Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on OCTOBER 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
07 October 2025 07:54 PM (IST)

तुकडा बंदी अधिनियमात सुधारणा होणार, मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी निर्णय

 

Mumbai : तुकडा बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी...एसआरएमध्ये क्लस्टर योजना राबवणार...छोट्या प्लॉट धारकांना शासनाचा मोठा दिलासा...मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी मोठा निर्णय

07 October 2025 07:03 PM (IST)

गौतमी पाटीलला पुणे पोलिसांची नोटीस

 

Gautami Patil : गौतमीला पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. या नोटीसीत 1 तारखेला पुणे पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं गौतमीला सांगण्यात आलं होतं.. मात्र गौतमीनं पुणे पोलिसांच्या नोटिसीनंतरही हजर झाली नाही.. त्यामुळे पुणे पोलिसांचा आदेश गौतमी पाटील यांनी धुडकावलेत.. पुणे पोलिसांनी गौतमीला पाठवण्यात आलेली नोटीस झी 24 तासच्या हाती लागलीय.. 

07 October 2025 06:15 PM (IST)

सोलापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, जवळच्या धरणातून मोफत माती देणार

 

Solapur : पूरग्रस्त भागात धडाकेबाज कामांसाठी चर्चेत असलेल्या सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी पूरग्रस्त शेतक-यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीमुळे ज्या शेतक-यांच्या शेतीचं नुकसान झालंय त्या शेतक-यांना जवळील तलाव किंवा धरणांतील गाळ मोफत दिला जाणार आहे.. तर कायमस्वरुपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन शेतीचं पुनर्वसन करता येईल का याचाही विचार केला जाणार आहे.. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.. ही समिती पुनर्वसन कायद्याचा अभ्यास करुन एका आठवड्यात याचा अहवाल सादर करणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

07 October 2025 05:06 PM (IST)

सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली- विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar :  राज्य सरकारचं मदतीचं पॅकेज म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. सरकारनं केलेली पॅकेजची घोषणा पुरेशी नसल्यचं वडेट्टीवार म्हणालेत..तसेच केंद्राकडून मदत का मिळाली नाही असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत... 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

07 October 2025 04:53 PM (IST)

'झी २४ तास'च्या मोहिमेची सीएमकडून दखल

 

Devendra Fadnavis On Zee24Taas Fakt Ladh Mhana : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांच्या मुलांसाठी झी २४ तासने फक्त लढ म्हणा ही मोहीम राबवली... या मोहिमेची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली... शेतक-यांच्या मुलांचं शिक्षण बाधित होऊ नये. यासाठी विद्यार्थ्यांची शाळा आणि कॉलेजमधील फी माफ करण्यात आलीय... नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी झी २४ तासने फक्त लढ म्हणा ही मोहीम राबवली.. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळत होती...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

07 October 2025 04:13 PM (IST)

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचं पॅकेज- फडणवीस

 

Devendra Fadnavis : अतिवृष्टी आणि महापुराने बेहाल शेतक-यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय...पूरग्रस्त शेतक-यांसाठी महायुती सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीये....सोबतच मदतीची मर्यादाही दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरपर्यंत वाढवलीये...ही सर्व मदत शेतक-यांना दिवाळी आधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय...सोबतच ओल्या दुष्काळबाबतच्या उपाययोजना लागू करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय...
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

07 October 2025 01:45 PM (IST)

निष्काळजीपणा भोवला, डॉक्टर निलंबित

Dombivli : डोंबिवली खंबालपाडा परिसरात आठवड्याभरापूर्वी विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा आणि तिच्या मावशीचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता.  याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठी कारवाई केली. या दुर्दैवी घटनेत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना आयुक्तांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आलं. मृत्यूंना जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीय करत होते. या घटनेनंतर संतप्त झालेले सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उद्या शास्त्रीनगर रुग्णालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. जनक्षोभ उसळण्यापूर्वीच आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. डॉक्टर संजय जाधव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ही निलंबनाची कारवाई करण्यात आली

बातमीचा व्हिडीओ पाहा-

07 October 2025 01:22 PM (IST)

राज्यातील शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवा - नवाब मलिक

 

Nawab Malik : महाराष्ट्रातील शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी केलीये. देशातील सर्वात जास्त उर्दू शाळा महाराष्ट्रात आहेत. काही विद्यार्थ्यांना हिंदी,  संस्कृत ऐवजी उर्दू शिकण्याची इच्छा आहे.. ऊर्दू आणि मराठी यांचे जुने संबध आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये उर्दू पर्याची भाषा म्हणून शिकवावी अशी मागणी त्यांनी केलीये... मुंबईत लवकरच उर्दू भवन उभारावं आणि त्यांच्या कामाची सुरुवात माणिकराव कोटाटेंच्या हस्ते व्हावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.. महाराष्ट्र शासनाच्या उर्दू कार्यक्रमादरम्यान ते  बोलत होते.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 12:48 PM (IST)

अंडासेलमधील कैद्याकडे सापडला आयफोन

Amravati : अमरावती कारागृहातील अंडा सेल मधील बंद्याजवळ जवळ चक्क आयफोन आढळल्याने मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा वा-यावर असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी शिक्षाधीन बंदी परवेज दशवेज खान आणि दस्तगीर गफूरशहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय..जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन बंद्याच्या बराकित चक्क आयफोन, दोन की-पॅड मोबाईल आणि दोन मोबाईल बॅटरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहातील अधिकारी कर्मचा-यांनी अंडा सेलच्या विशेष झडती दरम्यान प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहात राहूनही कैदी व्हिडिओ कॉल करत असल्याचे आढळून आले असून अमरावती मध्यवर्ती कारागूह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 12:30 PM (IST)

मुंबईत ड्रोन, विदेशी प्राणी आणि गांजा जप्त

Mumbai : मुंबई सीमाशुल्क विभागानं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करुन विदेशी प्राणी, हायड्रोपोनिक गांजा तसेच ड्रोनचा साठा जप्त केलाय.  बँकॉक आणि कोलंबो येथून येणा-या प्रवाशांकडून हा साठा जप्त करण्यात आलाय.. यातील काही प्रवाशांकडून सुमारे 6 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 5 कोटी 7 लाखांच्या घरात आहे. तसंच 32 लाख रुपये किंमतीचे ड्रोन आणि इग्वाना, बियर्डेड ड्रॅगन, रॅकून आणि मध्य अमेरिकन खार माकड यांसारखे दुर्मिळ वन्यजीवही जप्त करण्यात आलेत. या प्रवाशांवर NDPS कायदा, सीमाशुल्क कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 12:17 PM (IST)

मुंबईत ड्रोन, विदेशी प्राणी आणि गांजा जप्त

Mumbai : मुंबई सीमाशुल्क विभागानं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करुन विदेशी प्राणी, हायड्रोपोनिक गांजा तसेच ड्रोनचा साठा जप्त केलाय.  बँकॉक आणि कोलंबो येथून येणा-या प्रवाशांकडून हा साठा जप्त करण्यात आलाय.. यातील काही प्रवाशांकडून सुमारे 6 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 5 कोटी 7 लाखांच्या घरात आहे. तसंच 32 लाख रुपये किंमतीचे ड्रोन आणि इग्वाना, बियर्डेड ड्रॅगन, रॅकून आणि मध्य अमेरिकन खार माकड यांसारखे दुर्मिळ वन्यजीवही जप्त करण्यात आलेत. या प्रवाशांवर NDPS कायदा, सीमाशुल्क कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 11:50 AM (IST)

नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या जुडीला 200 रुपये भाव

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिरीच्या जुडीला २०० रुपये असा दर मिळतोय .विशेष म्हणजे गेल्या गुरुवारी नाशिक बाजार समितीत झालेल्या चायना कोथिंबीर प्रति जुडीला लिलावात १७० रुपये  असा बाजारभाव मिळालेला होता. काही दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील कोथिंबीरीचं उभं पीक नष्ट झाल्यांमुळे आवक घटली होती, दरम्यान कोथिंबिरीला यंदा २०० रुपये प्रति जुडी असा हंगामातील उच्चांकी दर मिळतोय. गेल्या आठवड्यात पावसामुळे पीक खराब झाले, त्यात कोजागरी पौर्णिमा असल्याने, सोमवारी बाजार समितीत कोथिंबीर आवक कमी झाल्याने बाजार तेजीत आले. बाजार समितीत जवळपास ५३ हजार जुड्यांची आवक झाली.

07 October 2025 11:42 AM (IST)

कीटकनाशक फवारणीमुळे शेतक-याचा मृत्यू

Akola : शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने एका तरूण शेतक-याचा मृत्यू झालाय.... गणेश कात्रे असं मृत शेतक-याचं नाव आहे. तुरीच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना  अचानक त्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या.त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी दर्यापूर येथून अकोल्यात उपचारासाठी नेण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही शेतक-यांना फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे फवारणी करताना काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य आणि कृषी विभागाकडून देण्यात आल्यात..

07 October 2025 11:39 AM (IST)

बेस्ट कर्मचा-यांची दिवाळी गोड

Best Bonus : बेस्ट कर्मचा-यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.. बेस्ट कर्मचा-यांना बीएमसी कर्मचा-यांप्रमाणे बोनस मिळणार आहे.  नव्याने नियुक्त झालेल्या बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठविल्याचे सांगितले.श्रमिक उत्कर्ष सभा आणि बेस्ट इलेक्ट्रिक युनियनच्या प्रतिनिधींची आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळी बोनस आणि महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार देण्याची मागणी करण्यात आली.. कर्मचा-यांच्या या दोन्ही मागण्यांना बेस्ट महाव्यवस्थापकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय..

07 October 2025 11:15 AM (IST)

नोव्हेंबरपासून राज्यात एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा

Air Ambulance Service :  राज्यातील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवेसह अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार आहे... राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली...आबिटकर यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून दोन हेलिकॉप्टरच्या अ‍ॅम्ब्युलन्स एअर माध्यमातून सेवा सुरू केली जाणार असून, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होईल... यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील 200 आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील... आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांच्या सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 10:09 AM (IST)

प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दिल्यानं वाद

Prabhodhankar Thackray Book : मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचा-याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहका-यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे... रुग्णालयातील महिला कर्मचा-यांनी हे पुस्तक देणा-या कर्मचा-यावरच पुस्तके फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलंय... यावरून आता वादनिर्माण झालाय.. प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेने केलाय.. निवृत्त कर्मचा-यावर पुस्तक फेकणा-या आणि त्याचा अपमान करणा-या सहाय्यक अधिसेविका तसंच संबंधित परिचारिका, आणि महिला कर्मचा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनेनं केलीये...

07 October 2025 09:11 AM (IST)

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.. दुपारी 12 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार असून या बैठकीत पूरग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदतीच्या पॅकेजीच घोषणा होण्याची शक्यता आहे..अतिवृष्टीमुळे बाधित 72 ते 73 लाख शेतक-यांना आजच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे...यावेळी NDRF निकषांपेक्षा अधिक मदत देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानस आहे...त्यासाठी सुमारे 13 ते 15 हजार कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.. आगामी निवडणुका लक्षात घेता जनतेमध्ये नाराजी निर्माण होऊ नये असा महायुती सरकारचा प्रयत्न असणार आहे... आज होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

07 October 2025 08:35 AM (IST)

सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी झेप

Gold & Silver Rate : सोन्याच्या किमतीने विक्रमी झेप घेतलीय. दिल्लीच्या बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर तब्बल २,७०० रुपयांनी वाढून १,२३,३०० रुपयांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर असून सुरक्षित गुंतवणूक पर्यायामुळे होत असलेली खरेदी व रुपयाच्या अवमूल्यनामुळे सोन्याला बळ मिळालंय....31 डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा दर ७८,९५० रुपये होता. तेथून आतापर्यंत किंमत ४४ हजार रुपयांनी म्हणजेच ५६.१८ टक्क्यांनी वाढ झालीय.... शुक्रवारी  १ लाख ५० हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी ७,४०० रुपयांनी वाढून १,५७,४०० रुपये प्रति किलो झाली. या वर्षात चांदीची किंमत ६७,७०० रुपयांनी म्हणजेच ७५ टक्क्यांनी वाढलीय.. 

07 October 2025 08:33 AM (IST)

संभाजीनगरात राष्ट्रवादी SP पक्षाचं आंदोलन

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.  आमदार रोहित पवारांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून संभाजीनगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सकाळी हे आंदोलन केलं जाणार आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

Trending

  • News
  • Photos
  • Videos