)
Raj Thackeray Visit Matoshri : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला मातोश्रीवर दाखल झाले. संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. राऊतांच्या नातवाच्या बारशात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री गाठली. तिथे सुमारे अर्धा तास थांबून, राज मातोश्रीवरुन शिवतीर्थच्या दिशेनं रवाना झाले. गेल्या 2 महिन्यांत दुस-यांदा राज ठाकरे मातोश्रीवर गेले.
Amit Shah : राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना केंद्राचं मदतीचं पॅकेज मिळणार का अशी शक्यता निर्माण झालीय. कारण महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय.. महाराष्ट्रात 60 लाख हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचं सांगत शाहांनी शेतक-यांना दिलासा देण्याचे संकेत दिलेत.. राज्य सरकारनं मदतीसाठी केंद्राला अहवाल पाठवावा आणि केंद्र सरकार शेतक-यांना भरीव मदत देईल अशी ग्वाही अमित शाहांनी दिलीय..
Vijay Wadettiwar on Manoj Jarange : आरक्षणावरुन सुरु असलेल्या वादात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय. जरांगेंना सांगा 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका असंही वडेट्टीवार म्हणालेत. एकाच समाजाला सर्व हवं, मग बाकींच्या कसं जगायचं असा सवालही त्यांनी जरांगेंना विचारलाय. तर जरांगेंनी वडेट्टीवारांच्या विधानावर पलटवार केलाय.. वडेट्टीवार राज्याला न शोभणारे शब्द वापरतायत असं जरांगेंनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Uddhav Thackeray-Raj Thackeray Together Once Again : उद्धव ठाकरे-राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र...संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र..राऊतांच्या नातीच्या बारशाला ठाकरे बंधू एकत्र
Latur Rain : लातूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रात्रभर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांसोबतच अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी, बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांत चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासनाने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Mumbai Home : यंदाच्या नवरात्रोत्सवात मुंबईत 6 हजार 238 घरांची नोंदणी झाली आहे... म्हणजेच दिवसाला सरासरी 624 घरांची विक्री झाली असून स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 587 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे... विशेष म्हणजे, गतवर्षपिक्षा यंदाच्या नवरात्रीत घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे... गतवर्षी नवरात्रीत 5 हजार 199 घरांची म्हणजेच दिवसाला 587 घरांची विक्री झाली होती...यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबईत किती घरांची विक्री झाली याचा अभ्यास 'नाईट फ्रैंक' या संस्थेने केला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
Malaria Cases : राज्यात मलेरियाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून पहिल्या नऊ महिन्यांत 13 जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला... 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात 18 हजार 381 मलेरिया रुग्णांची नोंद करण्यात आली... त्यामध्ये पीएफ म्हणजेच प्लास्मोडियम फाल्सीपरम रुग्णांची संख्या 6 हजार 797 इतकी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.. गडचिरोली, रायगड, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, वसई-विरार, मुंबई, पुणे महापालिका क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मिरा-भाईंदर येथे मलेरियाच्या रुग्णांची संख्या अधिक आढळून आली... मुंबईमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 8 हजर रुग्णसंख्या नोंदवण्यात आली... गडचिरोलीमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 5 हजार 762 इतके होते....राज्यात 9 महिन्यांत 13 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू गडचिरोली जिल्ह्यातील आहे...
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी मोठी कारवाई केलीयं..... 2 स्वतंत्र कारवाई करून अधिका-यांनी विमानतळावर एक कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केलंय.... याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आलीयं.... पहिल्या प्रकरणात एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये 50 लाख रुपये मूल्याचे परकीय चलन आढळून आलं.... यावेळी अधिका-यांनी त्याला या परकीय चलनासंदर्भातील काही कागदपत्रे आहेत का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती..... त्यामुळे या आरोपीला अटक करण्यात आली... तर दुस-या प्रकरणातही एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये 50 लाख रुपये मूल्याचं परकीय चलन आढळून आलं.... त्या आरोपीलाही चलनासंदर्भात योग्य माहिती न देता आल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आलीयं.....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thane : ठाण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आलेत का अशी चर्चा रंगलीय. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली... या बैठकीला शिवसेना UBTचे माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण,मनसे नेते अविनाश जाधव उपस्थित होते. ठाणे शहरातील समस्या ट्रॅफिक, डम्पिंग, पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम ,सेवा रस्ता ,मेट्रो, अनधिकृत फेरीवाले यासह विविध मुद्यांवरुन सर्व विरोधी पक्ष एकत्र मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. या बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Dharashiva Rain : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात...भूम आणि कळंब तालुक्यात रात्रभर जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचले...नदीकाठच्या गावांना वाढला पूराचा धोका, प्रशासन सतर्क...आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात घातला होता हाहाकार – शेकडो घरांचे नुकसान, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान...स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे...भूम, कळंब, परंडा परिसरात हवामान खात्याचा इशारा – पुढील २४ तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता!
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Shirdi Sai Baba Mandir : शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिवशी आंध्रप्रदेशातील एका साईभक्ताने साईचरणी 1 किलो 74 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम आणी नवरत्नांचे खडे असलेला सोन्याचा हार अर्पण केलाय.. या हाराची किंमत 1 कोटी 3 लाख रूपयांच्या घरात आहे.. साईभक्तानं हे गुप्तदान दिलंय..
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौ-यावर आहेत... अमित शाहा रात्रीच शिर्डीत दाखल झाले आहेत...आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्धाटन पार पडणार आहे...सकाळी साईदर्शनानंतर त्यांच्या दौ-याची सुरुवात होईल...लोणी गावात विखे-पाटील साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचं उद्धाटन करतील... त्यानंतर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील... या दौ-यादरम्यान अमित शाह नुकसानग्रस्त शेतक-यांना मदतीबाबत काय घोषणा करणार... हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे...
Jejuri OBC Melava : खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये आज सकाळी आकरा वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलय.. महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.... मागील सात वर्षापासून जेजुरी मध्ये ओबीसी बांधवांच्यावतीने मल्हारगड दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते.. यावर्षी या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके,ऍड मंगेश सासाने मार्गदर्शन करणार आहे.... ओबीसी आरक्षण बचावआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालय.. यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय.. तर या मेळाव्यालाओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याच आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलय..
Onion Prices Fell : ऐन सणासुदीच्या काळात हाती आलेले पीक अतिवृष्टीत वाहून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. त्यात बाजारात पिकाच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्याने बळीराजा मोठ्या पेचात सापडलाय... सोबतच निर्यातीतील अनिश्चित धोरणांमुळे उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा नुकसानीत गेला आहे... त्यातच परदेशातील आयातबंदीमुळेही कांद्याचे भाव घसरवले आहेत...दसरा-दिवाळीच्या हंगामात शेतकरी साठवलेल्या कांद्याची विक्री करून नफा कमावतात... सोलापूर जिल्ह्यातून दिवाळीच्या सुरुवातीला नवीन हंगामाचा कांदा मुंबई एपीएमसीत येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे... यावर्षी संपूर्ण हंगामात कांद्याच्या दरात वाढ झाली नाही, त्यामुळे गेल्यावर्षी ३५ ते ४४ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे बाजारात भाव ९ ते १५ रुपये प्रतिकिलो इतकेच स्थिर राहिले. यातही सध्या घाऊक बाजारात व्हीआयपी कांद्याची आवक रोडावल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर १५ ते १७ रुपये किलोवर गेले आहेत. हलक्या प्रतीचा कांदा २ ते ५ रुपये किलोने विकला जात आहे...