Nov 2025, 13:52 वाजता

नायकप्रमाणे एक दिवसाचा सीएम करा - जानकर

Uttam Jankar : 'नायक सिनेमाप्रमाणे एक दिवस हातात राज्य द्या.. राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ दूर करतो..असं विधान आमदार उत्तम जानकर यांनी केलंय..आशिष शेलारांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मतदार संघातील दुबार मतदारांवर भाष्य केल्यानंतर त्यांनी हे विधान केलंय.. तसंच यावेळी जानकरांनी ईव्हीएम  मशीन सेट असल्याचाही दावा केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Nov 2025, 13:22 वाजता

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठ्या प्रयत्नानंतर परकीय चलनाच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला....गुप्त माहितीद्वारे कस्टम अधिका-यांनी ही कारवाई केली. दुबईहून मुंबईमध्ये येणा-या एका प्रवाशाच्या तपासादरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगेत मोठ्या प्रमाणात परकीय  चलन मिळालं. या परकीय चलनाची भारतीय किंमत 87 लाख रुपये असल्याची माहितीआहे. ट्रॉली बॅगेत आतल्या कप्प्यात ही रक्कम लपवण्यात आली होती. कस्टम कायद्यानुसार प्रवाशाला अटक करण्यात आलीय. 

4 Nov 2025, 12:54 वाजता

गतिमंद मुलांना अमानुष मारहाण प्रकरण, 6 जण निलंबित

Sambhajinagar : संभाजीनगरमधल्या निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कूकरच्या झाकणाने मारहाण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलीय.  याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी अशा ६ जणांना निलंबित करण्यात आलं. यापूर्वी मारहाण करणारे दीपक गोविंद इंगळे आणि प्रदीप वामन देहाडे दोघांना निलंबित करण्यात आले होते. आता एकूण 6 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. मारहाण होत असताना तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते. त्यांनी या घटनेची ना संस्थाचालकांकडे, ना समाज कल्याण विभागाकडे वाच्यता केली. हा प्रकार दाबून ठेवण्यास तेही जबाबदार आहेत. म्हणून मारहाण करणारे व तेथे उपस्थित असलेल्या सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे.

4 Nov 2025, 12:15 वाजता

योगेश कदमांकडून प्रकाश सुर्वेंची पाठराखण

Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रकाश सुर्वेंची पाठराखण केलीये. मराठी माझी माय आहे यात चुकीचे काय ?? प्रकाश सुर्वे स्वतः मराठी आहेत ते कोकणातले आहेत यांनी मराठीचा सन्मान राखण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना साथ देत आहेत... मात्र विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -